जमीन कृषी जमीन मोजणी

जमीन मोजणी कशी करावी?

2 उत्तरे
2 answers

जमीन मोजणी कशी करावी?

3
पैसा गुंतविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जमीन विकत घेणे. म्हणतात ना, सोन्याची विक्री हातोहात होते तर जमिनीची विक्री रातोरात होते. सांगायचे तात्पर्य हेच की, दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून स्वत:च्या मालकीची जमीन असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. माझी जमीन किती आणि कुठपर्यंत आहे ? याची प्रत्येकाला उत्सुकता असते. त्यासाठी आपण जमिनीची मोजणी करत असतो.

आपल्याकडे स्वत:च्या मालकीची अथवा वडिलोपार्जीत जमीन असेल तर त्याची मोजणी ही आपल्याला करावीच लागते. जमिनीची मोजणी कशी केली जाते ? दिवसेंदिवस जमिनीचा होणारा विकास, शहरीकरण, औद्योगिकरण अन्य विकासाची कामे यासाठी होणारा जमिनीचा वापर, तसेच आपापसातील हद्दीचे वाद सोडविण्यासाठी त्या जमिनीची प्रथम मोजणी करुन मूळ नकाशाच्या आधारे हद्दीच्या खुणा कायम करुन भूमापकाकडून दाखले दिले जातात.

मोजणीच्या अनुषंगाने विविध प्रकारचे अभिलेख तयार करुन त्यामध्ये मोजणीचे नकाशे तयार केले जातात त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडे त्यांचे संधारण केले जाते. जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे वादविवाद मिटविण्यासाठी भूमी अभिलेख व भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो.

जमीन मोजणीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार मोजणी फी भरुन त्याची नोंद मोजणी नोंदवहीत घेतली जाते. संबंधितधारकांना आगावू नोटीसद्वारे कळवून मोजणीची तारीख निश्चित केली जाते. ठरलेल्या दिवशी भूमापक जागेवर येऊन प्रत्यक्ष कब्जेदाराच्या मोजणी अर्जदार, लगत कब्जेदार व पंचमंडळी यांच्या समक्ष मोजणी कामास सुरुवात केली जाते. वहिवाटीच्या खुणांवर निशाण लावून त्याआधारे प्लेन टेबलवर ठेवलेल्या नकाशा शीटवर वहिवाटीची आकृती नगरभूमापन मोजणीत 1.500 या परिमाणात तर शेतजमिनीची मोजणी 1.1000 या परिमाणात तयार होते.

त्यानंतर मूळ अभिलेखाच्या आधारे वहिवाटीच्या नकाशावर सुपर इंपोज करुन नकाशावर हद्दीच्या खुणा निश्चित केल्या जातात आणि त्या नकाशाच्या आधारावर मूळ अभिलेखाप्रमाणे अर्जदारास हद्दीच्या खुणा कायम करुन प्रत्यक्ष जागेवर नव्याने दाखवल्या जातात. अशा प्रकारे जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण होते.

यापुढे जेव्हा आपण जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे वादविवाद मिटविण्यासाठी भूमी अभिलेख व भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जमीन मोजणीचा अर्ज कराल तेव्हा, या लेखात सांगितलेल्या पायऱ्या पूर्ण झाल्या की आपली नोंदणी पूर्ण झाली असे समजावे.

महसूल विभागाने या पुढे आपल्या भूमिसंदर्भातील सर्व अभिलेखांचे संगणकीकरण करण्याचेही काम हाती घेतले आहे. भूमापकांना प्रशिक्षण देण्यासाठी सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. प्रशिक्षण हे मनुष्यबळ विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. कौशल्य स्थापित करुन त्याचा विकास करण्याच्या दृष्टीने व अद्ययावत ज्ञानाशी सुसंगत राहण्यासाठी औरंगाबाद येथे भूमी अभिलेख प्रशिक्षण शाळा सन 1985 पासून स्थायी स्वरुपात सुरू आहे. कुशल व प्रशिक्षित भूमापक म्हणजे काम चोख व वेळेत होण्याची हमी आहे.
उत्तर लिहिले · 27/8/2022
कर्म · 1975
0
जमीन मोजणी कशी करावी यासाठी खालील माहितीचा वापर करू शकता:

जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया:

  1. अर्ज सादर करणे: जमिनीची मोजणी करण्यासाठी तुम्हाला संबंधित भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज सादर करावा लागेल.

  2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे:

    • आधार कार्ड
    • जमिनीच्या मालकीचे कागदपत्र (उदा. जमिनीचा उतारा, फेरफार)
    • ओळखपत्र
    • Index II
    • Moje Map
  3. शुल्क भरणे: अर्ज सादर केल्यानंतर, तुम्हाला मोजणी शुल्क भरावे लागेल.

  4. नोटीस: अर्ज मंजूर झाल्यावर, भूमी अभिलेख कार्यालय तुम्हाला मोजणीची तारीख आणि वेळ कळवेल. तसेच, शेजारील जमीन मालकांना नोटीस पाठवली जाते.

  5. मोजणी: ठरलेल्या तारखेला भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी जमिनीची मोजणी करतात आणि जमिनीच्या सीमा निश्चित करतात.

  6. अहवाल: मोजणी पूर्ण झाल्यावर, तुम्हाला मोजणी अहवाल दिला जातो.

हे लक्षात ठेवा:

  • अर्ज करण्यापूर्वी जमिनीच्या मालकीचे कागदपत्र तपासा.
  • मोजणीच्या वेळी स्वतः तिथे हजर राहा.
  • अहवाल मिळाल्यानंतर तो काळजीपूर्वक तपासा.

टीप: भूमी अभिलेख विभागाच्या नियमांनुसार आणि तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार प्रक्रियेमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी संबंधित कार्यालयातून अचूक माहिती घेणे महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1340

Related Questions

शेतीची मोजणी फी ऑनलाईन कशी भरायची?
माझ्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर 0.73.00 आर.चौ.मी असे आहे, तर माझी जमीन किती चौरस फूट आहे?
शेत जमिनीशी निगडीत 1.7 आणेवारी युक्त क्षेत्र म्हणजे किती चौरस मीटर होईल? याबद्दल माहिती हवी आहे.
21 आर म्हणजे किती जमीन?
एक एकर जमीन ही किती गुंठा असते?
0.40 म्हणजे किती एकर?
0.20 म्हणजे किती एकर?