शिक्षण कर्तव्ये

शिक्षण हक्क कायद्याने नमूद केलेली मुख्याध्यापकांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काय आहेत?

5 उत्तरे
5 answers

शिक्षण हक्क कायद्याने नमूद केलेली मुख्याध्यापकांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काय आहेत?

4
 .. शिक्षण हक्क कायद्याने नमुद केलेली मुख्याध्यापकांची कर्तव्य आणि जबाबदारी 

१. समूहातील सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाच्या संदर्भात (पटनोंदणी,उपस्थिती में ___वाढविणे व शिक्षणाचा दर्जा उंचाविणे यांबाबतची) मासिक व वार्षिक उद्दिष्टे ठरवून देणे. । 

२. सर्व शिक्षकांसाठी वार्षिक/ मासिक घटक नियोजन निश्चित करून देणे व त्यानुसार केलेल्या । 

अध्यापनाविषयीचा आढावा पुढील महिन्याच्या बैठकीत घेणे. 

३. सर्व विद्यार्थ्यांची किमान अध्ययन क्षमतांवरील प्रभूत्वाची त्रैमासिक तसेच वार्षिक चाचणी घेऊन 

शिक्षकाच्या कार्याचे मूल्यमापन करणे. ४. समूहातील प्रत्येक प्राथमिक शाळेला महिन्यातून दोन वेळा भेट देणे. या दोन भेटींपैकी एक भेट पर्वसन 

देता द्यावी. समूहातील शाळांच्या कामकाजावर देखरेख करणे व त्यांची तपासणी करणे. 

सर्व प्राथमिक शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांची मासिक गटसंमेलने आयोजित करणे. ६. सर्व शिक्षक नियमितपणे शाळेत येतात याची खात्री करणे । ७. सर्व शिक्षक शाळेच्या गावी राहत असल्याबद्दल खात्री करणे. ८. समूहातील सर्व शाळांमध्ये सहशालेय कार्यक्रमांचे नियोजन करणे. ९. समूहातील प्रत्येक शिक्षकासाठी पालक भेटींचा कार्यक्रम निश्चित करून देणे. १०. समूहातील प्रत्येक शिक्षकासाठी विद्यार्थ्यांची सर्वकष माहिती मिळविण्याचा कार्यक्रम निश्चित करून देणे ११. शाळेत दाखल झालेल्या परंतु सातत्याने गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची (विशेषतः मुलींची) माहिती घेऊन 

ते शाळेत टिकण्याच्या दृष्टीने शिक्षकांना पाठपराव्यासाठी लक्ष्य निश्चित करून देणे. १२. समहातील शाळांमध्ये शालेय तसेच आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करणे. १३. ग्रामशिक्षण समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेणे व त्यांच्या ठरावांची नोंद घेऊन आवश्यक ती कार्यवाही 

करणे. 

१४. महिन्यातून किमान एका ग्रामशिक्षण समितीच्या बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन करणे. १५. उपलब्ध साधनांपासून आणि कमी खर्चात शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी गटातील शिक्षकांना मार्गदर्शन 

करणे. १६. शाळा सुधार, शैक्षणिक उठाव, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, उपस्थिती भत्ता, गणवेश, पुस्तक 

पेढी इ. कार्यक्रमांचा आढावा घेऊन त्यांची व्याप्ती आणि उपयुक्तता वाढविण्यासाठी प्रेरक म्हणून काम 

करणे. १७. समूहातील प्राथमिक शाळांची प्रतवारी वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे. १८. समूहातील सर्व मुख्याध्यापकांचे/ शाळा प्रमुखांचे वार्षिक गोपनीय अहवाल लिहिणे व शिक्षकांचे 

मुख्याध्यापक / शाळाप्रमुख यांनी लिहिलेल्या गोपनीय अहवालांचे त्यांना विहित केलेल्या वार्षिक लक्ष्यांच्या 

संदर्भात पुनर्विलोकन करणे. १९. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड व अन्य योजनेत प्राप्त होणाऱ्या साहित्याचा विनियोग करण्याच्या संदर्भात मार्गदर्शन 

करणे. २०. आठवड्यातून किमान चार तासिका अध्यापन करणे. 

