2 उत्तरे
2
answers
गोमूत्रामध्ये असे कोणते तत्व असतात की ते पिकातील विषाणू मारतात?
3
Answer link
गाईचे मुत्र म्हणजे गोमूत्र. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे. भारतीय म्हणजे देशी गाईचे मूत्र (गोमूत्र) हे एक औषधी द्रव्य आहे, असे आयुर्वेद सांगतो. गोमूत्राचा आयुर्वेदात औषधी उपयोग केला जातो.
◆गोमूत्राच्या औषधी गुणधर्मासंबंधी काही आयुर्वेदिक प्रयोग
-गोमूत्राच्या सेवनाने मूत्रपिंडाचे रोग बरे होतात.-गोमूत्रातील एरिथ्रोपोईटिन हा घटक हाडातील मज्जा तत्त्वाला सक्रिय करून नवीन रक्तकणांची निर्मिती करतो.-गाईचे गोमूत्रच केवळ उपयुक्त आहे, असे नव्हे तर गाईचे दूध, तूप, दही, मूत्र आणि शेणही अत्यंत उपयुक्त आहे.-झाडे किंवा पिकांवर गोमूत्राची फवारणी केली तर असलेली कीड नष्ट होते किंवा कोणत्याही किडीपासून पिकांचे संरंक्षण होते.-पोटातील कृमीही गोमूत्र सेवनाने नाहीशा होतात.-गोमूत्र हे उत्तम रेचक म्हणूनही काम करते.-जखमेवर गोमूत्र लावले तर जखम पिकत नाही, लवकर बरी व्हायला मदत होते.-गोमूत्र हे एक उत्तम रेचक असून तो नियमित घेतले तर पोट साफ राहते.-गोमूत्रामध्ये ताम्र, लोह, कॅल्शियम, मॅगेनीज आणि अन्य सोळा प्रकारची खनिज तत्त्वे असून ती शरीराचे रक्षण, पोषण आणि विकासासाठी आवश्यक असतात.-गोमूत्राच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.-गोमूत्राचे वैज्ञानिक पृथ्थकरण केल्यानंतर त्यात नायट्रोजन, सोडियम, सल्फर, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅगेनीज, तांबे, चांदी, आयोडीन, शिसे, सुवर्णक्षार, अमोनिया, युरिया, युरीक ॲसिड अशी अनेक प्रकारची खनिज तत्त्वे आढळून आली आहेत.-मलावरोध, गुडघेदुखी, अपचन, कावीळ, कृमी, शारीरिक लठ्ठपणा, मधुमेह, त्वचारोग, रक्तदाब आदी विविध रोगांमध्येही गोमूत्र आणि त्यापासून तयार केलेली औषधे अत्यंत उपयुक्त ठरू शकतात.
गोमूत्र म्हणजे नेहमी देशी गायीचेच मूत्र होय. म्हशीच्या मूत्रामधे खालील गूण दिसून येत नाहीत.
◆आयुर्वेदात गोमूत्राचा संदर्भ
सुश्रुत संहिता, चरक संहिता, अमृतसागर, भावप्रकाश, अष्टांग संग्रह, आदी जुन्या ग्रंथांमधूनही गोमूत्र आणि पंचगव्याची माहिती व त्याचे औषधी उपयोग सांगितले आहेत.
गोमूत्रं कटू तीक्ष्णोष्णं सक्षारत्वान्नवातलम् । लघ्वग्निदीपनं मेध्यं पित्तलं कफवातजित् ।। शूलगुल्मोदरानाहधिरेकास्थापनादिषु । मूत्रप्रयोगसाध्येषु गव्यं मूत्रं प्रयोजयेत ।।
अर्थात
गोमूत्र हे कडू, उष्ण, खारट, तिखट, तुरट, लघु, अग्निदीपक, आणि वात व कफनाशक आहे.
◆व्यवसायिक उपयोग◆
गोमूत्र आणि पंचगव्यापासून गोमय शाम्पू, गोमूत्र अर्क, गोमूत्रासव, दंतमंजन, डोळ्यात घालण्यासाठी औषध, पायांच्या भंगांसाठीचे मलम, अंगाला लावायचा साबण आणि अन्य अनेक प्रकारची औषधे तयार केली जातात. अमेरिकेने आतापर्यंत गोमूत्राचे औषधी उपयोगासाठीचे सहा पेटंटे घेतली आहेत .
आयुर्वेदानुसार गोमूत्राचे गुण- तीक्ष्ण, लघु
रस- तिखट, कडू व तुरट
वीर्य- उष्ण, विपाक, कटु हे आहेत.
आताची बदलती जीवनशैली, यात आहारात विरुद्धान्नाचा वापर, फास्टफूड, जंक फूड, प्रीझर्वड फूड याचा वापर, यामुळे शरीरात कितीतरी विषद्रव्ये जातात व साठतात व त्याचे विसर्जन होत नाही. ते शरीरातून बाहेर काढण्याची शक्ती गोमूत्रात आहे. ते एक उत्तम Antioxident म्हणून काम करते. गोमूत्रावर बरेच संशोधन झालेले आहे.
१) गोमूत्रामध्ये विविध प्रोटिन्स, विटामिन्स असतात. ते शरीराची रोगप्रतिकारक क्षमता (Immunity Power) वाढविण्याचे काम करते.२) गोमूत्रात युरिक , युरिया, लॅक्टेट असतात. , ती शरीरात ऊर्जा उत्पन्न करतात.३) गोमूत्रात उपस्थित फिनािल पॅराक्रिसाल, कॅटकोल, अरसिनाल, हॅलोजनेटेड फिनाइल आणि फिनाईल फिनाइल याचे मिश्रण आहे. हे सर्व तत्त्व जीवाणुनाशक व विषाणुनाशक आहे. यामुळे गोमूत्र हे उत्तम जैवनाशक आहे. विविध संक्रामक रोगावर प्रभावी आहे.४) गोमूत्रात असलेल्या विविध एन्झाईन्स पचनक्रिया व्यवस्थित होण्यास मदत करतात तसेच ऊर्जा उत्पादनास मदत करतात.५) गोमूत्रात कॅन्सरविरोधी तत्त्व आढळलेले आहेत. गोविज्ञान अनुसंधान केंद्रातर्फे करण्यात येणार्या उपचारादरम्यान गोमूत्र अर्क कॅन्सरवर अतिशय प्रभावीपणे काम करते आहे आणि त्यामुळे अनेक रुग्ण लाभान्वित झालेले आहेत.६) विटामिन सी, विटामिन इ, विटामिन ए ही प्रमुख जिवनसत्वे गोमूत्रात आहेत.
0
Answer link
मला माफ करा, माझ्याकडे सध्या तरी याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही की गोमूत्रामध्ये असे कोणते तत्व असतात की ते पिकातील विषाणू मारतात. मी ह्याबद्दल अधिक माहिती शोधण्याचा प्रयत्न करेन.
I am unable to provide an answer regarding the element in cow urine that kills viruses in crops. I will try to find more information about this.