2 उत्तरे
2
answers
आपला माणूस कसा ओळखावा?
0
Answer link
माणूस ओळखणं म्हणजे समुद्राचा तळ गाठण्यासारखं आहे.
कधीकधी वरकरणी शांत वाटणाऱ्या समुद्राच्या गर्भातील ज्वालामुखीचा एकाएकी उद्रेक होतो आणि तो आसपासचा परिसर गिळंकृत करून टाकतो. तेव्हा विचार येतो, की हाच का तो समुद्र ज्याच्या रम्य किनारी बसून असंख्य जोडप्यांनी मावळत्या सूर्याच्या साक्षीने आयुष्यभर एकमेकांची सोबत निभावण्याच्या आणाभाका घेतल्या? याचे दाखले देऊन कवींनी कल्पनेचे मनोरे रचले, चिमुरड्यांनी वाळूचे कोपे केले, हाच का तो आपल्या भावविश्वातील समुद्र?
माणसाच्या मनाचंही तसंच आहे. संयमी माणसांच्या संयमाचा बांध तुटायला उत्कंठेचा, अगतिकतेचा, वासनेचा किंवा क्रोधाचा एक क्षणही पुरतो. मग, वर्षानुवर्षे ज्ञात असलेली माणसे नव्याने कळू लागतात. सतत वैराग्यरस आळवणाऱ्या माणसाला शृंगाराची स्वप्ने पडत नसतील का हो? बोलून चालून माणूसच तो.
मग माणूस ओळखायची मापदंडं आहेत तरी कोणती, हा प्रश्न उरतोच. बाजारात बरीच पुस्तके मिळतील आणि आसपास बरीच लोकं भेटतील जे या बाबतीत मार्गदर्शन करतील पण ही मनकवडी लोकं आणि उत्तम खलाशी हे फक्त त्यांच्या अनुभवावरून माणसाच्या मनाचा आणि समुद्राच्या तळाचा अंदाज लावत असतात. हे अंदाज 100 टक्के खरे असतीलच असं नाही.
माणूस ओळखणं इतकं सोपं असतं तर भावाने भावाचा, काकाने पुतण्याचा, मित्राने मित्राचा घात केला नसता, मुलाने दगडाखाली चिरडून आईबापाचा खून केला नसता आणि नराधम पित्याने मुलाच्या अट्टाहासापायी मुलीच्या नरडीचा घोट घेतला नसता.
निसर्गाचा नियम आहे, समुद्र असो वा माणूस, भरती आणि ओहोटी असणारच. ओहोटीला 4 पावलं नजीक आणि भरतीला 4 कोस दूर राहिलं तरच आपला फायदा होईल.
0
Answer link
उत्तरा AI नुसार, "आपला माणूस" कसा ओळखावा यासाठी काही गुणधर्म खालीलप्रमाणे दिले आहेत:
हे काही गुणधर्म आहेत ज्यांच्या आधारावर आपण आपला माणूस ओळखू शकतो.
- माणुसकी: ज्या व्यक्तीमध्ये आपल्याबद्दल सहानुभूती, प्रेम आणि आपुलकी असते, तो आपला माणूस असतो.
- समजूतदारपणा: जो व्यक्ती आपल्या भावना आणि गरजा समजून घेतो आणि आपल्याला समजून घेतो, तो आपला माणूस असतो.
- विश्वास: ज्या व्यक्तीवर आपण आंधळा विश्वास ठेवू शकतो आणि ज्याच्यावर आपण कोणतीही गोष्टshare करू शकतो, तो आपला माणूस असतो.
- आधार: जो व्यक्ती आपल्याला कठीण परिस्थितीत साथ देतो आणि आपल्याला मानसिक आणि भावनिक आधार देतो, तो आपला माणूस असतो.
- स्वीकार: जो व्यक्ती आपल्याला जसे आहोत तसे स्वीकारतो आणि आपल्याला बदलण्याचा प्रयत्न करत नाही, तो आपला माणूस असतो.