शिक्षण
व्यवस्थापन
शैक्षणिक व्यवस्थापन
शैक्षणिक व्यवस्थापन ही संकल्पना स्पष्ट करून त्यात कोणत्या घटकांचा समावेश होतो?
2 उत्तरे
2
answers
शैक्षणिक व्यवस्थापन ही संकल्पना स्पष्ट करून त्यात कोणत्या घटकांचा समावेश होतो?
6
Answer link
१.३ शैक्षणिक व्यवस्थापन
व्यवस्थापनची तत्त्वे जेव्हा विशिष्ट क्षेत्राच्या संदर्भात लागू केली जातात त्यावेळी त्यास त्या क्षेत्राचे व्यवस्थापन असे म्हणतात तर याच न्यायाने व्यवस्थापनाची तत्त्वे ज्यावेळी शिक्षणक्षेत्राच्या संदर्भात लागू केली जातात त्यास शैक्षणिक व्यवस्थापन असे म्हणतात.
सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रात व्यवस्थापनाची आवश्यकता निर्माण झालेली आहे. आज शिक्षण हा देखील एक उद्योग मानला गेला आहे. त्यामुळे या क्षेत्रातदेखील इतर क्षेत्रातील उद्योग व्यवसायाप्रमाणेच उत्कृष्ट व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात देखील ध्येयधोरण, उद्दिष्टे निश्चिती, नियोजन, सुसूत्रीकरण, संचालन, नियंत्रण अशा अनेक बाबींचा समावेश असतो. तसेच शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज व इतर व्यक्ती हे मानवी घटक व आवश्यक भौतिक घटक शिक्षणक्षेत्रात समाविष्ट असतात. त्यामुळे या क्षेत्रासही उत्कृष्ट व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. “ शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे शैक्षणिक ध्येयधोरणांचा विकास करणे, अध्यापनाच्या कामाला प्रेरणा देणे व शिक्षणप्रकियेतील मानवी व भौतिक घटनांची होय. " • सुव्यवस्था करणे
शाळा हा शिक्षण या उद्योगातील प्रमुख व महत्वाचा घटक आहे. शाळांमधून सुरू असलेल्या कार्यातूनच शिक्षणाची उद्दिष्टे साध्ये केली जात असतात. तेव्हा शिक्षणाची पूर्वनिर्धारित उद्दिष्टे, शाळेचे स्थैर्य व प्रगती या गोष्टी साध्य करण्यासाठी शाळेचे, शाळेतील कार्याचे व्यवस्थापन उत्तम होणे आवश्यक आहे. शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती असून समाजाने निर्माण केलेली एक संस्था आहे. औपचारिकरित्या भावी पिढीला ज्ञान देऊन त्यांना जीवन जगण्यास समर्थ बनविणे असे शालेय
कार्याचे स्वरूप असते. हे कार्य योजनावद्धरीतीने व कल्पकतेने होण्यसाठी शालेय कार्याचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. शालेय व्यवस्थापनाच्या विविध व्याख्या खालील प्रमाणे.
१. “शालेय नियोजन व शालय प्रशासन यांच्यामध्ये समाविष्ट असलेली रोजची कामे करण्यासाठी लागणारी यंत्रणा यालाच शालेय व्यवस्थापन असे म्हणतात. "
२. “उपलब्ध साधनसामग्रीमध्ये, उपलब्ध मनुष्यवळाद्वारा, उपलब्ध वेळेत कार्ये व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी निर्माण केलेली रचना म्हणजे शालेय व्यवस्थापन होय."
३. “शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भौतिक साधने व सुविधा आणि मानवी संसाधनांची जुळवाजुळव करून या दोन्ही घटकांत समन्वय साधून उद्दिष्टांपर्यंत पोहचण्यासाठी निर्माण करण्यात आलेली यंत्रणा म्हणजे शालेय व्यवस्थापन होय."
१.४ शैक्षणिक व्यवस्थापनाचे स्वरूप
सध्याच्या काळात सगळयाच क्षेत्रात व्यवस्थापनाची आवश्यकता निर्माण झाली
आहे. विलक्षण वेगाने घडून येणा-या आर्थिक, सामाजिक व राजकीय घडामोडी यामुळे व्यवस्थापनाचे
कार्यक्षेत्र सतत विस्तारत आहे. त्यावरोवरच व्यवस्थापकीय अधिका-यांना नवनवीन समस्यांना व
आव्हानांना तोंड दयावे लागते आहे.
इतर क्षेत्रातील व्यवस्थापना प्रमाणेच शैक्षणिक व्यवस्थापनाचेही स्वरूप संकीर्ण वनले आहे. शैक्षणिक व्यवस्थापनात ज्या विविध घटकांचा समावेश होतो किंवा शैक्षणिक व्यवस्थापनाची जी विविध कार्ये आहेत त्यावरून शैक्षणिक व्यवस्थापनाच्या संकीर्णतेची कल्पना येऊ शकते.

0
Answer link
शैक्षणिक व्यवस्थापन ही एक व्यापक संकल्पना आहे, ज्यात शिक्षण संस्थेची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण यांसारख्या कार्यांचा समावेश होतो.
शैक्षणिक व्यवस्थापनाची व्याख्या:
शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे शिक्षण संस्थेशी संबंधित सर्व क्रियाकलापांचे व्यवस्थापन करणे, जेणेकरून संस्थेची ध्येये प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने साध्य करता येतील.
शैक्षणिक व्यवस्थापनातील घटक:
शैक्षणिक व्यवस्थापनात अनेक घटकांचा समावेश होतो, त्यापैकी काही महत्त्वाचे घटक खालीलप्रमाणे आहेत:
- नियोजन (Planning): शैक्षणिक संस्थेसाठी ध्येये निश्चित करणे आणि ती साध्य करण्यासाठी योजना तयार करणे.
- संघटन (Organizing): संस्थेची रचना तयार करणे, विविध कार्ये आणि जबाबदाऱ्या निश्चित करणे आणि कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय स्थापित करणे.
- कर्मचारी व्यवस्थापन (Staffing): योग्य कर्मचाऱ्यांची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे.
- निर्देशन (Directing): कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना प्रेरित करणे आणि त्यांच्या कामाचे पर्यवेक्षण करणे.
- समन्वय (Coordinating): संस्थेतील विविध विभाग आणि व्यक्ती यांच्यात समन्वय स्थापित करणे, जेणेकरून संस्थेची ध्येये एकत्रितपणे साध्य करता येतील.
- नियंत्रण (Controlling): संस्थेच्या कार्यांचे मूल्यांकन करणे, त्रुटी शोधणे आणि त्या सुधारण्यासाठी उपाययोजना करणे.
- निर्णय घेणे (Decision Making): संस्थेशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेणे, ज्यात धोरणे, नियम आणि कार्यपद्धती यांचा समावेश असतो.
- संप्रेषण (Communication): संस्थेतील कर्मचारी, विद्यार्थी आणि इतर भागधारक यांच्यात प्रभावी संवाद स्थापित करणे.
हे घटक एकत्रितपणे काम करून शैक्षणिक संस्थेला तिची उद्दिष्ट्ये साध्य करण्यास मदत करतात.