ऋतू
            4
        
        
            Answer link
        
            
        वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर हे सहा ऋतू आहेत
        सहा ऋतूचीं माहिती :-
- वसंत : चैत्र, वैशाख.
- ग्रीष्म : ज्येष्ठ, आषाढ
- वर्षा: श्रावण, भाद्रपद
- शरद : आश्विन, कार्तिक
- हेमंत : मार्गशीर्ष, पौष
-शिशिर : माघ, फाल्गुन
महिने आणि ऋतू यांच्या समीकरणातून विविध सण आणि व्रते भारतीय परंपरेत साजरी केली जातात.
वसंत ऋतूत गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, बुद्ध पौर्णिमा ,वसंत पंचमी ही व्रते साजरी होतात.
ग्रीष्म ऋतूत वटपौर्णिमा, आषाढी एकादशी अशी व्रते येतात.
वर्षा ऋतूत नारळी पौर्णमा, रक्षाबंधन, हरितालिका, गणेश चतुर्थी अशी व्रते केली जातात.
शरद ऋतूत देवीचे शारदीय नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा, दीपावली असे सण येतात.
हेमंत ऋतूत मार्गशीर्ष गुरुवार व्रत, दत्त जयंती ,मकर संक्रांती अशी व्रते केली जातात.
शिशिर ऋतूत माघी गणेश जयंती, होळी, रंगपंचमी असे सण व व्रते केली जातात.
            3
        
        
            Answer link
        
            
        गवत, झाडे रात्रीला जास्त थंड होतात. सूर्य जसजसा वर येतो तसतशी उष्णता वाढते आणि मग दवबिंदूंचे बाष्पीकरण होते, ते हवेत मिसळतात. ' मोरे सरांनी माहिती पूर्ण केली, तेवढ्यात माईताई कॉफी घेऊन हजर झाल्या.
        
हवेत बाष्प असते.
आपल्या आसपासचे तलाव, नदया आणि सागर यांच्यातील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात पाण्याचे बाष्प असते. आणि हि जी बाष्पयुक्त हवा असते, ती जमिनीपासून वरती-वरती जात असते. उंचावर गेल्यावर हवेचे तापमान कमी होते व हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन त्यांचे सुक्ष्म-सूक्ष्म जलकण तयार होतात.
( सांद्रीभवन क्रियेद्वारे बाष्पाचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते.. )
गवताच्या पात्यांवरील हे पाणी म्हणजे हिवाळ्यात हवेचे तापमान कमी झाल्याने भूपृष्ठावरील हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन तयार झालेले जलबिंदू आहेत, जे थंड वस्तूंवर दवबिंदूंच्या रूपात दिसत आहे.
            5
        
        
            Answer link
        
            
        याचे कारण तुम्ही यावरून समजू शकता की आपल्यापेक्षा एक तास अगोदर तिकडे होतो. त्याच्या नंतर एक तास आपल्याकडे होतो. म्हणजेच काय तर त्यांच्याकडे एक वाजता, तेव्हा आपल्याकडे बारा वाजलेले असतात आणि त्यांच्याकडे जेव्हा बारा वाजलेले असतात, तेव्हा आपल्याकडे अकरा वाजलेले असतात. म्हणजे त्यांच्या पेक्षा एक तास आपण मागे असावेत आणि आपल्याकडे जे ऋतू असतात, ते त्यांच्यापेक्षा आपल्याकडे त्यांच्यानंतर असावेत, म्हणून अशी परंपरा लागू झालेली आहे.