शिक्षण शिक्षक कर्तव्ये

शिक्षक व मुख्याध्यापकांची कर्तव्य कोणती आहेत?

3 उत्तरे
3 answers

शिक्षक व मुख्याध्यापकांची कर्तव्य कोणती आहेत?

0
उपमुख्याध्यापकाची कर्तव्ये

उपमुख्याध्यापक हा स्वतः ज्या वर्गाला किवा वर्गाना शिकवितो त्या वर्गाच्या बाबतीत शिक्षक म्हनून पार पाडावयाच्या त्याच्या कर्तव्य व्यतिरिक्त आणि मुख्याध्यापकाने वेळोवेळी प्रसुत केलेल्या अशा कोणत्यही सुचानच्या अधीनतेणे

१) उपमुख्याध्यापकाडे जो वर्ग किवा जे वर्ग असतील त्यांच्या संबंधातील त्यांची कर्तव्य पार पाडण्याच्या कामी तो मुख्याध्यापकास साहय्य करील.

२) आपल्या खात्यातील शिक्षकांच्या संबंधात तो रोज वही ठेवील प्रत्येक आठवड्यात किमान एक पर्यवेक्षक किवा शिक्षकांच्या पाठाचे निरीक्षण करील आणि त्याच्या अभिलेख ठेवील आणि पर्यवेक्षकाच्या तयार केलेल्या रोज वहीची नियतकालिक तपासणी करेल.

३) शाळा प्रमुख देईल अश्या सूचनांच्या अधिनतेने आपल्या खात्यातील शिक्षकांनी केलेल्या कार्याचे निरीक्षण करील आणि त्याची वर्तुणूक शिस्तपालन आणि कार्यक्षमता यासाठी जबाबदार राहील.

४) शासनाणे आयोजित केलेल्या कोणत्याही परीक्षेसाठी आणि एस एस सी एच एस सी. महाराष्ट्र मंडळाकडून नीयुक्ती केल्या गेल्यास परिक्षा चालक किवा परीक्षा उपचालक किवा पर्यवेक्षक काम पाहिलं कार्यश्यमता आणि शिस्तपालन यासाठी तो जबाबदार राहील

५) शासनाने आयोजित केलेल्या परीक्षेसाठी एस एस सी एच एस सी साठी प्राथमिक, सामिषक परीक्षक इ कामे करील किया तज्ज्य म्हणून काम करील. आणि शासनाकडून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ किवा विभागीय मंडळ याच्याकडून सोपण्यात येतील अशी अन्य कामे करील आणि याबाबत शासनाने किवा मंडळाने त्या सदर्भात विहित केलेल्या नियमानुसार कार्यक्षमता आणि शिस्त पालन यासाठी तो जबाबदार राहील

६) मुख्याध्यापक शिक्षण समधाने त्यास सांगेल अशी इतर कामे करील आणि त्या सम्बंधी तो देईल अशा सुचनाचे पालन करील

७) शाळा प्रमुखाच्या निदेशानुसार शाळेच्या एका पाळीकरिता जबाबदार राहील ८) दिशा निर्देशन (ओरिएनटेशन) पाठ्यक्रम शिकून घेईल आणि ते येश्स्वीरित्या पूर्ण करील.
९) शिक्षण व शाळेचे प्रशासन या सम्बधाने मुख्याध्यापक त्यास वेळोवेळी सांगले अशी कामे करील आणि त्या सम्बंधि तो देईल अशा सुचनाचे पालन करील पर्यवेक्षकाची कर्तव्य

पर्यवेक्षक हा स्वतःच्या ज्या वर्गाला किवा वर्गाना शिकवितो त्या वर्गाच्या बाबतीत शिक्षक म्हनून पार पाडावयाच्या त्याच्या कर्तव्य व्यतिरिक्त आणि मुख्याध्यापकाने किवा वेळोवेळी प्रसुत केलेल्या अशा कोणत्यही सुचानच्या अधीनतेणे

१) पर्यवेक्षकाकडे जो वर्ग किवा जे वर्ग दिलेले असतील त्यांच्या संबंधातील कर्तव्य पार पाडावयाच्या कामी

मुख्याध्यापकास किया उपमुख्याध्यापकास साहय्य करील. २) आपल्या अखात्यातील रोजवही ठेवील

