2 उत्तरे
2
answers
समतोल आणि सकस आहार म्हणजे काय? संतुलित व सकस आहाराचे फायदे कोणते आहेत?
6
Answer link
संतुलित आणि सकस आहार म्हणजे काय अन्न हे मानवी जीवनाचे 'अस्तित्व' टिकवण्यास आवश्यक अशी, प्राथमिक गरज आहे. आपल्या शरीराची वाढ होणे, झीज भरुन काढणे,ऊर्जा निर्मिती हे सर्व आपल्याला अन्नातून मिळणार् या घटक पोषण तत्त्वांमुळे पूर्ण होऊ शकते.आहारात घेतलेलेअन्न पोषण दृष्ट्यासमतोल असायला हवे.चला तर मग आपण जाणून घेऊया
1संतुलीत आहार म्हणजे काय व सकस आहार म्हणजे काय?
रोजच्या अन्नपदार्थात पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वाचा समावेश करणार् या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. संतुलित आहाराचे प्रकार व फायदे कोणते, संतुलित किंवा सकस आहार कसा असावा व यासंतुलित आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश होतो ते आपण ह्या लेखामध्ये विस्तृत स्वरुपात बघूयात.
*संतुलीत आहार – प्रकार* १) दुग्धजन्य पदार्थ: अंडी, मास, मासे इ.
२) फळे व भाजीपाला: केळी, हिरव्या पालेभाज्या इ.
३) स्निग्धपदार्थ: लोणी,तुप,तेल इ.
४) तृणधान्य व कडधान्य– मोड आलेले उसळ, चपाती इ
.*संतुलीत व सकस आहार – फायदे*संतुलीत आहाराचाआपण आपल्या जेवनात समावेश नाही केलात तर आपले शरीर निरोगी व धडधाकड नाही राहू शकनार.पोषक तत्त्वांचाआहारात सामावेश असने गरजेचे असते. संतुलित आहार आपण घेतल्यामुळे आजारपण येत नाही.मानसिक स्वास्थ चांगले राहते त्यामुळे आपल्या अन्नपदार्थात संतुलित आहार घेणे खूप गरजेचे आहे.या धावपळीच्या जीवनात आपल्या शरीराकडे लक्ष देणे व संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. मानवाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी शरीराला पौष्टिक आहाराची आवश्यकता असते पौष्टिक आहार कमी किंवा अधिक प्रमाणात मिळाला तरी दुष्परिणाम शरीरावर होतो. म्हणून निरोगी तंदुरुस्त शरीरासाठी संतुलीत आहाराची आवश्यकता आहे.आहारात *कॅलरी, लोह व जीवनसत्वे* विशिष्ट प्रमाणात व त्यामध्ये पौष्टिक घटकांचा समावेश आहे की नाही हे समजून घेतले पाहिजे, कारण अन्नात पौष्टिक घटकांसोबत पोषण मूल्य नसलेल्या घटकांचा समावेश असू शकतो. आपल्या आहारामध्ये सुमारे पस्तीस टक्के भाग प्रथिनांचा आसावा.असे आहार तज्ज्ञांचे मत .ही प्रथिनेआपल्याला *दूध आणि दुग्धजन्य पदार्थ डाळीपाले भाज्या मोडविलेली कडधान्ये* याद्वारे मिळतात .प्रथिनांपासून आपल्या शरीरातील पेशी व स्नायूंना पोषण मिळत असते.तसेच आपले त्वचा केस यासाठी देखील प्रथिने आवश्यक आहे. पुरुषांचे स्नायू महिलांच्या मानाने जास्त बळकट असल्याने पुरुषांना अधिक प्रमाणात प्रथिनांचीगरज असते. त्यामुळे आहार तज्ज्ञांच्या मतेआपल्या दर जेवणामध्ये एक भाग तरी प्रथिनांचा असायला हवा. ही प्रथिने *शिजवलेले डाळ उसळ पनीर किंवा मासे* या कोणत्याही स्वरूपात असावित पुरुषांना दिवसाला*६० ग्रॅम प्रथिने* आवश्यक आहेत.तर स्त्रियांना*५५ ग्रॅम प्रथिनांची* गरज असते.
कोणत्या वेळेला कोणत्याअन्नपदार्थाचे सेवन करावे हे पाहूया..१. *सकाळीन्याहारी*.गरज :- कॅल्शियम, प्रोटीन व लोह.पोषणासाठी आवश्यक पदार्थ:- एक ग्लास दूध दही ताक पनीर त्यापैकी कोणताही एक पदार्थ. ऊर्जेसाठी पूरक :- शिरा, पोहे, पोळी, टोस्ट, ब्रेड, अंडेव फळे
.२. *दुपारचे जेवन *गरज :- प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्सव लोह. पोषणासाठीआवश्यक पदार्थ:- एक मध्यम आकाराची वाटी घट्ट डाळ, उसळ व मांसाहारीमध्ये मासळी किंवा चिकन अंड्याचा पदार्थ. ऊर्जेसाठीपूरक :- चपाती, भात, भाकरी, ताक, दही व कोशिंबीर इ.
३. *संध्याकाळची न्याहारी* गरज:- कॅल्शियम, प्रोटीन.पोषणासाठी आवश्यक व ऊर्जेसाठीपूरक पदार्थ:- चणेदाणेपनीर लिंबू शरबत.
४. *रात्रीचे जेवण* पोषणासाठी आवश्यक पदार्थ:- भाकरी, पोळी, भात, फळभाजी, कोबी, गाजर, दुधी भोपळा व बटाटा.ऊर्जेसाठी पूरक:- कढी, सुप व कोशिंबीर
.*तात्पर्य*आजच्या फार्स्ट लाइफमध्ये आपल्याकडून फास्टफूड व जाहिरात बाजीमुळे नको ते अन्नसेवन केले जात आहे.आरोग्यावर परिणाम करणाऱ्या बहुतेक घटकांवर आपले नियंत्रण नसते त्यामुळे आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी उत्तम संतुलित व सकस आहार, पुरेशी झोप आणि जोडीला व्यायाम करणेअत्यंत गरजेचेआहे.
*जरी आपले वेश भाषा, आपलेअन्न, विभिन्न असले तरी तंदुरुस्तीसाठी संतुलित आहार गरजेचाआहे.*
0
Answer link
समतोल आणि सकस आहार:
समतोल आणि सकस आहार म्हणजे असा आहार ज्यामध्ये सर्व आवश्यक पोषक तत्वे योग्य प्रमाणात असतात. ह्यामध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समावेश असतो.
- प्रथिने: शरीर आणि स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक.
- कर्बोदके: शरीराला ऊर्जा पुरवतात.
- स्निग्ध पदार्थ: ऊर्जा आणि काही जीवनसत्त्वे शोषून घेण्यासाठी आवश्यक.
- जीवनसत्त्वे आणि खनिजे: शरीराच्या कार्यांसाठी आवश्यक.
समतोल आणि सकस आहाराचे फायदे:
- वजन व्यवस्थापन: योग्य आहारामुळे वजन नियंत्रणात राहते.
- चांगली रोगप्रतिकारशक्ती: सकस आहारामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
- ऊर्जा पातळीत वाढ: संतुलित आहारामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
- उत्तम मानसिक आरोग्य: योग्य पोषणामुळे मानसिक आरोग्य सुधारते.
- दीर्घायुष्य: सकस आहारामुळे आयुष्य वाढण्यास मदत होते.
अधिक माहितीसाठी: