ध्वनी विज्ञान

नादाचा मुख्य गुणधर्म कोणता?

2 उत्तरे
2 answers

नादाचा मुख्य गुणधर्म कोणता?

0

नादाचा मुख्य गुणधर्म “ऐकू येणे” हा आहे. एकच नाद वेगवेगळा ऐकू येतो. त्याचे कारण नादाचे गुणधर्म आहेत. 

नादाची उच्चनीचता. 
नादाची घनता.
नादाची जाती.
नाद ह्या तीन मुलभूत गुणधर्मांवर अवलंबून आहे. नाद तीन प्रकारांनी उत्पन्न होऊ शकतो. १. दोन पदार्थ एकमेकांवर आपटल्याने. २. दोन पदार्थांच्या घर्षणाने आणि ३. पदार्थात हवा भरल्याने. पैकी कोणत्याही क्रियेने नाद उत्पन्न होतो. ह्या क्रियेत पदार्थातील कणात गती येते, ते कण जागच्या जागी, मागे पुढे, वर खाली हालचाल करू लागतात. एक कण दुसऱ्या कणाला धक्का देतो आणि तो हलू लागतो. याप्रमाणे हि हालचाल सुरु झाली, की कंपनं , तरंग उत्पन्न होतात. ते हवेत कंपनरुपाने प्रकट होतात आणि कण प्रवास न करता कंपनं प्रवास करायला लागतात. हि कंपनं श्रवणेंद्रियाच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पोचतात. आणि त्याची संवेदना नादात होते. ही नादाची शास्त्रीय संकल्पना. हि कधी अनियमित, लहानमोठी, विस्कळीत असली तर कधी आपल्याला गोंगाट, गलबला, या स्वरूपातून फक्त ‘ध्वनी’ ह्याच स्वरूपातून प्रकट होतो. पण जी कंपनं नियमित व लयबद्ध झाली तर ती संगीतात ‘नाद’ ह्या नावारुपाने प्रकट होतात. या नादाची लयबद्धता इतकी असते की, त्याच्या श्रवणाने मन तन्मय आणि एकाकार बनते. आणि नादमोह हा एक मानसिक विकार बनतो. ह्या नादमोहामुळे क्वचित प्रसंगी मन एकाग्र होऊन समाधी लागते. म्हणून नादाला नादब्रह्म असे म्हटले जाते. नादाच्या वाटचालीत ध्वन – ध्वनी – नाद – नादमोह आणि एकाग्रता (नादानुसंधान) आणि समाधी अशी एक श्रुंखला बनते.

नादाचे आहत आणि अनाहत असे दोन प्रकार पडतात. जे आघातादी क्रियेशिवाय जो नाद उत्पन्न होतो तो अनाहत नाद. त्याला सुक्ष्म-नाद असेही म्हणतात. अनाहत नाद हे अखंड चालू असलेले ध्वनी असून जे फक्त मन शांत झाल्यावर म्हणजेच ते संपूर्णपणे सामरस्याने भरून गेल्यावर म्हणजेच उच्च असे आत्मज्ञान गवसल्यावर किंवा कुंडलिनी जागृत झाल्यावरच ऐकू येतात. म्हणजेच उच्च अशी अवस्था प्राप्त झाल्यावरच हे अखंड सुरु असलेले ध्वनी जे ईश्वर असल्याची खूण पटवून देतात ते ऐकू येतात, एरव्ही नाही. म्हणून ह्या आवाजालाच, ह्या नादाला ‘ब्रह्म’ म्हटले आहे. जसे ‘शब्दब्रह्म’ म्हणजे शब्दरूपात असलेले ब्रह्म म्हणजेच ज्याला आपण ‘वेद’ म्हणतो जे आपण डोळ्यांनी बघून मुखाने वाचू शकतो आणि ‘नादब्रह्म’ म्हणजे नादस्वरूपात असलेले ब्रह्म जे आपण कानाने ऐकू शकतो. हे अनाहत नाद हंस-उपनिषेदामध्ये दहा आहेत असे सांगितले आहेत, ह्याहून जास्तही असू शकतात. ते पुढीलप्रमाणे: चीणी(चिणका, फणकार), चिणचिणि(रातकिडयाच्या शब्दासारखा), घंटा, शंख, तंत्री(तंतुवाद्यातील तार), ताल, वेणु(वेळु), मृदंग, भेरी व मेघ.