३) आठवडयातुन किमान एगदा एका शिक्षकाच्या पाठाचे निरीक्षण करील आणि त्याचा अभिलेख ठेवील ४) मुख्याध्यापकास व उपमुख्याध्यापकास देईल अशा सुचानाच्या अधीनतेणे आपल्या अखात्यातील शिक्षकानी केलेल्या कामाचे पर्यवेक्षण करील आणि त्याची वर्तुनक शिस्त पालन आणि कार्यक्षमता याबद्दल तो जबाबदार असेल

५) मुख्याध्यापकास व उपमुख्याध्यापकास शिक्षण संबधाने त्यास सांगेल अशी कामे करील आणि त्या संबंधी तो देईल अशा सुचानाचे पालन करेल

६) दिशा निर्देशन (ओरिएनटेशन) पाठ्यक्रम शिकून घेईल आणि ते येश्स्वीरित्या पूर्ण करील

•शिक्षकाची कर्तव्य

मुख्याध्यापकास व उपमुख्याध्यापकास / पर्यवेक्षक वेळोवेळी देईल अशा सुचानच्या अधीनतेणे शिक्षक १) आपल्या हवाली असलेल्या विध्यार्थी यांचे शिक्षण कार्यक्षम रीतीने आणि प्रभावी पणे होण्यास जबाबदार असेल २) शाळेत वक्तशिरपणे हजर राहील आणि विहित करण्यात आलेल्या शाळेच्या तासामचे शाळेत उपस्थित राहील. अद्यापन / वगार्थे काम या कड़े संपूर्ण लक्ष पुरवील आणि महिन्यच्या शेवटच्या दिवशी संपलेल्या महिन्यच्या नोंद वह्या पूर्ण करण्यासाठी पुढील महिन्यासाठी नोंदवह्या तयार करण्यासाठी आणि मुख्याध्यापकास आवश्यक असेल त्या प्रमाणे इतर मासिक नौद वह्या व अहवाल तयार करण्यासाठी कमीतकमी ३ तास इतका वेळ देईल.१३) कामाच्या असलेल्या प्रत्येक्ष आराखड्या प्रमाणे काम करील आणि त्यात कोणत्याही त्रुटी राहिल्या तर प्रत्येक महिन्याच्या अखेरीस संबधित मुखाध्यापक किंव्हा उपमुखाध्यापक, पर्यवेक्षक याच्याशी विचार विनिमय करून असलेल्या त्रुटी किव्हा उणीवा दूर करणेसाठी उपाय योजिले

१४] विद्यार्थ्याना आठवड्यात अभ्यास नेमून देईल त्यामुळे संपूर्ण वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयातील आठवड्याची म्हणून 30 नेमीन अभ्यासकामे पूर्ण करणे शक्य होईल. परंतु एखाद्या विषयांचा एक भाग नेमून दिलेला असेल.

उदा:- सामाजिक अभ्यास (सोशल स्टडीज) विषयापैकी इतिहास / भूगोल अथवा भौतीक विज्ञानापैकी भौतीकशाख किंव्स रसायनशास्ख इ. तर अन्य बाबतीत त्या विशिष्ट भागाच्या बाबतीत नेमीव अभ्यासक्रमाची संख्या तेवढ्या प्रमाणांत कमी होईल.

[१५] विद्यार्थ्याला नेमून दिलेल्या सामान्यपणे एक आठवड्याआड अशा आठवड्याच्या गृहपाठांची चिकित्सकपणे तपासनी करील. वर्गामध्य ५० पेक्षा अधिक विद्यार्थी असतील तर त्या शिक्षकाचे संपूर्ण वर्षामध्य १५ च्या एवजी १२ गृहपाठ तपासले तरी चालेल.

[१६] प्रत्येक सत्रामध्ये प्रश्नपत्रिका तयार करून एक वस्तुनिष्ठ पद्धतीची चाचणी घेईल. आणि पंधरवाड्याच्या आत

तपासणी केलेल्या उत्तरपत्रिका विद्याथ्र्यांना परत करील.

१७] मुख्याध्यापकाने तयार केलेल्या आराखड्याप्रमाणे त्याला नेमून दिलेल्या विषयामधील सहामाही आणि इतर परीक्षांच्या प्रश्नपत्रिका काडील आणि उत्तरपत्रिका विवेकबुद्धीने तपासिल

१८) शासनाने आयोजित केलेल्या कोणल्याही परिक्षेसाठी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किया उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किवा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किवा विभागीय मंडळात नियुक्ती केला गेल्यास परिक्षाचालक किया परिक्षाउपचालक म्हणून काम पाहिल आणि शासनाने मंडळानी संबंधीत परिक्षेसाठी विहित केलेल्या नियमानुसार कार्यक्षमता आणि शिस्तपालन यासाठी तो जबाबदार राहील

१९) शासनाने आयोजित शासनाने आयोजित केलेल्या कोणत्यही परिक्षेसाठी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किया उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किया उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षासाठी परीक्षा किया सधायक परीक्षक / नियामक / प्रमुख नियामक /प्रशानिक / म्हणून काम करील आणि शासनाकडून आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किवा विभागीय मंडळात यांच्याकडून सोपवण्यात येईल असे अन्य काम करील आणि याबाबत शासनाने किया मंडळाने त्या सादर्भातविहित केलेल्या नियमानुसार कार्यक्षमता आणि शिस्तपालन यासाठी तो जबाबदार राहील.

[२०] दिननिदेशन पाठ्यक्रम शिकून घेईल आणि तो यशस्वीपणे पूर्ण करील. २१] कामाच्या आणि उपस्थितीच्या विहित वेळामध्ये मुखाध्यापक किव्हा उपमुखाध्यापक किंव्हा पर्यवेक्षक त्यास शिक्षणासंबधाने सांगेल अशी इतर कामे करेल आणि त्यासंबंधी तो देईल त्या सूचनांचे पालन करील.
अ३] विद्यार्थ्याच्या उपस्थितिचा अभिलेख ठेवील.

४] आपल्या शाळेतील उपस्थिती कायम ठेवण्यासाठी त्यात सुधारणा करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करीन

५] आपल्या हवाली असलेल्या विद्यार्थ्यांची कोणतीही फी असल्यास ती वसूल करील आणि मुख्याध्यापक निर्देश देईल त्या प्रमाणे अशा फी ची वसूल झालेली रक्कम त्यांच्या पुढे सुपूर्त करीन

६] मुख्याध्यापकस आवश्यक असेल त्या प्रमाणे आवश्यक त्या नोंदवह्या आणि इतर अभिलेख बिनचूक व्यवस्थित

ठेवण्यास तो जबाबदार असेल.

[७] शळेच्या कामाचे सर्व साधारण आयोजन करणे, नियात्कालीन व सहामाही परीक्षा घेणे सहशालेय कार्यक्रम आयोजित करणे. याबाबतीत उपमुख्याध्यापाकास आवश्यक असेल त्या प्रमाणे त्याला मदत करील.

८] विद्यार्थ्यामध्ये स्वच्छता व टापटीप या सवयी लावण्यास आणि शिस्तबध्द वर्तनाबद्दल आदरभावना जोपासण्यास जबाबदार राहील त्या प्रयोजनासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होईल.

९] आपल्या विद्यार्थ्यामध्ये जातीय सलोखा व सदभाव वाढीला लावील आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर त्याचा धर्म,

जात, समाज यांच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही अशी खबरदारी घेईन

१०] शैक्षणिक वर्षाच्या अगदी प्रारंभी आणि शक्यतो तोवर शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यापासून एका आठवड्यात

विषयावर आणि वर्गावर वार्षिक घटक योजना तयार करीन. १९] आपला अध्यापन कार्यक्रम तयार करील. आणि खाली दर्शवल्याप्रमाणे त्याची साक्षिपात नोंद ठेवीन

अ] [एक]तारीख [दोन]वर्ग, [तीन] विषय

ब] अध्यापनाच्या कालावधीमध्ये शिकवावयाचा घटक [पूर्ण करावयाचा अभ्यासक्रम ]

क] अभ्यास विषयाच्या स्वरूपावर अवलंबून ज्यावर जोर देणे आवश्यक आहे. अशे शब्द, वाक्यप्रयोग,वाक्यप्रचार, कल्पना, तत्वे, घटना, यासारखे ठळक मुद्दे

ड] अध्यापनाची साधने किंवा प्रयोग निर्देशन, कोणतीही असल्यास

इ] लिखाणाचे काम, पठन, ठळक वाचन यासारख्या गृहपाठाचे स्वरूप

१२] विशेषता भूगोल इतिहास विज्ञान, गणित, वाड्मय, इ. सारख्या विषयामधील घटक सादर करताना शाळेत उपलब्ध असलेल्या अध्यापन / अध्ययन सामग्रीचा वापर करील. विज्ञान शिक्षक विहित अभ्यासक्रमाबर हुकुम सर्व प्रयोग करून दाखविण, आणि विद्यार्थ्याकडून सर्व प्रात्यक्षिकाचे काम करून घेईल.
उत्तर लिहिले · 2/7/2022
कर्म · 53750
0

