2 उत्तरे
2
answers
विजय अथवा यश संपादन करावयाचे असल्यास काय करावे?
0
Answer link
यश आज्ञा घेउन येत नसते. परंतु त्यासाठी पराकाष्ठा करावी लागते. दुःखाचे डोंगर ओलांडल्याशीवाय सुखाची हिरवळ दिसू शकत नाही.
प्रयत्नांचा प्रवास करीत असताना यशाचा मुक्काम करण्यासाठी नशीब ही एक धर्मशाळा आहे.
चिकाटी व आत्मविश्वास ह्या यशाच्या गुरुकिल्ल्या आहेत. एकवटून व एकसारखे प्रयत्न करीत राहणे यातच विजयाचे रहस्य भरलेले आहे.
धाडस केल्याशीवाय यश आणि संपत्ती मिळत नसते. 'मरेन किंवा मारीन' हाच आपला बाणा असावा! यश तरी मिळेल किंवा देह तरी पडेल.
यश संपादणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे.
'यश आपल्या नशीबातच नाही' हे नकाराचे तत्वज्ञान मानवी अंतःकरणाच्या चिंध्याचिंध्या करते. त्यामुळे पावलोपावली मनुष्य खचत जातो. तुम्हाला जगात एखादी गोष्ठ संपादन करवयाची असेल तर 'विजयी' मुद्रेनेच ती मिळवण्यासाठी बाहर पडायला पाहीजे.
वेळेवर अंग चोरण्याची रडकी वृत्ती हां स्वतःचा विश्वासघात, आपल्या दैवी शक्तीची ही फसवणूक हेच यशाचे प्रबळ शत्रू आहेत.
योग्य वेळी, योग्य दिशेने, प्रयत्न केले गेले म्हणजे यशाची शक्यता निर्माण होते.
मनाला शत्रु समजून जो त्याला जिकण्याचा प्रयत्न करतो. त्यालाच सफलता प्राप्त होते.
यश गाजवण्याचे आलेले कितीतरी प्रसंग तसेच जाऊ देणारे हजारो कमनशीबी लोक आपणास माहीत असतात.
दुसऱ्याचे मोजमाप आपल्या यशाला लावून पाहू नये आपलेच माप लावून पाहावे म्हणजे निराशेचा प्रसंग येणार नाही आणि आलाच तर दुःख होणार नाही.
कर्तृत्वाची पराकाष्ठा करावयाची यश प्राप्त करावयाचे परंतु यशाची पताका मिरवायची नाही. न बोलता समर्पणाच्या समाधानात संतुष्ठ राहावयाचे हा खरा मार्ग असतो. हा कष्टसाध्य मार्ग ज्यांनी साधला त्यांच्या सुखाला कशानेही कमीपणा येत नाही.
यश मिळवायचे असेल तर वृत्तीला अनुसरुन ध्येय बाळगले पाहीजे. ध्येयाच्या पुर्तीसाठी साधनांची एकनिष्ठता राखली पाहीजे. विजय मिळवायचा असेल,यश संपादन करायचे असेल तर यशाच्याच विचारांची दृढ कास धरा.
रिकाम्या वेळेचा उपयोग आत्मनिरीक्षणाकडे व आत्मोवृत्तीकडे करता येणे हे यशाचे , भाग्याचे व किर्तीचे उघड रहस्य आहे.
प्रयत्न सोडू नकोस! संकटांना डरु नकोस! यशाचा मार्ग जवळच आहे. तुला यश मिळालेच पाहीजे. 'पुढे जा' ही धीर देणारी व स्फूर्ती पुरविणारी शक्ती म्हणजेच अात्मश्रद्धा होय.
धीर सोडू नकोस! प्रयत्न फसला म्हणून फिरून प्रयत्न करून पहा! यश मिळेपर्यंत प्रयत्न चालू ठेवणे हाच उत्तम व्यवहार होय.
'मी यशस्वी होणारच' हा यशाविषयीचा दृढ आत्मविश्वासच आपणांस अंधारातून देखील मार्ग चालत राहण्यास स्फूर्ती देतो.
यशस्वीपणे माघार घेऊ शकणारा पुरुषच जीवनात नेहमी विजय मिळवू शकतो.
आयुष्याच्या नानाविध प्रसंगात 'आत्मविश्वास' हा एकच असा सोबती आहे की त्याच्यावरच अापण सदैव विश्वास टाकून खुशाल मार्ग चालत राहावे.
शारिरीक शक्तीवर मानसिक विवेकबुद्धीचे नियंत्रण पाहीजे.
केवढे प्रचंड सामर्थ्य तुमच्या अंतःकरणात अात्मविश्वासाच्या रूपाने साठवलेले आहे! हे तुम्ही,स्वतःचे सर्व अंतःकरण कामात पूर्णपणे ओतल्याशिवाय तुमच्या प्रत्यक्ष अनुभवास येणारच नाही.
