व्यायाम शारीरिक व्यायाम आरोग्य

व्यायामाचे फायदे कोणते आहेत?

2 उत्तरे
2 answers

व्यायामाचे फायदे कोणते आहेत?

3
व्यायामाचे फायदे
व्यायामामुळे शरीर निरोगी आणि बांधेसूद बनते.

• रोज व्यायाम करण्यामुळे शरीरावर चांगले परिणाम होतात. खूप

• रोजच्या व्यायामामुळे स्नायूंची (मसल्सची) शक्ती, लवचिकता वाढते. मसल्स मजबूत बनतात.

हाडे मजबूत व बळकट होतात. त्यामुळे

भविष्यात हाडे पोकळ होण्याचा ऑस्टियोपोरोसिस हा आजार टाळण्यास

मदत होते.

• नियमित व्यायामाने सांध्यांची हलाचाल योग्यरीत्या होते. त्यामुळे संधिवात, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका कमी होतो.

शरीरातील चरबीचे प्रमाण नियंत्रित राहते.

शरीराच्या चयापचयाच्या गतीमध्ये सुधारणा होते.
• हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. पर्यायाने स्टॅमिना वाढतो.

व्यायामामुळे शरीर मजबूत होते, बलाची वाढ होते पर्यायाने रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते.

रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते.

• नियमित व्यायामाने कोलेस्टेरॉल कमी होते.

मानसिक तणाव कमी होतो. मन ताजेतवाने, प्रसन्न बनते. व्यायामामुळे तुमचा मूड सुधारतो आणि नैराश्य, चिंता आणि ताणतणाव कमी होतो.

व्यायामामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते तसेच स्मरणशक्तीही वाढते.

व्यायामामुळे आळस नाहीसा होतो.

झोप व्यवस्थित लागते.

• कार्य करण्याची स्फुर्ती मिळते, आत्मविश्वास

• उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा या सर्व विकारांपासून दूर राहण्यास व्यायामामुळे मदत होते.
उत्तर लिहिले · 25/6/2022
कर्म · 53750
0

व्यायामाचे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत. काही महत्त्वाचे फायदे खालीलप्रमाणे:

  1. शारीरिक फायदे:
    • वजन नियंत्रण: व्यायाम अतिरिक्त कॅलरीज बर्न करतो, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
    • हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते: नियमित व्यायामामुळे हृदय मजबूत होते, रक्तदाब कमी होतो आणि हृदयविकारांचा धोका कमी होतो. American Heart Association
    • हाडे आणि स्नायू मजबूत होतात: व्यायाम हाडांची घनता वाढवतो आणि स्नायूंना बळकट करतो, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस (osteoporosis) सारख्या आजारांपासून बचाव होतो.
    • रोगप्रतिकारशक्ती वाढते: नियमित व्यायामामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
    • मधुमेह नियंत्रण: व्यायाम रक्तातील शर्कराची पातळी (blood sugar level) नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. American Diabetes Association
  2. मानसिक फायदे:
    • तणाव कमी होतो: व्यायामामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत राहते.
    • नैराश्य कमी होते: नियमित व्यायाम नैराश्याची लक्षणे कमी करण्यास मदत करतो.
    • झोप सुधारते: व्यायामामुळे रात्रीची झोप शांत आणि चांगली लागते.
    • आत्मविश्वास वाढतो: नियमित व्यायाम केल्याने शारीरिक क्षमता सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो.
    • एकाग्रता वाढते: व्यायामामुळे मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो आणि एकाग्रता वाढते.

टीप: कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5280

Related Questions

भारतातील औद्योगिक चिकित्सा करा भाषाची?
योग साधनेसाठी नैसर्गिक औषधी वनस्पतींचे महत्त्व?
योग साधनेसाठी नैसार्गिक ओषधी वनस्पतींचे?
योग जीवनशैली म्हणजे काय?
फास्ट फुडचे परिणाम?
खालील विधाने वाचुन त्यातील योग्य उत्तराची निवड करा. Assertion (A)दीर्घकालीन ताण मानसिक विकाराना कारणीभूत ठरू शकतो.(R)ताणामुळे शरीरातील हामोनल संतुलन बिघडते.a?
खालील विधाने वाचून त्यातील योग्य उत्तराची निवड करा.Assertion (A)दीर्घकालीन ताण मानसिक विकारांना कारणीभुत ठरू शकतो.Reason (R)ताणामुळे शरीरातील होमनल बिघडते.?