2 उत्तरे
2
answers
कृती संशोधन व नवोपक्रम कोणते आहेत?
2
Answer link
. नवोपक्रम व कृतिसंशोधन
* नवोपक्रम
आपल्या शाळेत अध्ययन-अध्यापनाचे व सहशालेय कार्यक्रमांचे आयोजन करताना एवढेच नव्हे तर प्रशासन व व्यवस्थापन करताना गुणवत्ता वाढवण्याची धडपड आपण करीतच असतो. या गुणवत्तेच्या मार्गात अडथळा आणणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी काही उपाय करून बघत असतो. उपक्रम करीत असतो. असा एखादा उपक्रम जेव्हा पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळेपणाने, नवीन मार्ग वापरून, कल्पकतेने, नियोजनबद्धरितीने केला जातो तेव्हा तो नवोपक्रम होतो. नवोपक्रमाच्या आपल्या संकल्पना स्पष्ट असतील तर मुख्याध्यापक या नात्याने आपल्याला आपल्या शाळेतील धडपडणाऱ्या शिक्षकांना नेमके मार्गदर्शन करता येईल.
नवोपक्रमाची वैशिष्ट्ये
१) नवोपक्रमात समस्येवर आपण शोधलेली कल्पक उपाययोजना असते.
२) कृतींची क्रमबद्ध योजना असते. ३) योजना व अंमलबजावणी यात नावीन्य असते.
४) उत्कृष्टतेचा ध्यास असतो.
५) कृतिकार्यक्रमातून बदल घडतो' असा सकारात्मक दृष्टिकोन असतो.
६) स्वयंप्रेरणा व स्वयंमूल्यमापन असते. ७) विचार व कृतींना शिस्त असते.
नवोपक्रम कशासाठी
१) आपल्या स्तरावरील समस्या आपल्याच कल्पकतेने सोडवण्यासाठी (२) दैनंदिन कामातील तोच-तोचपणा जाऊन वेगळेपणातून चैतन्य येण्यासाठी
३) विचारांना व कृतींना शिस्त येण्यासाठी
(४) आपली समस्या सोडवण्याच्या आपल्या क्षमतेवरचा विश्वास दृढ होण्यासाठी ५) आपल्या कामाची गुणवत्ता व यशस्थिता वाढण्यासाठी
● नवोपक्रमाच्या कार्यवाहीचे टप्पे
→ आपले काम करताना मनात वारंवार येणाऱ्या समस्यांची सुचेल तशी यादी करावी.
सर्वाधिक महत्त्वाची वाटणारी व आपल्या आवाक्यातील समस्या निश्चित करावी.
समस्येची कारणे शोधावी नोंदवावीत. या किंवा अशा प्रकारच्या समस्येवर कुणी, काय उपाय केलेत याची माहिती घ्यावी. यासाठी आपल्याला शक्य
समस्येचे संपूर्ण निराकरण होईपर्यंत उपायांची आवर्तने करत राहणे अपेक्षित असते. या संदर्भात शिक्षकांच्या कामाला योग्य दिशा देण्यासाठी आपल्याला संशोधन-कृतिसंशोधनाबाबतच्या प्राथमिक संकल्पना स्पष्ट असायला हव्यात.
• शैक्षणिक संशोधन :
शैक्षणिक संशोधन म्हणजे शिक्षणक्षेत्रातील उद्दिष्टे, अध्ययन-अध्यापन पद्धती, मूल्यमापन, विद्यार्थी, शिक्षक, शालेय वातावरण, शैक्षणिक साहित्य, तंत्र, पाठ्यपुस्तके इत्यादींपैकी एक किंवा अनेक शैक्षणिक घटकांच्या संदर्भात निर्माण झालेल्या व होणाऱ्या समस्यांचे शास्त्रशुद्ध उत्तर शोधण्याचा केलेला शास्त्रीय प्रयत्न होय,
• शैक्षणिक संशोधनाचे प्रकार
शैक्षणिक संशोधन मुख्यतः तीन प्रकारांनी वर्गीकृत केले जाते.
