शिक्षण डिजिटल साक्षरता तंत्रज्ञान

डिजिटल साक्षरता तपासण्यासाठी प्रश्नावली कशी तयार कराल?

8 उत्तरे
8 answers

डिजिटल साक्षरता तपासण्यासाठी प्रश्नावली कशी तयार कराल?

18
उत्तर:-
 डिजिटल साक्षरता हा शब्द नव्यानेच रुजू झालेला आहे. “डिजिटल साक्षरता म्हणजे काय?”, तर आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपण इलेक्ट्रॉनिक संसाधने जसे की मोबाईल्स आणि संगणक निर्माण करू शकलेलो आहे. त्याच संसाधनांचा संपूर्णतः वापर करण्याची क्षमता म्हणजे डिजिटल साक्षरता!

सध्या डिजिटल इंडिया ही संकल्पना आपण सातत्याने ऐकत आहोत. प्रत्येक जीवनावश्यक वस्तू आणि सेवा ऑनलाईन उपलब्ध झालेली आहे. त्याप्रमाणेच ऑनलाईन शिक्षण व सोशल मीडिया या स्तरांवर देखील आपल्याला मोबाईल अथवा संगणक व्यवस्थितरित्या वापरता येणे, ही काळाची गरज बनलेली आहे.

सध्या प्रत्येक नागरिकाचा संबंध इंटरनेट जगताशी येतच आहे. त्यासाठी विशिष्ट संगणकीय भाषा आणि काही तांत्रिक बाबी व संकल्पना लक्षात येणे आवश्यक असते, त्याशिवाय तुम्ही सहजरीत्या डिजिटल साक्षर बनणे अशक्य आहे.

संपूर्ण जग इंटरनेटमुळे जवळ आलेले आहे. इंटरनेटचा वाढता वापर पाहता बहुसंख्य लोकांना त्याचा वापर जर करता आला तर एक वेगळीच इंटरनेट दुनिया निर्माण झालेली आपल्याला दिसून येईल. त्यासाठी भविष्यात सर्व लोक डिजिटली साक्षर करणे आवश्यक आहे.

तांत्रिक संसाधने वापरून पाहिल्याशिवाय आपल्याला त्यांचा वापर सहजरीत्या करता येत नाही. सध्या शालेय विद्यार्थी आणि तरुण पिढी ही शिक्षण तसेच इतर सुविधा ऑनलाईन पद्धतीने हाताळत आहेत.

मागील काही वर्षांपूर्वी सर्व नागरिक साक्षर करणे हे ध्येय होते. परंतु सध्या मोबाईल, संगणक आणि इंटरनेटमुळे लोकांना डिजिटल साक्षर करणे हे ध्येय समोर आहे. तंत्रज्ञानामुळे मानवी आयुष्य दिवसेंदिवस सोयीस्कर आणि सुदृढ बनत चालले आहे. त्याचाच एक भाग म्हणून डिजिटल साक्षरता ही संकल्पना सर्वत्र राबवणे अत्यावश्यक आहे.

       त्यासाठी अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी काही प्रश्नांची निर्मिती केली आहे ती खालील प्रमाणे.

1) संगणक चालू व बंद कसे करावे याविषयी थोडक्यात माहिती लिहा ?

2) संगणक प्रोजेक्टरशी सोडण्या विषयी थोडक्यात माहिती सांगा?

3) मोबाईल वरून व्हिडीओ कॉल करण्याच्या पायऱ्या सांगा?

4) मोबाइलवरील इंटरनेट संगणकाशी कसे कनेक्ट करावे थोडक्यात सांगा?

6) प्रश्न पत्रिका तयार करण्यासाठी कोणत्या एप्लीकेशन चा वापर करावा?

7)मोबाईलवर इंटरनेटचा वापर करून वस्तुनिष्ठ प्रश्न कसे तयार करावे याविषयी स्पष्ट करा?

8)वर्ग अध्यापन करत असताना मोबाईल वरील कविता स्पीकरवर ऐकवण्यासाठी त्याची जोडणी कशी करावी याविषयी माहिती सांगा?

9)संगणकाला प्रिंटर ची जोडणी कशी करावी याविषयी थोडक्यात सांगा?

10) लॅपटॉप ला बाहेरून कीबोर्ड जोडता येतो का? व तो कसा ते सांगा?

11) विद्यार्थ्यांचा मोबाईलवर शूट केलेला एखाद्या खेळाचा व्हिडिओ तयार करून त्यावर गाणी कसे टाकावे ते सांगा?

12) मोबाईल मधील उपलब्ध फोटोंचा वापर करून पीडीएफ फाईल तयार करता येऊ शकते का? व कशी या विषयी ची माहिती सांगा?

13) मोबाईल मधील उपलब्ध फोटोंचा वापर करून व्हिडिओ तयार करता येऊ शकतो का? व कसा ते सांगा?

14) मोबाईल मधील फाईल्स संगणकाच्या मध्ये कश्या ट्रान्सफर करता येतील ते सांगा?

15) मोबाईलवर दीक्षा एप्लीकेशन चा वापर कसा करावा?