शासन निर्णयात केंद्रप्रमुखांची जी कर्तव्ये नमूद केलेली आहेत त्या कर्तव्यांच्या संदर्भात केंद्रप्रमुखांवर ज्या जबाबदाऱ्या येतात त्यांबाबत सविस्तर विवेचन पुढे देण्यात आले आहे. ही कर्तव्ये सर्वसाधारणपणे प्रशासकीय, शैक्षणिक विकास व आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात नमूद करण्यात आली आहेत. 

(1) प्रशासकीय 

शासकीय व पर्यवेक्षित स्वरूपाच्या जबाबदाऱ्या 

समहरातील सर्व प्राथमिक शाला 

। 2001, बालवाडा, अंगणवाडया अनौपचारिक शिक्षण केंद्र, आश्रमशाळा, प्रौढ शिक्षा केद, जनशिक्षण पिलाया यांना नियमितपणे मेटी देणे. समूहातील प्रत्येक प्राथमिक शाळरा महिन्यात किमान दोन भेटी देणे आवश्यक असून त्यांपैकी एक भट जाकामना पूनियोजीत असावी. पर्वनियोजित भेटीच्यावेळी शाळा सुरू होण्यापूर्वी शाळत सार ण दिवसभर शालेय कामकाज पाहवेबशाळा सटेपर्यंत थांबावे व शेवटी शिक्षकाना मार्गदर्शन करावे. 

• पूर्वनियोजित शाळा भेटीच्या वेळी प्रत्येक शिक्षकाने केलेले अध्यापन, अध्यापन पर्वतयारी, गृहपाठ इ. 

काम पडताळून पाहवे व त्यानुसार लॉगबकमध्ये नोंदी कराव्यात. ( सदर पाहणी वर्गनिहाय, शिक्षकनिहाय व विषयनिहाय व्हावी.) . प्रत्येक शाळेत केंदपमुखाने आपल्या सूचना नोंदविण्यासाठी फलस्केपचे बाउंडबुक केंद्रप्रमुखांचे लॉगबुक 

'म्हणून स्वतंत्रपणे ठेवावे. 

• समूहातील शिक्षक नियमितपणे शाळेत येतात याची समक्ष पडताळणी करणे. कोणतीही शाळा शिक्षकाविना 

राहणार नाही याची दक्षता घेणे. अशा शाळांना तत्काळ पर्यायी शिक्षकांची व्यवस्था करणे. 

• महिन्यातून किमान एका ग्रामशिक्षण समितीच्या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करणे. ( दर महिन्याला वाया गावाच्या बठकाना उपस्थित राहवे. ) ग्रामशिक्षण समितीच्या कामकाजाची माहिती घेणे व 

त्यामध्ये झालेल्या ठरावंची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करणे. केंद्रशाळा शिक्षण सल्लागार समितीची दरमहा बैठक आयोजित करणे व अशा बैठकीत घेतलेल्या निर्णयावर त्वरित कार्यवाही करणे. समूहातील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या दीर्घ मुदतीच्या रजा अर्जावर योग्य ती शिफारस करून वरिष्ठांकडे पाठविणे. रजा काळातील काम इतर शिक्षकांकडे सोपविणे. सर्व शाळांचे अभिलेख, दस्तऐवज, नोंदवह्या, डेड्स्टॉक व शैक्षणिक साधने इ. अद्ययावत व सुस्थितीत 

राहतील यांसाठी शाळांना आवश्यक त्या सूचना देणे. 

• केंद्रप्रमुख कार्यालयात केंद्रातील शाळा, शाळागृहे, विद्यार्थी, शिक्षक यांची माहिती स्वतंत्रपणे व अद्ययावत 

स्थितीत ठेवणे. 

• दरवर्षी ३० सप्टेंबरच्या विद्यार्थीपट व उपस्थितीच्या आधारे शाळानिहाय व वर्गनिहाय शिक्षक निश्चित 

करण्यासाठी शिक्षण विस्तार आधिकारी यांना सहकार्य करणे. 

