भूगोल पर्यावरण पृथ्वी अतिनील किरणे

ओझोन वायूचा थर कोणत्या घातक किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो, त्या किरणांचे नाव काय आहे?

2 उत्तरे
2 answers

ओझोन वायूचा थर कोणत्या घातक किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो, त्या किरणांचे नाव काय आहे?

5
ओझोन वायूचा थर ज्या घातक किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो त्याला अतिनील किरण [Ultraviolet (UV) ray] असे म्हटले जाते.


अतिनील किरणे ही सूर्यप्रकाशात आढळणारी किरणे आहेत. त्यांची तरंगलांबी ही दृश्य प्रकाश किरणांपेक्षा छोटी म्हणजे १०० ते ४०० नॅनोमीटर असते. सूर्यप्रकाशाचा केवळ ७% भाग ह्या किरणांनी व्यापलेला असतो. वातावरणातील ओझोनचा थर अतिनील किरणांना पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यापासून थोपवतो. सूर्यप्रकाशाच्या वर्णपटातील जांभळ्या पट्ट्याच्या पलीकडचा, साध्या डोळ्यांनी न दिसणारा पट्टा म्हणजे अतिनील किरण अर्थात अल्ट्रा व्हायोलेट किरण. याची तरंग लांबी सु. ४००० ॲगस्ट्रॉम एककापर्यंत असते. यास जंबूपार किरण असेही म्हणतात. ही एक प्रकारची ऊर्जा आहे.

अधिक माहिती साठी विकिपीडिया 
उत्तर लिहिले · 18/8/2022
कर्म · 44255
0

ओझोन वायूचा थर पृथ्वीला अतिनील (Ultraviolet) किरणांपासून वाचवतो.

अतिनील किरणांचे प्रकार:

  • UVA: ही किरणे त्वचेला वृद्धत्व देतात.
  • UVB: ही किरणे त्वचेला भाजणे (sunburn) आणि त्वचेच्या कर्करोगास कारणीभूत ठरतात.
  • UVC: ही किरणे सर्वात धोकादायक असतात, पण ओझोनचा थर शोषून घेतो.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1740