2 उत्तरे
2
answers
व्यक्तिमहत्व म्हणजे काय?
0
Answer link
व्यक्तिमत्त्व म्हणजे काय
व्यक्तिमत्व विकास म्हटलं की फक्त दिसणं आणि बोलण्याच्या चौकटीत एखाद्या व्यक्तीला अडकवलं जातं. समाजात वावरताना चांगल्या पद्धतीने बोलणं, व्यवस्थित राहणं यातूनच लोकांना आपलं व्यक्तिमत्व प्रभावी वाटेल असं अनेकांना वाटत असतं. पण व्यक्तिमत्व म्हणजे फक्त दिसणं आणि बोलणंच नव्हे तर त्याहीपलीकडे असतं. आपले आचार – विचार, अंतर्गत सौंदर्य, आपली वागणूक हे सगळं म्हणजे देखील आपलंच व्यक्तिमत्व असतं. खरंच जर आपल्याला स्वतःचा विकास करायचा असेल तर या मुद्द्यांचा आपण विचार केला पाहिजे.
व्यक्तिमत्व विकासाचे क्लासेस हल्ली सर्रास दिसून येतात. नुकतंच कॉलेज झालेले, नोकरीच्या शोधात असलेल्या अनेकांचा अशा क्लासेसकडे कल असतो. तिथे जाऊन आपण काही दिवस वेगवेगळ्या टीप्स घेतल्या की बास्स, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास झालाच म्हणून समजा, असा दृष्टीकोन अनेकांचा दिसून येतो. मग तिथे आपण कसं रहावं, कसं बोलावं, शिष्टाचार या सगळ्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलं जातं. निश्चितच त्याचा कमी - अधिक प्रमाणात आपल्याला फायदा देखील होतो. पण केवळ समाजात कृत्रिम प्रतिमा तयार करण्यासाठी धडपड करणं आणि त्यातून प्रभावी व्यक्तिमत्वाचं प्रदर्शन करणं कधीही तुमची ओळख निर्माण करु शकणार नाही. जरी अशी प्रभावी ओळख तुम्ही निर्माण केली तरी ती अतिशय ठराविक कालावधीसाठी मर्यादित राहील. एक वेळ अशी येईलच की त्या कृत्रिम बाबींचा आधार घेण्याचा तुम्हालाही कंटाळा येईल.
आपण अनेकदा चारचौघात असताना एखादी व्यक्ती आपल्याला भुरळ पाडते. तिचं दिसणं, राहणीमान फार काही उठावदार नसलं तरी त्या व्यक्तीची व्यक्त होण्याची पद्धत, तिचे विचार, विचारांना अनुसरुन कृती त्या व्यक्तिमत्वाच्या उंचीचं दर्शन आपल्याला घडवते. अशांपुढे अगदी चकचकीत दिसणारे, छान बोलणारे देखील मागे पडतात. स्वतःला योग्य पद्धतीने सादर करण्यातून आपण व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवत असतो. पण त्याचेही दोन प्रकार पडतात. एक म्हणजे आपलं बाह्यरुप आणि दुसरं म्हणजे आपलं आतलं, वैचारिक, भावनिक, मानसिक रुप. या दोघांची सांगड ज्या व्यक्तीला घालता येते त्याचं व्यक्तिमत्व सगळ्यात उत्तम असं आपण म्हणू शकतो. कारण एका परिपूर्ण व्यक्तिमत्वात अपेक्षित असलेले सर्व गुण त्या व्यक्तीत सापडतात. समाजात प्रभाव पडेल अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व असतं.
