Topic icon

यश

0
यशाची किंमत पचवलेल्या अपयशावर मोजता येते, किती काळ, किती वेळ, किती प्रयत्न करून यश संपादन केले यावर यशाचे मोजमाप करता येईल असे माझे म्हणणे आहे.

आणि आपण यश संपादन केल्यावर आपल्या हितचिंतक व्यक्तींचे अभिमानाने मान उंचावणे हे आपल्या यशाची किंमत ठरवते, पण ते मोजता येणार नाही कारण अगणित भावनांचा स्रोत कधीच कुणाला मोजता येत नाही, येणार नाही.

म्हणून यशाची व्याप्ती अपयशावर ठरते.
उत्तर लिहिले · 19/6/2022
कर्म · 53700
0


 
यश आज्ञा घेउन येत नसते. परंतु त्यासाठी पराकाष्ठा करावी लागते. दुःखाचे डोंगर ओलांडल्याशीवाय सुखाची हिरवळ दिसू शकत नाही.

प्रयत्नांचा प्रवास करीत असताना यशाचा मुक्काम करण्यासाठी नशीब ही एक धर्मशाळा आहे.

चिकाटी व आत्मविश्वास ह्या यशाच्या गुरुकिल्ल्या आहेत. एकवटून व एकसारखे प्रयत्न करीत राहणे यातच विजयाचे रहस्य भरलेले आहे.

धाडस केल्याशीवाय यश आणि संपत्ती मिळत नसते. 'मरेन किंवा मारीन' हाच आपला बाणा असावा! यश तरी मिळेल किंवा देह तरी पडेल.

यश संपादणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे.

'यश आपल्या नशीबातच नाही' हे नकाराचे तत्वज्ञान मानवी अंतःकरणाच्या चिंध्याचिंध्या करते. त्यामुळे पावलोपावली मनुष्य खचत जातो. तुम्हाला जगात एखादी गोष्ठ संपादन करवयाची असेल तर 'विजयी' मुद्रेनेच ती मिळवण्यासाठी बाहर पडायला पाहीजे.

वेळेवर अंग चोरण्याची रडकी वृत्ती हां स्वतःचा विश्वासघात, आपल्या दैवी शक्तीची ही फसवणूक हेच यशाचे प्रबळ शत्रू आहेत.

योग्य वेळी, योग्य दिशेने, प्रयत्न केले गेले म्हणजे यशाची शक्यता निर्माण होते.

मनाला शत्रु समजून जो त्याला जिकण्याचा प्रयत्न करतो. त्यालाच सफलता प्राप्त होते. 

यश गाजवण्याचे आलेले कितीतरी प्रसंग तसेच जाऊ देणारे हजारो कमनशीबी लोक आपणास माहीत असतात.

दुसऱ्याचे मोजमाप आपल्या यशाला लावून पाहू नये आपलेच माप लावून पाहावे म्हणजे निराशेचा प्रसंग येणार नाही आणि आलाच तर दुःख होणार नाही.

कर्तृत्वाची पराकाष्ठा करावयाची यश प्राप्त करावयाचे परंतु यशाची पताका मिरवायची नाही. न बोलता समर्पणाच्या समाधानात संतुष्ठ राहावयाचे हा खरा मार्ग असतो. हा कष्टसाध्य मार्ग ज्यांनी साधला त्यांच्या सुखाला कशानेही कमीपणा येत नाही.

यश मिळवायचे असेल तर वृत्तीला अनुसरुन ध्येय बाळगले पाहीजे. ध्येयाच्या पुर्तीसाठी साधनांची एकनिष्ठता राखली पाहीजे. विजय मिळवायचा असेल,यश संपादन करायचे असेल तर यशाच्याच विचारांची दृढ कास धरा.

रिकाम्या वेळेचा उपयोग आत्मनिरीक्षणाकडे व आत्मोवृत्तीकडे करता येणे हे यशाचे , भाग्याचे व किर्तीचे उघड रहस्य आहे.

प्रयत्न सोडू नकोस! संकटांना डरु नकोस! यशाचा मार्ग जवळच आहे. तुला यश मिळालेच पाहीजे. 'पुढे जा' ही धीर देणारी व स्फूर्ती पुरविणारी शक्ती म्हणजेच अात्मश्रद्धा होय.