काम करताना उत्साह खचत असेल, निराशावाद वाढत असेल तर अापण खात्रीने समजावे की आपण यशाची वाट चुकलो आहोत व आपला अधःपात होत आहे.
कोणत्याही कामाची योग्यता ही त्या कामावर अवलंबून नसते. कर्त्यांच्या आत्मश्रद्धेनेच, काम करणाऱ्याच्या हार्दीक उत्साहामुळेच कामाची किंमत वाढत असते.
श्रद्धा हा स्फूर्तीचा अखंड व अगाध असा समुद्र आहे.
मेहनत, धैर्य आणि धाडस या सफलतेच्या चाव्या आहेत.
जगातले आपले खरे स्थान ओळखणे हे यशाचे मूल्य बीज आहे. स्वंयस्फूर्त महत्वाकांक्षा नसणे हे मृत जीवन आहे.
ज्या कार्यात स्वतःचे मन रमत नाही त्या कार्याला 'यशाचे सौंदर्य' मुळीच प्राप्त होत नाही.
मनुष्याची कल्पना व त्याने प्राप्त केलेले यश या दोन्हीमध्ये फार अंतर असते.
जीवनात यश पचवणं फार सोपं असतं, पण अपयश पचवणं फारच कठिण असतं.
तुमच्या मुद्रेवरच तुमचे सर्व अंतःकरण उमटलेले दिसते. पुष्कळ माणसे जगापाशी नेहमी भीकच मागत राहतात. यशाचा संभव असला तरी जगाला त्यांच्या चेहऱ्यावर 'दुर्दैव' अशी पाटी लावलेली दिसते.
जबाबदारी टाकली म्हणजेच माणूस कार्यान्वीत होतो. करायला सुरवात झाली म्हणजेच यश मिळते. प्रत्यक्ष काही करून पाहील्याशीवाय आत्मविश्वास वाढत नाही. आत्मविश्वास असल्याशीवाय स्वतः जबाबदारी घेण्याची इच्छा होत नाही.
पराक्रमी पुरुषालासुद्धा प्रयत्न करून यश मिळतेच असे नाही. यश अथवा फळ मिळणार असेल तरच मी प्रयत्न करणार असा विचार करून आळसात वेळ घालविणाऱ्याला प्राप्ती कधीच होत नसते. यशावर लक्ष केंद्रीत करणाराकडून प्रयत्नांकडे दुर्लक्ष होत असते.
सावधपणानं केलेल्या कामातही पुष्कळदा अपयश येतं. म्हणून विचारांचा तोल सांभाळत निर्णय घेतला पाहीजे.
पराजयावरही मात करून यशस्वी वाट शोधणं हा माणसांचा गुण असावा.
मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासाठी बळ देत असतो.
यशाचे खरे गमक कोणते असेल? तर हे की, दुसऱ्याचा दृष्टीकोण समजून घेण्याची शक्ती असणे. व एखाद्या गोष्ठीकडे त्याच्या व स्वतःच्या दृष्टीकोणातून पाहणे.
विचाराला आचाराची जोड नसते, हेच अपयशाचे खरे कारण आहे.
उत्साही, उद्योगी व पुरुषार्थी माणसाजवळ निराशा उभ्या राहू शकत नाहीत.
प्रयत्नां ऐवजी निष्क्रिय दैवाला अवास्तव महत्त्व देण्याची मनोवृत्तीच आपणांस नेहमी अपयशी बनवित असते.
सामान्य पराजयानं जी माणसं माघार घेतात ती जीवनातील यश गमावून बसतात.
शेवटी माणसाच्या आयुष्यात सगळ्यात जास्त काय असेल तर ते अपयश असतं. यश निसटतंच असतं हे ज्या माणसाला कळत तोच आयुष्यात यशस्वी होतो.
पाण्यावर बांधल्या जाणाऱ्या घरांप्रमाणे पायात टाकलेला दगड पाण्यातच बुडत जातो. कारण त्याच्या मुखावरच अपयशाची काळीमा पसरलेली असते. त्यांच्या कपाळावर त्यांनीच स्वहस्ताने 'अपयश' ही अक्षरे लिहिलेली असतात.
बहुतकांचे अपयश हे त्यांच्या स्वतःच्याच ठिकाणच्या संशयामुळे, अर्धवटपणामुळे, साहसहीनतेमुळे आलेले दिसते.
ज्या संकटांना लोक भीत असतात तीच संकटे 'भीत्यापोटी ब्रह्मराक्षस' या न्यायाने पाठीस लागतात.अपयशाची भीती हेच पुष्कळदा पुष्काळांच्या बाबतीत अपयशाचे मुख्य कारण असते.
