बचत अर्थशास्त्र

अंतर्गत बचतींना काय म्हणतात?

2 उत्तरे
2 answers

अंतर्गत बचतींना काय म्हणतात?

0
अशा अर्थव्यवस्थांच्या बाबतीत अंतर्गत बचतीला परकीय मदत, करवाढ किंवा चलनवाढ हे तीन पर्याय असतात. परंतु परकीय मदतीतून निर्माण होणार नववसाहतवादी प्रवृत्तींचा धोका, करवाढीवर पडणाऱ्या मर्यादा व चलनवाढीमुळे राहणीमानात अधिकच घट होण्याची आपत्ती यांमुळे अंतर्गत बचत वाढविणे हाच विकासाचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो.


.

बहुतेक मागास देशांतील अंतर्गत बचतदार साधारणतः कमी असतो. शिवाय त्यांच्या बचतदारांत अलीकडील काळात वाढ होते नसल्याचे दिसून येते. प्रा.आर्थर ल्यूइस यांच्या मते आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतील मध्यवर्ती मुद्दा ४ ते ५ टक्क्यांदरम्यान बचत व गुंतवणूक करणाऱ्या अर्थव्यवस्थेचे रूपांतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या १२ ते १५ टक्के ऐच्छिक बचत करणाऱ्या अर्थव्यवस्थेत कसे होते, हे समजून घेण्याचा आहे. कोणत्याही देशाला आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या १२ टक्के बचत करणे शक्य असते; कारण दरिद्री म्हणविणारे देशदेखील युध्द व इतर अनुत्पादक बाबींवर बराच खर्च एरव्ही करीत असतात. शिवाय अशा राष्ट्रांमधील सर्वाधिक उत्पन्न मिळविणारे १० टक्के लोक राष्ट्रीय उत्पन्नाचा ४० टक्के भाग चैनीत जगण्यासाठी खर्च करीत असतातच; याकडे प्रा.ल्यूइस आपले लक्ष वेधतात.

बिगर-भांडवलशाही मार्गाने आपला आर्थिक विकास साध्य करू पाहणाऱ्या देशांच्या दृष्टीने अंतर्गत बचतीचे महत्त्व अनन्यसाधारण असते. अशा अर्थव्यवस्थांच्या बाबतीत अंतर्गत बचतीला परकीय मदत, करवाढ किंवा चलनवाढ हे तीन पर्याय असतात. परंतु परकीय मदतीतून निर्माण होणार नववसाहतवादी प्रवृत्तींचा धोका, करवाढीवर पडणाऱ्या मर्यादा व चलनवाढीमुळे राहणीमानात अधिकच घट होण्याची आपत्ती यांमुळे अंतर्गत बचत वाढविणे हाच विकासाचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. कल्याणकारी राज्यात बचत ही एका बाजूने चलनवाढीला आळा घालण्याचे कार्य करते. तर दुसऱ्या बाजूने लोकोपयोगी सेवा-उद्योगात तिची गुंतवणूक होऊन अधिक आर्थिक कल्याण साध्य करण्याचा प्रयत्न होतो.
उत्तर लिहिले · 11/6/2022
कर्म · 53710
0
उत्तरा:

अंतर्गत बचतींना वास्तविक बचत असे म्हणतात.

वास्तविक बचत:

  • अंतर्गत बचत म्हणजे संस्थेच्या आतून केलेली बचत.
  • यात कच्चा माल, श्रम, आणि इतर खर्चात घट करून उत्पादन वाढवणे अपेक्षित असते.
  • या उपायांमुळे संस्थेची कार्यक्षमता वाढते.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1200

Related Questions

चालू खाते आणि बचत खाते यात काय फरक आहे?
बचत गटाला म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी काय करावे लागेल?
बचत गट म्युच्युअल फंड्स मध्ये पैसे गुंतवणूक करू शकतात का?
पुरुष बचत गटासाठी सरकारी योजना आहेत का?
पैसे सेव्ह कसे करावेत?
भारतातील बचतीची रचना व प्रकार स्पष्ट करा?
सातबारा वरील बचत गटाचा बोजा कमी करण्यासाठी बँकेला अर्ज कसा लिहावा?