धीर सोडू नकोस! प्रयत्न फसला म्हणून फिरून प्रयत्न करून पहा! यश मिळेपर्यंत प्रयत्न चालू ठेवणे हाच उत्तम व्यवहार होय. 

'मी यशस्वी होणारच' हा यशाविषयीचा दृढ आत्मविश्वासच आपणांस अंधारातून देखील मार्ग चालत राहण्यास स्फूर्ती देतो.

यशस्वीपणे माघार घेऊ शकणारा पुरुषच जीवनात नेहमी विजय मिळवू शकतो. 

आयुष्याच्या नानाविध प्रसंगात 'आत्मविश्वास' हा एकच असा सोबती आहे की त्याच्यावरच अापण सदैव विश्वास टाकून खुशाल मार्ग चालत राहावे.

शारिरीक शक्तीवर मानसिक विवेकबुद्धीचे नियंत्रण पाहीजे. 

केवढे प्रचंड सामर्थ्य तुमच्या अंतःकरणात अात्मविश्वासाच्या रूपाने साठवलेले आहे! हे तुम्ही,स्वतःचे सर्व अंतःकरण कामात पूर्णपणे ओतल्याशिवाय तुमच्या प्रत्यक्ष अनुभवास येणारच नाही.

काम करताना उत्साह खचत असेल, निराशावाद वाढत असेल तर अापण खात्रीने समजावे की आपण यशाची वाट चुकलो आहोत व आपला अधःपात होत आहे.

कोणत्याही कामाची योग्यता ही त्या कामावर अवलंबून नसते. कर्त्यांच्या आत्मश्रद्धेनेच, काम करणाऱ्याच्या हार्दीक उत्साहामुळेच कामाची किंमत वाढत असते.

श्रद्धा हा स्फूर्तीचा अखंड व अगाध असा समुद्र आहे.

मेहनत, धैर्य आणि धाडस या सफलतेच्या चाव्या आहेत.

जगातले आपले खरे स्थान ओळखणे हे यशाचे मूल्य बीज आहे. स्वंयस्फूर्त महत्वाकांक्षा नसणे हे मृत जीवन आहे.

ज्या कार्यात स्वतःचे मन रमत नाही त्या कार्याला 'यशाचे सौंदर्य' मुळीच प्राप्त होत नाही.

मनुष्याची कल्पना व त्याने प्राप्त केलेले यश या दोन्हीमध्ये फार अंतर असते.

जीवनात यश पचवणं फार सोपं असतं, पण अपयश पचवणं फारच कठिण असतं.

तुमच्या मुद्रेवरच तुमचे सर्व अंतःकरण उमटलेले दिसते. पुष्कळ माणसे जगापाशी नेहमी भीकच मागत राहतात. यशाचा संभव असला तरी जगाला त्यांच्या चेहऱ्यावर 'दुर्दैव' अशी पाटी लावलेली दिसते.

जबाबदारी टाकली म्हणजेच माणूस कार्यान्वीत होतो. करायला सुरवात झाली म्हणजेच यश मिळते. प्रत्यक्ष काही करून पाहील्याशीवाय आत्मविश्वास वाढत नाही. आत्मविश्वास असल्याशीवाय स्वतः जबाबदारी घेण्याची इच्छा होत नाही.

पराक्रमी पुरुषालासुद्धा प्रयत्न करून यश मिळतेच असे नाही. यश अथवा फळ मिळणार असेल तरच मी प्रयत्न करणार असा विचार करून आळसात वेळ घालविणाऱ्याला प्राप्ती कधीच होत नसते. यशावर लक्ष केंद्रीत करणाराकडून प्रयत्नांकडे दुर्लक्ष होत असते.

सावधपणानं केलेल्या कामातही पुष्कळदा अपयश येतं. म्हणून विचारांचा तोल सांभाळत निर्णय घेतला पाहीजे.

पराजयावरही मात करून यशस्वी वाट शोधणं हा माणसांचा गुण असावा.

मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासाठी बळ देत असतो. 

यशाचे खरे गमक कोणते असेल? तर हे की, दुसऱ्याचा दृष्टीकोण समजून घेण्याची शक्ती असणे. व एखाद्या गोष्ठीकडे त्याच्या व स्वतःच्या दृष्टीकोणातून पाहणे.

विचाराला आचाराची जोड नसते, हेच अपयशाचे खरे कारण आहे.