उच्च ध्येय सफल न झाले तरी ते सफल क्षुद्र ध्येयापेक्षा केव्हाही श्रेष्ठच होय. अपयश हे पाप नव्हे. क्षुद्र ध्येय हेच घोर पाप आहे. उच्च ध्येयनिष्ठता हीच जीवनाची सर्वश्रेष्ठता आहे. जसे ध्येय तसेच श्रेय.
असत्य विषयामध्ये आसक्त होणारा पापी त्या मनुष्य मोहात सापडून भयंकर अपयशाचा धनी होतो. त्याला भयंकर संकटांना तोंड द्यावे लागते. मृत्युचे भय त्याच्याभोवती सतत भ्रमण करीत असते. भयग्रस्त पापी पुरुष आधीच अर्धमेला झालेला असतो. स्वतःच्या हाताने तो स्वतःचा सत्यानाश करून घेत असतो. त्याला कोणीही साह्य करू शकत नाही. त्याची सुटका करणे कोणालाही शक्य नसते. विनाश हाच त्याचा शेवट असतो.
एखाद्या अपयशाने आत्महत्या करण्याऐवजी जीवंत राहून त्या अपयशावर मात करण्याची तयारी असावी.
पराभव म्हणजे काय? केवळ शिक्षण. हातून काहीतरी अधिक चांगले घडण्याची पहिली पायरी.
अपयश म्हणजे काही आपला दोष नव्हे. योग्यमार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.
नेहमी अपयश येणे यात आश्चर्य नाही. यश म्हणजे समाप्ती. ती नेहमी कशी येईल? ती एकदाच यावयाची.
अपयशाची अनेक कारणे आहेत पण कमी आत्मविश्वास म्हणजे खरे अपयश होय.
काही काही पराजय हे विजयाइतकेच प्रभावी असतात.
यशस्वी माणूसच समाजाला पटकन वाईट शिकवू शकतो. आम्हाला आमच्या अपयशाची जेवढी गॅरेंटी तेवढी विद्वानांना त्यांच्या यशाची नाही. पण हे कुणी कुणाला आणि कसं पटवून द्यायचं?
समाजात सर्वात निरुपद्रवी कुणी असेल तर तो म्हणजे अपयशी माणूस.कारण समाज त्याच्याकडे बघतच नाही. त्यांच लक्ष असतं यशस्वी माणसांकडे आणि ह्या यशस्वी माणसांना पुष्कळदा यश कसं मिळतं? तर अपेक्षा नसताना.
जो काळ मनुष्याला विजयदायक वाटत असतो, तोच त्याच्या पराजयाचे कारण होत असतो.
दुर्बळ माणसाला कोणीही सहाय्य करीत नसते.
जगातील घाण नाहीशी करण्यासाठी घाणीमध्ये हात घातल्यावाचून गत्यंतर नसते.
कर्माच्या उद्दीष्टावरून कर्माची प्रत ठरत असते.
नीतीमान माणसाचे अनुकरण अनीतीमान पुरुषाला करता येत नाही.
महान कार्य करण्यासाठी साधन सुद्धा महान असावे लागते. साधना सुद्धा महान करावी लागते.
संकट येण्यापूर्वी सावध होणे हे नेहमीच हितकर असते.
देणारा तयार असला तरी मागणाराला काय मागावे याची अक्कल असावी लागते.
यश आज्ञा घेउन येत नसते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.
0
Answer link
विजय किंवा यश मिळवण्यासाठी काही गोष्टी करणे महत्त्वाचे आहे:
- ध्येय निश्चित करा: तुम्हाला काय मिळवायचे आहे, हे स्पष्टपणे ठरवा.
- योजना तयार करा: आपले ध्येय साध्य करण्यासाठी एक योजना तयार करा आणि तिचे पालन करा.
- कठोर परिश्रम करा: यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे.
- चिकाटी ठेवा: अपयश आले तरी हार मानू नका. चिकाटीने प्रयत्न करत राहा.
- शिका आणि सुधारणा करा: आपल्या चुकांमधून शिका आणि आपल्या कामात सुधारणा करा.
- सकारात्मक दृष्टिकोन ठेवा: सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्हाला अधिक प्रेरणा मिळेल.
- इतरांची मदत घ्या: गरज वाटल्यास इतरांची मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका.
याव्यतिरिक्त, काही अतिरिक्त गोष्टी ज्या तुम्हाला मदत करू शकतात:
- आत्मविश्वास ठेवा
- सकारात्मक विचार करा
- वेळेचे व्यवस्थापन करा
- नवीन गोष्टी शिकत राहा
- धैर्य ठेवा
तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि कठोर परिश्रम केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.