नवीन शिक्षण पद्धतीत शिक्षक व विद्यार्थ्यांची भूमिका
उत्तर लिहिले · 10/7/2022
कर्म · 0
0

शिक्षकांची (शिक्षक) आणि मुख्याध्यापकांची (मुख्याध्यापक) कर्तव्ये खालीलप्रमाणे आहेत:

शिक्षकांची कर्तव्ये:

1. अध्यापन आणि मार्गदर्शन:

  • विद्यार्थ्यांना विषयांचे ज्ञान देणे आणि अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण देणे.
  • विद्यार्थ्यांना त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात मदत करणे.
  • अभ्यासात मार्गदर्शन करणे आणि त्यांना चांगले गुण मिळवण्यास प्रोत्साहित करणे.

2. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन:

  • विद्यार्थ्यांची नियमितपणे परीक्षा घेणे आणि त्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करणे.
  • गृहपाठ तपासणे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका सुधारण्यास मदत करणे.
  • पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल माहिती देणे.

3. व्यक्तिमत्व विकास:

  • विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना चांगले नागरिक बनण्यास प्रवृत्त करणे.
  • त्यांच्यातील कला आणि क्रीडा गुणांना वाव देणे.
  • विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांची शिकवण देणे.

4. शाळेतील सहभाग:

  • शाळेच्या कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेणे.
  • शाळेच्या नियमांचे पालन करणे आणि इतरांना त्याचे पालन करण्यास प्रोत्साहित करणे.
  • शाळेला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मदत करणे.

5. व्यावसायिक विकास:

  • नवीन शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञान आत्मसात करणे.
  • शैक्षणिक परिषदा आणि कार्यशाळांमध्ये भाग घेणे.
  • स्वतःच्या ज्ञानात सतत भर घालणे.

मुख्याध्यापकांची कर्तव्ये:

1. शाळेचे व्यवस्थापन:

  • शाळेचे कामकाज सुरळीतपणे चालवणे.
  • शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आणि त्यांच्या कामाचे वाटप करणे.
  • शाळेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करणे.

2. शैक्षणिक नेतृत्व:

  • शिक्षकांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • शाळेच्या शैक्षणिक धोरणांचे नियोजन करणे आणि अंमलबजावणी करणे.
  • नवीन शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञान शाळेत लागू करणे.

3. विद्यार्थ्यांचे कल्याण:

  • विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि आनंदी वातावरण निर्माण करणे.
  • विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.
  • पालकांशी नियमित संपर्क साधणे आणि त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल माहिती देणे.

4. शाळेची प्रतिमा जपणे:

  • शाळेची प्रतिमा समाजात चांगली ठेवणे.
  • शाळेतील कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करणे.
  • शाळेला देणगी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे.

5. शासकीय नियमांचे पालन:

  • शिक्षण विभागाच्या नियमांनुसार शाळेचे कामकाज चालवणे.
  • शाळेचे अहवाल नियमितपणे सादर करणे.
  • शाळेच्या नोंदी अद्ययावत ठेवणे.

टीप: शिक्षकांची आणि मुख्याध्यापकांची कर्तव्ये शाळा आणि शिक्षण प्रणालीनुसार बदलू शकतात.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5160

Related Questions

कुटुंबप्रमुखांच्या जबाबदाऱ्या कोणत्या?
परस्परांशी जोडलेल्या अनेक भूमिकांना ...म्हणतात?
प्रकारांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काय आहेत?
शिक्षण हक्क कायद्यानुसार मुख्याध्यापकांना येणारी कर्तव्ये कोणती?
शिक्षण हक्क कायद्याने निश्चित केलेले मुख्याध्यापकाची कर्तव्ये काय आहेत?
मुख्याध्यापकाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या काय आहेत?
शिक्षण हक्क कायद्याने निश्चित केलेल्या मुख्याध्यापकाच्या कर्तव्य व जबाबदारी नमूद करा शाळास्तरावर त्या पार पडताना येणाऱ्या अडचणी लिहा.?