2 उत्तरे
2
answers
मला मूळव्याधीचा खूप त्रास होतोय, कोणता उपाय करावा?
0
Answer link
: मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत भयंकर आहे. हा त्रास वेदनादायी असला तरीही या आजाराबद्दल फारसे खुलेपणाने बोलले जात नाही. परिणामी अनेकांमध्ये या त्रासाची तीव्रता वाढल्यानंतर वैद्यकीय मदत घेतली जाते. फास्टफूट, अरबट चरबट पदार्थ, मसालेदार पदार्थांवर ताव मारण्याची सवय यामुळे केवळ जीभेचे चोचले पुरवले जातात. मात्र खाण्याच्या अशा सवयींमुळे पचनाचे आजर बळावतात. मूळव्याध जडण्यामागेदेखील अशीच कारणं असतात.
मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी घरगुती उपाय -
सुरूवातीच्या टप्प्यामध्ये मूळव्याधीच्या समस्येकडे लक्ष दिल्यास त्याचे स्वरूप गंभीर होण्याचा धोका कमी असतो. याकरिता काही घरगुती उपायांनी त्यावर मात करता येऊ शकते.
कडुलिंब -
कडुलिंबाच्या लिंबोळ्या आणा. त्यावरील साल काढून आतील बीज काढा. हे बीज कुटून चिचुक्याऐवढ्या 21 गोळ्या करा. या गोळ्या नियामित दूधासोबत घ्याव्यात.
या उपायादरम्यान आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. मांसाहार, पचायला जड असणारे पदार्थ आहारात टाळा. यामुळे मूळव्याधीचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. आहारात 'या' भाजीचा समावेश कराल तर दूर होईल 'मूळव्याधी'ची समस्या !
घरगुती मलम -
रूईच्या पानांमधील चीक काढा. यामध्ये हळद मिसळून पेस्ट बनवा. या पेस्टचा केवळ एक ठिपका त्रास होत असलेल्या जागी लावा. नियमित सात दिवस हा उपाय करावा. यामुळे मूळव्याधीचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होईल.
:
जिरं -
जिरं भाजून त्याची पूड करावी. ही पूड गरम पाण्यात टाकून ते पाणी प्यायल्यास रात्री झोप झोपण्यापुर्वी घेतल्यास 3 ते 4 दिवसांत तुम्हाला आराम मिळेल. जिरं हे फायबर युक्त असून पोटातील वायू कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे मळ सैल होतो व शौचास साफ होते.जिरं - मूळव्याधीच्या समस्येवरील घरगुती उपाय
गुलाब -
मुळव्याधीवर गुलाब देखील उपयुक्त आहे. आश्चर्य वाटले ना? हो. 10-12 गावठी गुलाबाच्या ( सुरक्षित पद्धतीने वाढवलेल्या) पाकळ्या कुटून 50मिली पाण्यात टाकून सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास नक्किच आराम मिळतो.गरोदर स्त्रियांमधील 'हा' त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी गुलकंद फायदेशीर
दुर्वा -
स्त्रियांमध्ये मुळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी दुर्वा फार उपयुक्त आहेत . २ चमचे दुर्वा कुटून त्या कपभर गायीच्या दुधात उकळून घ्या. हे मिश्रण गाळून रोज घेतल्यास मुळव्याधीपासून आराम मिळेल.
कांदा -
मुळव्याधीच्या त्रासात जर रक्त पडत असेल तर कांद्याचा रस जरूर घ्या. यासाठी 30 ग्राम कांद्याचा रस व 60 ग्राम साखर एकत्र करून ते मिश्रण काही दिवसांसाठी दिवसातून दोनदा घ्या.
डाळींब -
डाळींबाच्या साली टाकाऊ नसतात . मुळव्याधीपासून आराम मिळवण्यासाठी डाळिंबाच्या सालीदेखील तितक्याच उपयुक्त आहेत.अर्धाकप उन्हात सुकवलेल्या डाळींबाच्या साली 30मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.त्यात 1 चमचा जिरं , 3/4 कप ताक व मीठ घालून मिश्रण एकत्र करा. मुळव्याधीपासून सुटका मिळवण्यासाठी हे मिश्रण आठवड्यातून तीन वेळेस घ्यावा.मूळव्याधीचा त्रास दूर करण्यासाठी केळं फायदेशीर
मूळा -
मुळव्याधीपासून आराम मिळवण्यासाठी तसेच पोट साफ़ होण्यासाठी मुळा फार उपयुक्त आहे. 60 ग्राम मुळ्याच्या ताज्या रसात मीठ घालून ते मिश्रण आठवड्यातून दोनदा सलग 40 दिवस घेतल्यास तुम्हाला आराम मिळेल.
तीळ -
तीळ कुटून त्याची पेस्ट मोडांवर लावल्यास , आराम मिळतो. तसेच अर्धा चमचाभर तिळ बटरमध्ये एकत्र करून खाल्ल्यानेदेखील आराम मिळतो.
बर्फ -
वेदना , सूज कमी करण्यासाठी बर्फाचा शेक फार हितकारी आहे. मूळव्याधीच्या त्रासात गुदद्वारापाशी वेदना होत असल्यास पाठीवर झोपून बर्फाचा जास्तीत जास्त १० मिनिटांसाठी शेक द्यावा.
0
Answer link
मूळव्याध (Piles/Hemorrhoids) एक वेदनादायक आणि त्रासदायक समस्या असू शकते. खाली काही उपाय दिलेले आहेत ज्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकेल:
- सफाई: गुद्द्वार (anus) क्षेत्र स्वच्छ आणि कोरडे ठेवा. सौम्य साबण आणि पाण्याने नियमितपणे धुवा आणि मऊ टॉवेलने कोरडे करा.
- बर्फ लावा: दिवसातून काही वेळा 10-15 मिनिटे बर्फाने शेक घ्या. यामुळे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होईल.
- सिट्झ बाथ (Sitz Bath): दिवसातून 2-3 वेळा 10-15 मिनिटांसाठी कोमट पाण्यात बसा. यामुळे गुद्द्वार भागाला आराम मिळतो.
- जास्त पाणी प्या: दररोज 8-10 ग्लास पाणी प्या. यामुळे मल নরম राहण्यास मदत होईल आणि शौचास करताना जोर येणार नाही.
- आहारात बदल करा: फायबरयुक्त (Fiber) आहार घ्या. फळे, भाज्या, आणि धान्य आपल्या आहारात समाविष्ट करा. यामुळे बद्धकोष्ठता टाळता येते.
- व्यायाम: नियमित व्यायाम करा. चालणे, योगा करणे किंवा इतर शारीरिक हालचालींमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि मूळव्याधीचा त्रास कमी होतो.
- औषधे: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मलई (Ointment) किंवा Suppositories वापरा. यामुळे वेदना आणि खाज कमी होण्यास मदत होते.
- बैठण्याची पद्धत: जास्त वेळ एकाच जागी बसणे टाळा. दर तासाला ब्रेक घ्या आणि थोडी हालचाल करा.