व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना देहबोली, हावभाव या गुणांवर प्रामुख्याने बोललं जातं. हे गुण महत्त्वाचे आहेतच, पण खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व घडवायचं असेल, स्वतःचा विकास करायचा असेल तर आत्मिक सौंदर्यावर देखील भर देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. दिसण्यापेक्षा, लोकांवर छाप पाडणारं बोलण्यापेक्षा, आपल्या विचारांचं दर्शन आपण जर आपल्या शब्दांच्या माध्यमातून, बोलण्यातून घडवलं तर आपल्यासारखा प्रभाव दुसरं कोणीही पाडू शकणार नाही. माणुसकीची भावना, संवेदनशीलता, सामान्य ज्ञान, अभ्यास, मार्गदर्शन करण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्ती परिपूर्ण व्यक्तिमत्वाच्या असतात. दुर्दैवाने, आजच्या काळात दिखाऊगिरीची इतकी चटक लागली आहे की केवळ बाह्यरुपाच्या आधारावरच व्यक्तिमत्वाचा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जातो. केवळ चांगले कपडे, इंग्रजी भाषेतून संवाद, आधुनिक प्रकारच्या जीवनशैलीचा अवलंब असणाऱ्या व्यक्तींचंच व्यक्तिमत्व चांगलं असं समजलं जातं. पण या सगळ्या गोष्टींच आयुष्य अतिशय छोटं असतं. जेव्हा तुम्हाला तुमचे विचार प्रकट करण्याची वेळ येते, तुमचं काम दाखवण्याची वेळ येते आणि तुम्ही त्यात प्रामाणिक नसाल तर तेव्हा मात्र तुमचे कपडे आणि राहणीमान हे सगळंच प्रभावहीन होतं. त्यामुळेच आपलं आत्मिक सौंदर्य, विचार, नीतिमूल्य यांचा विचारदेखील व्यक्तिमत्वाच्या विकासादरम्यान केला पाहिजे. जगासोबत चालण्याची, होणारे बदल स्वीकारण्याची क्षमता आपण आत्मसात केली पाहिजे. केवळ बोलण्यातून नव्हे तर आपल्या कृतीतून आपल्या व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवलं पाहिजे.
महात्मा गांधी यांचं राहणीमान अतिशय साधं होतं. पण त्यांच्या विचारांनी, आचारांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रचंड सकारात्मक प्रभाव पडायचा. त्यांच्या चेहऱ्यावरचा शांत भाव लोकांना आपलंसं करायचे. त्यांना कधीही व्यक्तिमत्वासाठी आधुनिकीकरणाच्या मागे धावावे लागले नाही. तरीही जगभरात त्यांच्या नावाचा, विचारांचा, त्यांच्या योगदानाचा आदर केला जातो. देशभरात असे अनेक समाजसुधारक, क्रांतिकारक, समाजसेवक होऊन गेले ज्यांची राहणीमान अतिशय साधी होती, पोपटपंची न करता म्हणजे बोलण्यातून आपला प्रभाव पाडण्याच्या मागे न लागता कृती करुन ते आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख करुन देत असत. अशी माणसं आपल्या स्वतःलाच व्यवस्थित ओळखायला शिकलेली असतात. त्यामुळेच व्यक्तिमत्व म्हणजे फक्त चांगलं राहणं आणि बोलणंच नाही हे लक्षात घेऊन वेळीच आत्मिक सौंदर्य, विस्तारीत विचार यांवर काम करुन प्रगल्भ होण्यावर भर द्या. आपोआपच तुमचं व्यक्तिमत्व तुमची सकारात्मक, प्रभावी ओळख निर्माण करेल.
0
Answer link
व्यक्तिमहत्व (Personality) म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या विचार, भावना आणि वर्तणुकीच्या पद्धतींचा समुच्चय.
व्याख्या
- गॉर्डन ऑलपोर्ट यांच्या मते, "व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीच्या मनोशारीरिक प्रणालींचे एक गतिशील संघटन आहे, जे त्याच्या वातावरणाशी त्याचे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करते."
- मॉर्टन प्रिंस यांच्या मते, "व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीच्या सर्व जन्मजात प्रवृत्ती, इच्छा आणिacquired प्रवृत्ती, विचार आणि कल्पना यांचा एकंदरितपणा."
व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये
- सातत्य (Consistency): व्यक्तिमत्व कालांतराने स्थिर राहते.
- वैशिष्ट्यपूर्णता (Distinctiveness): प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व वेगळे असते.
- परिस्थितीनुसार बदल (Adaptability): व्यक्तिमत्व लवचिक असते आणि परिस्थितीनुसार बदलते.
- सामाजिक प्रभाव (Social Influence): व्यक्तिमत्त्वावर सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा प्रभाव असतो.
व्यक्तिमत्त्वाचे घटक
- स्वभाव (Temperament): जन्मजात भावनिक आणि वर्तणुकीची पद्धत.
- चारित्र्य (Character): नैतिक आणि सामाजिक मूल्यांवर आधारित वर्तन.
- सवयी (Habits): वारंवार केलेल्या वर्तणुकीमुळे तयार झालेल्या पद्धती.
- दृष्टीकोन (Attitude): एखाद्या गोष्टीबद्दलची सकारात्मक किंवा नकारात्मक भावना.
व्यक्तिमत्व विकास हा एक सतत चालणाराProcessआहे जो जन्म മുതല് मृत्यूपर्यंत चालू राहतो.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: