2 उत्तरे
2
answers
वचनपत्र म्हणजे काय?
1
Answer link
वचनपत्र- वचनचिठ्ठी(Promissory Note)
भारतीय रिझर्व्ह बँकेने छापलेल्या भारताच्या नोटा या वचनचिठ्ठी या प्रकारच्या आहेत. नोटेवर लिहिलेला मजकूर "मै धारक को सौ रुपये अदा करनेका वाचन देता हु" हे पैसे देण्याचे वचन आहे.
वचनचिठ्ठी वर काही अटी नसतील तसेच विकता येणे शक्य असेल तर अश्या वचनचिठ्ठीला परक्राम्य संलेख (Negotiable Instrument) समजले जाते.
कर्ज व्यवहारात वचनचिठ्ठी
उधार घेतलेले पैसे ठराविक दराने परतफेड करण्याचे वचन देणाऱ्या दस्तऐवजास वचनचिठ्ठी (Promissory Note) असे म्हणतात. वचनचिठ्ठी हे न्यायालयात वैध असे प्रमाणक आहे. त्यामुळे कर्ज व्यवहार करताना बँक ऋणकोकडून वचनचिठ्ठी लिहून घेते
तपशील
१) वचनचिठ्ठी मध्ये ऋणको आणि धनको असे दोनच पक्ष नोंदवले जातात
२) वचनचिठ्ठीवर एक किंवा अनेक ऋणको सही करू शकतात
३) वचनचिठ्ठीवर योग्य रकमेचा रेव्हेन्यू तिकीट लावणे गरजेचे आहे. अशा व्यवहारासाठी आवश्यक असे सरकारी कर मूल्य भरलेले नसेल तर व्यवहार वैध मानला जात नाही.
४) वचनचिठ्ठीवर रक्कम, कर्ज घेतल्याची तारीख, परतफेडीची तारीख, व्याजाचा दर, ऋणकोच्या स्वाक्षऱ्या स्पष्टपणे नोंदवल्या जाणे आवश्यक आहे.
५) कर्जाची मुदत संपल्यावर तीन वर्षेपर्यंत कर्ज वसुलीसाठी न्यायालयात दावा करता येतो. तीन वर्षे उलटण्यापूर्वी ऋणकोने नवी वचनचिठ्ठी सही करून दिली तर दावा करण्याची मुदत वाढते.
धन्यवाद...!!
0
Answer link
वचनपत्र म्हणजे एक लेखी कागदपत्र, ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विशिष्ट रक्कम देण्याचे वचन देते. हे एक प्रकारचे कायदेशीर बंधन असते.
वचनपत्रात खालील गोष्टी नमूद केलेल्या असतात:
- वचन देणाऱ्या व्यक्तीचे नाव
- ज्याला वचन दिले आहे त्याचे नाव
- किती रक्कम देण्याचे वचन दिले आहे ती रक्कम
- वचन दिल्याची तारीख
- वचन देणाऱ्या व्यक्तीची सही
वचनपत्र हे एक महत्त्वाचे कायदेशीर document आहे, जे loan किंवा debt च्या व्यवहारात वापरले जाते.