2 उत्तरे
2
answers
व्यक्तिमत्व म्हणजे काय?
2
Answer link
व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्ती ला दिलेलं महत्त्व. आपणं कोणत्या व्यक्तीला महत्त्व देतो जी आपल्याला समजून घेते, अडचणीत मदत करते, आपल्या चुका लक्षात आणून सुधारण्यासाठी प्रयत्न करते,अशा व्यक्तिला आपण आपल्या जीवनात महत्व देतो. ह्याच गोष्टी लक्षात ठेवल्यास व्यक्तिमत्व विकास साठी विशेष प्रयत्न करावे लागणार नाही.
व्यक्तिमत्त्व म्हणजे नक्की काय ?????
एखादी व्यक्ती-तिचे रूप,स्वभाव,वर्तणूक,दृष्टिकोन, चारित्र्य,बुद्धिमत्ता,कौशल्ये,भाव-भावना, संवेदनशीलता, लोकसंग्रह,गुण-अवगुण,सामाजिक प्रतिमा या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे ' व्यक्तिमत्त्व ' होय.
व्यक्तिमत्त्व हे एखाद्या व्यक्तीच्या अंतर्बाह्य रूपाची गोळाबेरीज असते.
आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व सुधारायचे आहे ??तर मग हे आवर्जून करा-
नेहमी स्वतःचा व इतरांचा आदर करा.
विनम्र रहा.विद्या विनयेन शोभते |
नेहमी सकारात्मक व चैतन्यशील रहा.
परोपकारी बना.गरजू व्यक्तींना कायम सढळ हाताने मदत करा.समाजासाठी चंदनासारखे झिजा,तुमच्या कार्याचा सुगंध आपोआप दाहीदिशा दरवळेल.
नेहमी इतरांचे मन:पूर्वक व उदारपणे कौतुक करा.
स्वतःला प्रबळ प्रेरणावान व आत्मविश्वासयुक्त बनवावे व इतरांना विश्वास द्यावा,प्रेरणा द्यावी.
आयुष्यात इतरांना तीन गोष्टी कायम देत रहा
ज्ञान
मान
दान
ज्ञान,प्रेम व ताकद या तीन गोष्टी स्वतःजवळ बाळगा,जग तुमच्याकडे धावत येईल.
धन्यवाद !!
0
Answer link
व्यक्तिमत्व (Personality) म्हणजे व्यक्तीच्या विचार, भावना आणि वर्तणुकीची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत.
व्याख्या:
- ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार, व्यक्तिमत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीची वैशिष्ट्ये, जी तिला স্বতন্ত্র बनवतात.
- अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशननुसार, व्यक्तिमत्व म्हणजे विचार, भावना आणि वर्तणुकीचे ते विशिष्ट स्वरूप, जे एखाद्या व्यक्तीला कालांतराने आणि परिस्थितीत स्थिर ठेवते.
व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये:
- सामाजिकता
- भावनिक स्थिरता
- आत्मविश्वास
- प्रामाणिकपणा
- समजूतदारपणा
व्यक्तिमत्व जन्मजात आणि वातावरणातून मिळणाऱ्या अनुभवांवर आधारित असते.