भारत नौदल तंत्रज्ञान तंत्रज्ञान विज्ञान

भारताची पहिली आण्विक पाणबुडी कधी तयार झाली?

2 उत्तरे
2 answers

भारताची पहिली आण्विक पाणबुडी कधी तयार झाली?

2
आय.एन.एस अरिहंत (S-73) ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी व्हेसल या गटातील मोडणारी ही भारतीय बनावटीची आण्विक पाणबुडी आहे. भारताची ही पहिलीच आण्विक पाणबुडी असून यापूर्वी भारताने रशिया कडून आण्विक पाणबुडी भाडेतत्त्वावर घेतली होती.




                       आय.एन.एस. अरिहंतचे रेखाचित्र

अरिहंतचा अर्थ शत्रूचा नाश करणारी असा होतो. भारतीय नौदलाला अशा आण्विक पाणबुडीची जागतिक स्तरावर ठसा उमटवण्यासाठी तीव्र गरज होती. सुमारे तीस हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प यासाठी १९८० मध्ये सुरू झाला. दोन दशके या पाणबुडीची उभारणी चालू होती. ही उभारणी विशाखापट्टणम येथील गोदीत करण्यात आली.



धन्यवाद...!!
उत्तर लिहिले · 27/7/2022
कर्म · 19610
0

भारताची पहिली आण्विक पाणबुडी आय.एन.एस. अरिहंत (INS Arihant) 26 जुलै, 2009 रोजी सुरू झाली.

या पाणबुडीमुळे भारताची समुद्रातील सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2220

Related Questions

भारतातील पहिली आण्विक पाणबुडी कोणती?
भारताची पहिली आण्विक पाणबुडी कोणती?
पाणबुडीची माहिती मिळेल का?