उत्साही, उद्योगी व पुरुषार्थी माणसाजवळ निराशा उभ्या राहू शकत नाहीत.

प्रयत्नां ऐवजी निष्क्रिय दैवाला अवास्तव महत्त्व देण्याची मनोवृत्तीच आपणांस नेहमी अपयशी बनवित असते.

सामान्य पराजयानं जी माणसं माघार घेतात ती जीवनातील यश गमावून बसतात.

शेवटी माणसाच्या आयुष्यात सगळ्यात जास्त काय असेल तर ते अपयश असतं. यश निसटतंच असतं हे ज्या माणसाला कळत तोच आयुष्यात यशस्वी होतो.

पाण्यावर बांधल्या जाणाऱ्या घरांप्रमाणे पायात टाकलेला दगड पाण्यातच बुडत जातो. कारण त्याच्या मुखावरच अपयशाची काळीमा पसरलेली असते. त्यांच्या कपाळावर त्यांनीच स्वहस्ताने 'अपयश' ही अक्षरे लिहिलेली असतात.

बहुतकांचे अपयश हे त्यांच्या स्वतःच्याच ठिकाणच्या संशयामुळे, अर्धवटपणामुळे, साहसहीनतेमुळे आलेले दिसते.

ज्या संकटांना लोक भीत असतात तीच संकटे 'भीत्यापोटी ब्रह्मराक्षस' या न्यायाने पाठीस लागतात.अपयशाची भीती हेच पुष्कळदा पुष्काळांच्या बाबतीत अपयशाचे मुख्य कारण असते.

उच्च ध्येय सफल न झाले तरी ते सफल क्षुद्र ध्येयापेक्षा केव्हाही श्रेष्ठच होय. अपयश हे पाप नव्हे. क्षुद्र ध्येय हेच घोर पाप आहे. उच्च ध्येयनिष्ठता हीच जीवनाची सर्वश्रेष्ठता आहे. जसे ध्येय तसेच श्रेय.

असत्य विषयामध्ये आसक्त होणारा पापी त्या मनुष्य मोहात सापडून भयंकर अपयशाचा धनी होतो. त्याला भयंकर संकटांना तोंड द्यावे लागते. मृत्युचे भय त्याच्याभोवती सतत भ्रमण करीत असते. भयग्रस्त पापी पुरुष आधीच अर्धमेला झालेला असतो. स्वतःच्या हाताने तो स्वतःचा सत्यानाश करून घेत असतो. त्याला कोणीही साह्य करू शकत नाही. त्याची सुटका करणे कोणालाही शक्य नसते. विनाश हाच त्याचा शेवट असतो. 

एखाद्या अपयशाने आत्महत्या करण्याऐवजी जीवंत राहून त्या अपयशावर मात करण्याची तयारी असावी.

पराभव म्हणजे काय? केवळ शिक्षण. हातून काहीतरी अधिक चांगले घडण्याची पहिली पायरी.

अपयश म्हणजे काही आपला दोष नव्हे. योग्यमार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

नेहमी अपयश येणे यात आश्चर्य नाही. यश म्हणजे समाप्ती. ती नेहमी कशी येईल? ती एकदाच यावयाची.

अपयशाची अनेक कारणे आहेत पण कमी आत्मविश्वास म्हणजे खरे अपयश होय.

काही काही पराजय हे विजयाइतकेच प्रभावी असतात.

 यशस्वी माणूसच समाजाला पटकन वाईट शिकवू शकतो. आम्हाला आमच्या अपयशाची जेवढी गॅरेंटी तेवढी विद्वानांना त्यांच्या यशाची नाही. पण हे कुणी कुणाला आणि कसं पटवून द्यायचं?

 समाजात सर्वात निरुपद्रवी कुणी असेल तर तो म्हणजे अपयशी माणूस.कारण समाज त्याच्याकडे बघतच नाही. त्यांच लक्ष असतं यशस्वी माणसांकडे आणि ह्या यशस्वी माणसांना पुष्कळदा यश कसं मिळतं? तर अपेक्षा नसताना.

जो काळ मनुष्याला विजयदायक वाटत असतो, तोच त्याच्या पराजयाचे कारण होत असतो.

दुर्बळ माणसाला कोणीही सहाय्य करीत नसते.

जगातील घाण नाहीशी करण्यासाठी घाणीमध्ये हात घातल्यावाचून गत्यंतर नसते.