• उपलब्ध साधनांपासून कमी खर्चात शैक्षणिक साहित्य तयार करून वर्गातील अध्ययन- अध्यापन प्रक्रिया 

परिणामकारक व आनंददायी करण्यासाठी अशा साहित्याचा कशा प्रकारे वापर करता यईल याबाबत मार्गदर्शन करावे. तसेच खडू फळा योजनेअंतर्गत पुरविले साहित्य, रेडिओ कम कॅसेट प्लेअर, दूरदर्शन संच यांचा 

दैनंदिन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अर्थपूर्ण करण्यासाठी कसा उपयोग करावा याबाबतही मार्गदर्शन करावे 

• प्रत्येक शाळेत गळती / स्थगिती तक्ते ठेवून ते अद्ययावत राहतील असे पाहणे. 

• परिसरातील अपंग, मागासवर्गीय, मतिमंद मुले-मुली यांसाठी असणाऱ्या शासनाच्या अगर मदतीच्य 




आश्रमशाळा, वसतिगृहे, सुधारगृहे, अंध-अपंग, मूकबधिर शाळा इत्यादीबाबतची माहिती पालकांना पात्र मुलामुलींना त्या त्या योजनांचा लाभ देणे. शाळा सुधार योजना, शैक्षणिक उठाव, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, गणवेश वाटप, पस्त योजना, उपस्थिती भत्ता, शालेय पोषण आहार, वैद्यकीय तपासण्या इ. कार्यक्रमांचा आढावा घेऊन व्याप्ती व उपयुक्तता वाढविण्यासाठी प्रेरक म्हणून काम पाहणे. विविध योजना, उपक्रमांबाबतचे केंद्रातील शाळांचे मासिक त्रैमासिक अहवाल शिक्षण विस्तार अधिकार 

यांच्यामार्फत विहित कालमर्यादेत गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करणे. ब) शैक्षणिक विकासाच्या संदर्भात जबाबदाऱ्या 

• प्राथमिक शिक्षणाबाबतचे १०० टक्के सर्वेक्षण करवून घेणे. पट नोंदणीची शाळानिहाय लक्ष्ये निश्चित करून 

दाखलपात्र मुलांची १०० टक्के पटनोंदणी करून घेणे. ६ ते १४ वयोगटातील एकही मूल शाळेबाहेर राहणार 

नाही याची काळजी घेणे. यासाठी शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यावर जबाबदारी निश्चित करणे. 

• प्रत्येक मूल शाळेत उपस्थित राहील व शाळेची सरासरी उपस्थिती ९० टक्के पेक्षा कमी राहणार नाही याची 

खबरदारी घेणे. सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती घेऊन त्यांना शाळेत टिकविण्याच्या दृष्टीने शिक्षकांना लक्ष्य निश्चित करून देणे. पालक भेटीचे शिक्षकनिहाय नियोजन करून अशा भेटी नियमितपणे होतात हे पाहणे. प्रत्येक विद्यार्थ्यास किमान अध्ययन क्षमता प्राप्त होतील यासाठी शिक्षकनिहाय कार्यक्रमांचे नियोजन, उददि व लक्ष्ये ठरविणे व त्यांची कार्यवाही करून घेणे. दर तिमाहीस किमान अध्ययन क्षमतांच्या चाचणीबाबत नियोजन करणे. प्रत्यक्ष चाचणी तोंडी, प्रात्यक्षिक ) व नोंदी ठेवणे. 

अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक व शिक्षक हस्तपुस्तिका यांच्या आधारे अध्यापन प्रक्रियेचे नियोजन करून घेणे. नियमानुसार कार्यवाही होत आहे याची वरचेवर पाहणी करून खात्री करणे. 

• शिक्षकाने केलेल्या अध्यापन प्रक्रियेबाबत पाक्षिक / मासिक आढावा घेणे. राहिलेला अभ्यासक्रम व इतर 

त्रुटींबाबत सूचना देऊन पूर्तता करून घेणे. 

• क्षमता चाचणीमध्ये अप्रगत आढळून आलेल्या मुलामुलींची प्रगती उंचावण्यासाठी जाणीवपूर्वक विशेष 

प्रयत्न करणे. 

• विद्यार्थ्यांकडून करवून घ्यावयाच्या निबंध, गृहपाठ, प्रयोग, प्रात्यक्षिक, स्वाध्याय, निरीक्षणे इ. सर्व कामांचे 

शालेय वर्षाच्या सरूवातीसच इयत्तानिहाय व विषसनिहाय भौतिक लक्ष्य ठरवून घेणे. या कामाची पडताळणी 

भेटीच्या वेळी स्वत: करणे. 

• शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांची गटसम्मेलने, मेळावे, चर्चासत्रे, शिबिरे, कृतिसत्रे, उद्बोधन 

वर्ग, आदर्श नमुना पाठ, स्नेहसंमेलने इ. महिन्यातून एकदा आयोजित करणे व मार्गदर्शन करणे. त्यांचे वार्षिक नियोजन करणे. यासाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवून यामध्ये शिक्षकांची उपस्थिती व थोडक्यात कार्यवृत्तांत 

नोंदविणे. 

• शाळास्तरांवर व आंतरशाळास्तरांवर सहशालेय कार्यक्रमांचे आयोजन करणे. विद्यार्थी व शाळांना बक्षिसे 

| प्रमाणपत्रे देणे. विविध राष्ट्रीय सण, सांस्कृतिक कार्यक्रम, बालसभा इ. वार्षिक आराखडा तयार करून त्यानुसार सव शाळांत कार्यवाही करून घ्यावी. शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाहा कराया माहिती घण, लाभार्थी निवडणे. त्यांना वेळेत लाभ देणे व नियमित अहवाल पाठविणे.) दरवर्षी सर्व शाळांची प्रत
उत्तर लिहिले · 26/6/2022
कर्म · 53710
4
उत्तर पाठवा
उत्तर लिहिले · 24/6/2022
कर्म · 80
0

शिक्षण हक्क कायद्यानुसार मुख्याध्यापकांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत:

  • शाळा व्यवस्थापन: शाळेचे योग्य व्यवस्थापन करणे आणि कामकाज सुरळीतपणे चालवणे ही मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे.
  • शैक्षणिक गुणवत्ता: शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे आणि ती टिकवून ठेवणे.
  • शिक्षकांचे व्यवस्थापन: शिक्षकांची नियुक्ती, प्रशिक्षण आणि त्यांच्या कामाचे योग्य वाटप करणे.
  • विद्यार्थ्यांचे हित: विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करणे.
  • सुविधांची उपलब्धता: शाळेत आवश्यक सुविधा, जसे की पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, क्रीडांगण आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करणे.
  • अभिलेख व्यवस्थापन: शाळेतील सर्व नोंदी अद्ययावत ठेवणे, जसे की विद्यार्थ्यांची माहिती, शिक्षकांची माहिती, उपस्थिती आणि निकालांचे रेकॉर्ड.
  • पालकांशी संवाद: पालक आणि समुदाय यांच्याशी नियमित संवाद साधणे आणि शाळेच्या विकासात त्यांचा सहभाग घेणे.
  • शालेय समिती: शालेय समितीच्या बैठका घेणे आणि त्यांच्या निर्णयांचे पालन करणे.
  • अनुदान व्यवस्थापन: शाळेसाठी आलेले अनुदान योग्य प्रकारे वापरणे आणि त्याचा हिशोब ठेवणे.
  • अहवाल सादर करणे: शिक्षण विभागाला वेळोवेळी आवश्यक अहवाल सादर करणे.

टीप: शिक्षण हक्क कायदा, 2009 (Right to Education Act, 2009) नुसार मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या विस्तृत आहेत आणि त्या वेळोवेळी बदलू शकतात.

अधिक माहितीसाठी, आपण शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: शिक्षण मंत्रालय, भारत सरकार

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1780

Related Questions

कुटुंबप्रमुखांच्या जबाबदाऱ्या कोणत्या?
परस्परांशी जोडलेल्या अनेक भूमिकांना ...म्हणतात?
प्रकारांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काय आहेत?
शिक्षण हक्क कायद्यानुसार मुख्याध्यापकांना येणारी कर्तव्ये कोणती?
शिक्षण हक्क कायद्याने निश्चित केलेले मुख्याध्यापकाची कर्तव्ये काय आहेत?
मुख्याध्यापकाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या काय आहेत?
शिक्षण हक्क कायद्याने निश्चित केलेल्या मुख्याध्यापकाच्या कर्तव्य व जबाबदारी नमूद करा शाळास्तरावर त्या पार पडताना येणाऱ्या अडचणी लिहा.?