3 उत्तरे
3
answers
एकूण ऋतू किती व कोणते आहेत?
4
Answer link
वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर हे सहा ऋतू आहेत
सहा ऋतूचीं माहिती :-
- वसंत : चैत्र, वैशाख.
- ग्रीष्म : ज्येष्ठ, आषाढ
- वर्षा: श्रावण, भाद्रपद
- शरद : आश्विन, कार्तिक
- हेमंत : मार्गशीर्ष, पौष
-शिशिर : माघ, फाल्गुन
महिने आणि ऋतू यांच्या समीकरणातून विविध सण आणि व्रते भारतीय परंपरेत साजरी केली जातात.
वसंत ऋतूत गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, बुद्ध पौर्णिमा ,वसंत पंचमी ही व्रते साजरी होतात.
ग्रीष्म ऋतूत वटपौर्णिमा, आषाढी एकादशी अशी व्रते येतात.
वर्षा ऋतूत नारळी पौर्णमा, रक्षाबंधन, हरितालिका, गणेश चतुर्थी अशी व्रते केली जातात.
शरद ऋतूत देवीचे शारदीय नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा, दीपावली असे सण येतात.
हेमंत ऋतूत मार्गशीर्ष गुरुवार व्रत, दत्त जयंती ,मकर संक्रांती अशी व्रते केली जातात.
शिशिर ऋतूत माघी गणेश जयंती, होळी, रंगपंचमी असे सण व व्रते केली जातात.
0
Answer link
विविध ऋतू व त्यांची कार्ये सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा किंवा भेट द्या www.sopenibandh.com किंवा माझा आवडता ऋतू वाचा.
0
Answer link
भारतात मुख्यत्वे करून सहा ऋतू आहेत. ते खालील प्रमाणे:
- वसंत ऋतू (Spring): चैत्र आणि वैशाख (March-April)
- ग्रीष्म ऋतू (Summer): ज्येष्ठ आणि आषाढ (May-June)
- वर्षा ऋतू (Monsoon): श्रावण आणि भाद्रपद (July-August)
- शरद ऋतू (Autumn): आश्विन आणि कार्तिक (September-October)
- हेमंत ऋतू (Late Autumn): मार्गशीर्ष आणि पौष (November-December)
- शिशिर ऋतू (Winter): माघ आणि फाल्गुन (January-February)