16) पाठ्य पुस्तका वरील बारकोड च्या सहाय्याने मोबाईल वर पाठ किंवा कविता कशी पहावी याविषयी थोडक्यात सांगा?







उत्तर लिहिले · 25/6/2022
कर्म · 795
12
डिजिटल साक्षरता प्रश्नावली
उत्तर लिहिले · 24/6/2022
कर्म · 265
0
डिजिटल साक्षरता तपासण्यासाठी प्रश्नावली तयार करण्यासाठी, आपण खालील गोष्टी विचारात घेऊ शकता:

डिजिटल साक्षरता प्रश्नावली

नमस्कार! ह्या प्रश्नावलीचा उद्देश आपल्या डिजिटल साक्षरतेची पातळी तपासणे आहे. ह्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन आपण आपली डिजिटल साक्षरता किती आहे हे तपासू शकता.

Demographics (लोकसंख्याशास्त्र):

  • नाव:
  • वय:
  • लिंग:
  • शिक्षण:
  • व्यवसाय:

प्रश्न:

  1. आपण कधीपासून इंटरनेट वापरत आहात?

    • (अ) कधीच नाही
    • (ब) 1 वर्षापेक्षा कमी
    • (क) 1-3 वर्षे
    • (ड) 3 वर्षांपेक्षा जास्त
  2. आपण इंटरनेटचा वापर कशासाठी करता? (एकापेक्षा जास्त पर्याय निवडू शकता)

    • (अ) ईमेल पाठवणे/मिळवणे
    • (ब) सोशल मीडिया वापरणे
    • (क) बातम्या वाचणे
    • (ड) ऑनलाइन खरेदी करणे
    • (ई) शिक्षण/ संशोधन
    • (फ) इतर
  3. आपण स्मार्टफोन/कॉम्प्युटरवर किती सुरक्षितपणे माहिती साठवू शकता?

    • (अ) अजिबात नाही
    • (ब) थोडेफार
    • (क) ठीक आहे
    • (ड) खूप चांगले
  4. ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी आपण काय उपाय करता?

    • (अ) मला कल्पना नाही
    • (ब) संशयास्पद ईमेल/लिंक्स टाळतो
    • (क) अँटीव्हायरस वापरतो
    • (ड) वेळोवेळी पासवर्ड बदलतो
  5. आपण सोशल मीडियाचा वापर कसा करता?

    • (अ) फक्त माहिती वाचतो
    • (ब) मित्र/कुटुंबीयांशी संवाद साधतो
    • (क) माहिती देतो आणि इतरांशी चर्चा करतो
    • (ड) सोशल मीडिया वापरत नाही
  6. आपण ऑनलाइन बँकिंग/पेमेंट वापरता का?

    • (अ) होय
    • (ब) नाही
    • (क) कधीतरी
  7. आपण नवीन डिजिटल तंत्रज्ञान शिकण्यासाठी किती उत्सुक आहात?

    • (अ) अजिबात नाही
    • (ब) थोडेफार
    • (क) उत्सुक आहे
    • (ड) खूप उत्सुक आहे
  8. आपल्याला कोणत्या डिजिटल कौशल्यांमध्ये सुधारणा करायची आहे?

    • (अ) ईमेल आणि इंटरनेट वापरणे
    • (ब) सोशल मीडिया व्यवस्थापन
    • (क) ऑनलाइन सुरक्षा
    • (ड) इतर (कृपया सांगा)
  9. आपण शासकीय योजना आणि सेवांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता का?

    • (अ) होय
    • (ब) नाही
    • (क) मदतीने करू शकतो
  10. आपल्याला डिजिटल साक्षरता प्रशिक्षणाची गरज आहे का?

    • (अ) होय
    • (ब) नाही
    • (क) कदाचित

धन्यवाद!

आपल्या उत्तरांसाठी धन्यवाद! ह्या माहितीचा उपयोग डिजिटल साक्षरता सुधारण्यासाठी केला जाईल.

हे फक्त एक उदाहरण आहे, आपण आपल्या गरजेनुसार प्रश्नांमध्ये बदल करू शकता.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440

Related Questions

आपल्या अध्यापक विद्यालयातील प्राध्यापकांमध्ये डिजिटल साक्षरता तपासण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
Digital साक्षरता म्हणजे काय?
डिजिटल साक्षरता तपासणीसाठी प्रश्नावली?
आपल्या अध्यापक विद्यालयातील छात्र अध्यापक आनंद मधील डिजिटल साक्षरता तपासण्यासाठी प्रश्नावली तयार करा आपल्या अध्यापक विद्यालयातील छात्र अध्यापक आतमधील डिजिटल साक्षरता तपासण्यासाठी प्रश्नावली तयार करा?
आपल्या छायामधील डिजिटल साक्षरता तपासण्याची प्रश्नावली तयार करा.
आपल्या अध्यापक विद्यालयातील अध्यापकांमधील डिजिटल साक्षरता तपासण्यासाठी प्रश्नावली तयार करा?
छत्रांमधील डिजिटल साक्षरता तपासण्यासाठी प्रश्नावली?