कर्माच्या उद्दीष्टावरून कर्माची प्रत ठरत असते.

नीतीमान माणसाचे अनुकरण अनीतीमान पुरुषाला करता येत नाही.

महान कार्य करण्यासाठी साधन सुद्धा महान असावे लागते. साधना सुद्धा महान करावी लागते.

संकट येण्यापूर्वी सावध होणे हे नेहमीच हितकर असते.

देणारा तयार असला तरी मागणाराला काय मागावे याची अक्कल असावी लागते.

यश आज्ञा घेउन येत नसते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.

उत्तर लिहिले · 10/6/2022
कर्म · 53700
0

प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याची मुलाखत:

मुलाखतकार: अभिनंदन! प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!

विद्यार्थी: धन्यवाद सर!

मुलाखतकार: या यशाबद्दल तुम्हाला काय वाटते?

विद्यार्थी: खूप आनंद होत आहे. माझ्या कष्टाचे फळ मिळाले, असे वाटते.

मुलाखतकार: तुम्ही यासाठी किती अभ्यास केला? तुमची अभ्यासाची पद्धत काय होती?

विद्यार्थी: मी नियमितपणे अभ्यास करत होतो. दिवसाचे ठराविक तास अभ्यासासाठी राखीव ठेवले होते. त्याचबरोबर, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (question papers) देखील सोडवल्या.

मुलाखतकार: तुमच्या यशात कोणाचा वाटा आहे?

विद्यार्थी: माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. माझ्या शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले आणि मित्रांनी अभ्यासात मदत केली. त्यामुळे हे यश मला एकट्याला मिळवता आले नसते.

मुलाखतकार: इतर विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल?

विद्यार्थी: नियमित अभ्यास करा, शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्या. यश नक्की मिळेल!

मुलाखतकार: खूप खूप धन्यवाद!

विद्यार्थी: धन्यवाद सर!

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
3
प्रयत्न शील
 माणसांच्या सवयी 
काही लोकांमध्ये चिकाटी ओतप्रोत भरलेली असते.

कितीही बिकट परिस्थिती आली तरी खचून न जाता ते आलेल्या संकटाशी दोन हात करून त्यातून नुसतेच बाहेर पडत नाहीत तर त्यातून काहीतरी चांगलं करून, स्वतःला सिद्ध करून बाहेर पडतात.

अशा लोकांच्या नेमक्या काय सवयी असतात? वाचा या लेखात.

आयुष्यात नेहमी बिकट परिस्थितीवर मात करून त्यातून बाहेर पडून स्वतःला वारंवार सिद्ध करणारी काही लोकं असतात.

अपयशामुळे निराश न होता ही लोकं सतत प्रयत्न करत राहतात आणि करतील त्या कामात यश प्राप्त करतात.

या लोकांच्या अशा काही सवयी असतात ज्यामुळे त्यांच्या सगळ्याच प्रयत्नांना यश मिळतं.

आणि ते जे काही म्हणून करायला घेतील त्यात यशस्वीच होतात.

वरवर बघता बऱ्याचदा त्यांच्या या सवयींची कल्पना येत नाही.

बहुतेकवेळा तर त्यांचं नशीबच चांगलं असेल असं सुद्धा काहींना वाटतं पण मित्रांनो, असं अजिबात नसतं.

आपल्या प्रत्येक कामात यशस्वी होणाऱ्या लोकांच्या काही सवयी असतात, काही नैसर्गिक असतील काही त्यांनी लावून घेतलेल्या सुद्धा असतील.

पण या शिस्तीमुळेच त्यांना ते करतील त्या कामात यश मिळतं.

आज या लेखात आपण या यशस्वी माणसांच्या सवयी कोणत्या आहेत तेच जाणून घेणार आहोत.

१. ही माणसं सगळी कामं वेळेत करतात

वेळच्या वेळी सगळी कामं करण्याकडे यांचा कल असतो.

एखादं काम करायचं असेल तर ते आजचं उद्यावर, उद्याचं परवावर असं ढकलत न बसता त्या त्या वेळी करून टाकतात.

जरी ते काम पुढे ढकलण्यासारखं असेल, ते न केल्याने फार काही पडणार असेल तरी ही लोकं तसं करत नाहीत.

आज करायलाच हवं का? उद्या केलं तर नाही का चालणार?