हा नाद ऐकू येण्यासाठी मन एका तरल अवस्थेत नेण्याची आवश्यकता आणि क्षमता हवी. ह्याची प्रचिती केवळ तपश्चर्येने साध्य करता येते. समाधी अवस्था साध्य असणाऱ्या साधू संत योगी लोकांनाच हा नाद ऐकू येऊ शकतो. या नादाचा संगीताशी तसा काही संबंध नाही. आघातादी क्रियांनी जो नाद होतो तो आहत नाद श्रवणगोचर असून त्याचा संगीताशी सरळ संबंध आहे. 

नादामुळे पशु पक्षी, झाडे- पाने आकर्षित होतात ह्याची कित्येक शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध केलेली अनेक उदाहरणे आहेत. पण पशु आणि माणूस यांच्यातला मोठा फरक म्हणजे माणसाची विचार करण्याची क्षमता आणि नवनिर्मितीचे सामर्थ्य. माणसाने नादाचा अभ्यास केला. संगीताचे शास्त्र तयार झाले. फक्त भारतीय नाही चीनमध्ये संगीताचे शास्त्र वेगळे, पाश्चात्य संगीतात शास्त्र वेगळे. आणखी विविध भागात संगीत वेगळे. पण त्यात नादाकृतीच असतात. नादाच्या सुखद संवेदनेत बौद्धिक आनंदाची भर पडत राहिली. आणि शास्त्राच्या आधारे नादाच्या सौंदर्यात वैविध्य येत राहिले. 

हे एव्हढ्यासाठी सारे जाणून घ्यायचे की सुख संवेदनेखेरीज नादामध्ये खूप काही आहे. उदंड आहे. या अधिकाधिक सौंदर्याचा शोध रसिक घेत राहतात, घेत राहतील. जणू त्यांना तो ‘नाद’च लागतो. असा हा नादातून नादाचा घडणारा सांगीतिक प्रवास! तो जसजसा माझा होतोय, आणि यापुढेही होत राहिल, तसाच तो तुम्हां रसिकांचा, वाचकांचा उत्तरोत्तर नादमय व्हावा हेच एक मागणे त्या नादब्रह्माशी मागून हा लेख संपवतो.

ॐकार अनादि अनंत अथांग अपरंपार ।

नादब्रह्म परमेश्वर सगुण रुप साकार ॥

उत्तर लिहिले · 4/7/2022
कर्म · 53720
0

ध्वनीचा मुख्य गुणधर्म खालीलप्रमाणे:

  • तीव्रता: ध्वनी किती मोठा आहे हे यावरून ठरते.
  • पिच (pitch): ध्वनी किती उंच किंवा नीचा आहे हे यावरून ठरते.
  • गुणवत्ता: ध्वनीचा विशिष्ट आवाज (unique sound) असतो.

हे गुणधर्म एकत्रितपणे ध्वनीची ओळख आणि अनुभव निर्धारित करतात.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

Encyclopaedia Britannica - Sound
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040

Related Questions

खरी प्रतिमा कोणत्या प्रकारच्या आरश्यात दिसते?
दूध कशामुळे बनते?
अतिनील किरणांना बघून डास आकर्षित होतात का?
केवळ प्रात्यक्षिकाचा प्रयोग?
केशिकत्व म्हणजे काय?
जैवतांत्रज्ञानाचा इजतहास स्पष्ट करा?
हायड्रंट म्हणजे काय?