१) मूलभूत संशोधन
२) उपयोजित संशोधन
३) कृतिसंशोधन
१) मूलभूत संशोधन ज्ञानात भर टाकणे, नवीन ज्ञान हस्तगत करणे यासाठी जे संशोधन केले जाते ते मूलभूत संशोधन होय. २) उपयोजित संशोधन: प्रस्थापित उपपत्ती व ज्ञानाचे जेव्हा सुसंगत व समर्पक परिस्थितीमध्ये उपयोजन
केले जाते किंवा समस्या निराकरणासाठी पूर्वज्ञान प्रस्थापित उपपत्तीचा अवलंब केला जातो, तेव्हा त्या
संशोधनाला उपयोजित संशोधन म्हणतात.
३) कृतिसंशोधन : शैक्षणिक प्रक्रियेशी निगडित असणारा हा संशोधन प्रकार आहे. कृतिसंशोधन करणारी व्यक्ती तिच्या नेहमीच्या शैक्षणिक कार्यात येणाऱ्या समस्येचे निराकरण कृतिसंशोधनाद्वारे करते.
• कृतिसंशोधनाची उद्दिष्टे :
१) दैनंदिन शैक्षणिक व्यवहारात निर्माण झालेल्या समस्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे. २) समस्या सोडविण्यासाठी योग्य उपायांचा शोध घेणे व उपायांचा वापर करून निष्कर्ष काढणे..
३) निष्कर्षांना अनुसरून आपल्या शालेय कामात योग्य तो बदल करून कामाचा शैक्षणिक दर्जा उंचावणे. कृतिसंशोधनाचे महत्त्व व आवश्यकता :
संशोधनकर्ता व व्यावसायिक दोघे अभिन्न असल्याने तत्काळ व प्रत्यक्ष परिणाम होत असतो. शिक्षक आपल्या समस्या सोडवण्यासाठी कृतिशील राहतो. शाळेतील दैनंदिन कार्याचा दर्जा उंचावतो. कृतिसंशोधन मर्यादित वेळेत पूर्ण करता येते कृतिसंशोधनामुळे उत्साही, कल्पक व प्रयोगशील शिक्षक घडवता येतात. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, अध्ययन-अध्यापन, मूल्यमापन यात गतिमानता आणता येते..
0
Answer link
कृती संशोधन (Action Research) आणि नवोपक्रम (Innovation) या दोन्ही गोष्टी शिक्षण क्षेत्रात महत्त्वाच्या आहेत.
कृती संशोधन (Action Research):
- कृती संशोधन म्हणजे शिक्षकांनी त्यांच्या वर्गातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी केलेले पद्धतशीर संशोधन.
- यात शिक्षक स्वतःच संशोधक बनून आपल्या अध्यापन पद्धतीत सुधारणा करतात.
- उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांची गणितातील आवड कमी असणे ही समस्या असल्यास, त्यावर उपाय शोधण्यासाठी विविध पद्धती वापरून पाहणे आणि त्यातून योग्य तो निष्कर्ष काढणे.
नवोपक्रम (Innovation):
- नवोपक्रम म्हणजे शिक्षण क्षेत्रात नवीन कल्पना, पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे.
- यात शिक्षण प्रक्रिया अधिक आकर्षक आणि प्रभावी बनवण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जातात.
- उदाहरणार्थ, डिजिटल साधनांचा वापर करून शिक्षण देणे, विद्यार्थ्यांना प्रकल्प आधारित शिक्षण देणे, किंवा खेळ आणि कृतींच्या माध्यमातून शिकवणे.
दोन्हीमधील संबंध:
- कृती संशोधन आणि नवोपक्रम एकमेकांना पूरक आहेत.
- कृती संशोधनातून शिक्षकांना त्यांच्या समस्यांची जाणीव होते आणि नवोपक्रमातून ते त्यावर नवीन उपाय शोधू शकतात.
अधिक माहितीसाठी काही स्रोत:
- शैक्षणिक नवोपक्रम : संकल्पना आणि स्वरूप ResearchGate
- Action Research Simply Psychology