असे प्रश्न त्यांच्या मनात येत नाहीत. जी कामं समोर असतील ती वेळेत करणं एवढंच त्यांना माहीत असतं.

जरी एखाद्या कामात त्यांना काही अडचण आली तरी त्यासाठी योग्य तो वेळ देऊन आणि गरज पडल्यास योग्य ती मदत घेऊन ते काम पार पाडतात.

आजचं काम आज केल्याने उद्यासाठी आपल्याकडे जास्त वेळ मिळतो आणि त्यामुळे आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढते.

हे सूत्र त्यांच्या ध्यानी-मनी पक्क झालेलं असतं…

२. त्यांची विचारसरणी सकारात्मक असते

त्यांना सकारात्मक विचार करण्यासाठी फार कष्ट लागत नाहीत.

असलेल्या परिस्थितीत कितीही संकटं असूदेत, मार्गात कितीही अडथळे असूदेत त्यांना कायम त्यात काहीतरी सकारात्मक गवसतंच.

आणि त्यातूनच त्यांना पुढे जायची प्रेरणा मिळते.

कोणत्याही संकटात किंवा अडचणीत आपण कितीही रुतत जात असलो तरी त्यात चांगलं असं काहीतरी असतंच, ज्यामुळे आपण त्या संकटावर मात करू शकतो.

यशस्वी लोकं फक्त या चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात आणि त्यावर काम करतात त्यामुळे समोर असलेल्या संकटावर ते अगदी सहज मात करू शकतात.

३. त्यांना दूरदृष्टी असते

कोणताही यशस्वी माणूस फक्त उद्यापुरतं नियोजन कधीच करत नाही.

त्यांच्या नियोजनात कायम पुढच्या किमान दहा वर्षांचा विचार असतो.

यामुळे आपल्या आजूबाजूला होत असलेल्या बदलांची त्यांना आधीच कल्पना असते, त्यांच्या तल्लख बुद्धीने हे बदल आधीच ओळखलेले असतात.

आणि त्यानुसार त्यांनी नियोजन केलंलं असतं.

आज एक प्लॅन तर उद्या दुसरा असं ते करत नाहीत.

वेळ गेला तरी चालेल पण कामात त्यांना असा हलगर्जीपणा खपत नाही.

योग्य वेळी, सगळा विचार करून ते कामाची आखणी करतात त्यामुळे त्यांचं नियोजन फसत नाही.

आणि त्यात सारखे बदल करायला लागून वेळ सुद्धा फुकट जात नाही.

४. व्यवस्थित नियोजनाबाबत ते आग्रही असतात

कोणतही काम करताना त्यांना नियोजन महत्वाचं वाटतं.

नवीन काम करायच्या आधी त्याबद्दल नीट माहिती मिळवून, त्यातून त्यांना किती फायदा होणार आहे, त्यासाठी त्यांना किती वेळ, पैसे आणि शक्ती खर्च करावी लागणार आहे, याचं ते नीट नियोजन करतात.

त्यातून एखादं काम करायचं का नाही हे त्यांना ठरवता येतं.

जर एखाद्या कामासाठी लागणारा वेळ आणि पैसा जास्त असेल आणि त्या मानाने त्यातून मिळणार नफा किंवा त्यांना अपेक्षित असलेलं समाधान कमी असेल तर अशा कामांसाठी त्यांना आपला वेळ घालवायचा नसतो.

एखादं काम हातात घेऊन नंतर सोडून देण्यापेक्षा ते काम हातात घ्यायच्या आधीच त्यातून त्यांना काय मिळणार आहे.

आणि त्यासाठी त्यांना काय खर्च करायला लागणार आहे याचा हिशोब मांडतात आणि आपला वेळ वाचवतात.

५. त्यांना पसारा आवडत नाही

घर असुदे किंवा डोकं.. यशस्वी माणसांना पसारा कुठेच खपत नाही.

मनात विचारांचं जाळं असेल तर लक्ष केंद्रित करायला अवघड जातं त्यामुळे कामं मनासारखी आणि वेळच्या वेळी होत नाहीत.

म्हणून खूप गोष्टींचा एकत्र विचार ते करत नाहीत तसंच एखाद्या गोष्टीचा अति विचार करून मनात विचारांची गर्दी सुद्धा करत नाहीत.

यशस्वी लोकांची कामाची जागा सुद्धा नीट आवरलेली असते. आजूबाजूला पसारा असेल तर लक्ष विचलित होतं.

आणि त्याचा आपल्या प्रॉडक्टिव्हिटीवर परिणाम होतो.

हेच जर आपण एखाद्या साफ, व्यवस्थित आवरलेल्या जागेत काम करत असू तर आपल्याला प्रसन्न वाटतं आणि आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढते.

म्हणूनच यशस्वी लोकांच्या काम करण्याच्या पद्धतीत एक शिस्त असते.

शिवाय घेतलेली गोष्ट जागेवर ठेवली की ती परत शोधायला सुद्धा सोपी जाते ज्यामुळे वेळ वाचतो.

६. ते कोणत्याच बदलाला घाबरत नाहीत

आयुष्यात चढउतार असतातच. कोणाचंच आयुष्य एका लयीत व्यतीत होत नसतं.

बदल हे सगळ्यांच्याच आयुष्यात होत असतात, काही हवेहवेसे तर काही अगदी विनाकारण.

पण हे बदल अपिरिहार्य असतात. अशा बदलांचा स्वीकार केला नाही तर त्रास आपल्यालाच होणार असतो.

परिस्थिती एकसारखी राहू शकत नाही आणि त्यामुळे आपण ही आपल्याच जुन्या कल्पनांमध्ये अडकून पडता कामा नये.

त्यात आपलंच नुकसान असतं याची यशस्वी लोकांना जाणीव असते.

म्हणूनच ते बदलेल्या काळाचा आणि परिस्थितीचा मोकळ्या मनाने स्वीकार करून त्यानुसार त्यांच्या कामाच्या पद्धतीत बदल करतात.

काही वेळा त्यांच्या जुन्या सवयी आणि जुन्या पद्धती सोडून काळानुसार नवीन सवयी लावून घेतात आणि नवीन पद्धतींचं स्वागत करून कामाची पद्धत सुद्धा बदलतात.

७. ते सतत स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करतात

आपण आपल्या कामात कितीही चांगले असलो तरी परिपूर्ण असू शकत नाही. हे यशस्वी लोकांना माहीत असतं.

नवीन गोष्टी शिकून त्या आचरणात आणायला त्यांची कधीच ना नसते.

उलट सतत नवीन गोष्टी शिकून त्यांना स्वतःमध्ये सुधारणा करायची इच्छा असते.

आणि तशी ते करतात सुद्धा. कोणाची त्यासाठी मदत मागायला, कोणाचा सल्ला ऐकण्यात त्यांना अजिबात कमीपणा वाटत नाही.

उलट येणाऱ्या प्रत्येक संकटातून आणि भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून ते काय शिकता येईल हे बघून त्यानुसार स्वतःमध्ये सुधारणा करत असतात.

८. त्यांची स्पर्धा स्वतःशीच असते

आपल्यापेक्षा कोण यशस्वी आहे, आपल्या पुढे कोण आहे.

किंवा आपण कोणाला मागे टाकलं आहे असा विचार करण्यात ते वेळ वाया घालवत नाहीत.

कोणी किती प्रगती केली किंवा कोणाची किती अधोगती झाली याच्यात त्यांना रस नसतो.

या पेक्षा त्यांचं लक्ष त्यांच्या स्वतःच्या प्रगतीवर असतं.

कालच्यापेक्षा आज आपल्या कामात सुधारणा आहे का? मागच्या वर्षीपेक्षा आता आपली परिस्थिती सुधारली आहे का?

असा विचार करत ते स्वतःमध्ये बदल घडवून आणत असतात.

इतरांशी तुलना करण्यापेक्षा त्यांना स्वतःमध्ये बदल घडवून, स्वतःला कालच्या पेक्षा आज सक्षम करणं महत्वाचं वाटतं.

९. ते नेहमी दुसऱ्याला मदत करतात

यशस्वी माणसं आत्मकेंद्रित असतात किंवा त्यांना ज्यात त्यात फक्त स्वतःचाच फायदा दिसतो असं अनेकांना वाटत असतं पण ते चूक आहे.

उलट आपल्या आयुष्यात यशस्वी असणारी माणसं नेहमी इतरांना मदत करण्यासाठी पुढे असतात.

यामुळेच त्यांचा संबंध अनेक लोकांशी येऊन त्यांच्याबरोबर त्यांचं नातं जुळतं आणि अडीअडचणीच्या वेळेस ते एकमेकांच्या कमी येतात.

यशस्वी माणसं दुसऱ्याचा पाय खेचून कधीच वर जायला बघत नाही, उलट ते इतर लोकांना सुद्धा हात धरून आपल्या बरोबर नेतात.

म्हणूनच त्यांच्याबद्दल सगळ्यांना आदर वाटतो.

१०. ते नेहमी उत्साही असतात

कोणत्याही कामाचा कंटाळा या लोकांना नसतो.

आपल्या कामात ते उत्साही असतातच पण त्याचबरोबर चार नवीन गोष्टी शिकण्यात, नवीन माहिती मिळवण्यात आणि त्याचा आपल्याला नेमका काय उपयोग आहे याचा विचार करण्याचा उत्साह त्यांच्यात ओतप्रोत भरलेला असतो.

मरगळ, कंटाळा हे शब्द त्यांच्या गावीही नसतात.

यामुळे त्यांच्याकडून एखादं काम झालं नाही असं होत नाही.

उत्साही वातावरणामुळे ते चार माणसं सुद्धा जोडतात ज्यामुळे परत त्यांचाच फायदा होतो.

मनात उत्साह असेल तर आपोआप प्रॉडक्टिव्हिटी सुद्धा वाढते.

, या सगळ्या सवयी काही एका दिवसात लावून घेणं शक्य नाही पण प्रयत्न करून आपण आपल्यात योग्य ते बदल करून, काही जुन्या सवयी सोडून द्यायची तयारी दाखवून या नवीन सवयी लावून घेऊ शकतो.

यामुळे आपली काम करायची पद्धत सुधारेल, आपल्याला कामात उत्साह वाटेल, आपलं मन फ्रेश राहील आपले नातेसंबंध सुधारतील…

थोडक्यात आपण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक कसोटीत यशस्वी होऊ.. आपल्याला हेच तर हवं आहे ना?

चला तर मग, लवकर कामाला लागा आणि या नवीन सवयी लावून घ्यायचा प्रयत्न करा..


उत्तर लिहिले · 7/10/2021
कर्म · 121765
0

मुलाखत: स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची


मुलाखतकार:नमस्कार! सर्वप्रथम, या मोठ्या यशाबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन!

विद्यार्थी: धन्यवाद!


मुलाखतकार:तुम्ही थोडक्यात तुमची ओळख करून द्या.

विद्यार्थी: मी [विद्यार्थ्याचे नाव], [शाळेचे नाव] मध्ये [इयत्ता] मध्ये शिकतो/शिकते.


मुलाखतकार:तुम्ही कोणत्या स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात तुम्हाला प्रथम क्रमांक मिळाला?

विद्यार्थी: मी [स्पर्धेचे नाव] या स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात मला प्रथम क्रमांक मिळाला.


मुलाखतकार:या स्पर्धेची तयारी तुम्ही कशी केली?

विद्यार्थी: मी नियमितपणे अभ्यास केला. माझ्या शिक्षकांनी मला खूप मदत केली आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार मी तयारी केली.


मुलाखतकार:तुम्हाला या स्पर्धेत कोणत्या अडचणी आल्या?

विद्यार्थी: वेळेचे व्यवस्थापन करणे थोडे कठीण होते, पण मी नियमित सराव करून त्यावर मात केली.


मुलाखतकार:तुम्ही तुमच्या यशाचे श्रेय कोणाला द्याल?

विद्यार्थी: मी माझ्या आई-वडिलांना, शिक्षकांना आणि मित्रांना माझ्या यशाचे श्रेय देईन, ज्यांनी मला सतत प्रोत्साहन दिले.


मुलाखतकार:तुम्ही तुमच्या भविष्यात काय करू इच्छिता?

विद्यार्थी: मला [भविष्यातील ध्येय] व्हायचे आहे आणि त्यासाठी मी कठोर परिश्रम करेन.


मुलाखतकार:तुम्ही इतर विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल?

विद्यार्थी: नियमित अभ्यास करा, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि कधीही हार मानू नका.


मुलाखतकार:तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!

विद्यार्थी: धन्यवाद!

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980
0
हरित क्रांतीच्या यशामध्ये अनेक व्यक्ती आणि संस्थांचे योगदान आहे, त्यापैकी काही प्रमुख व्यक्ती आणि त्यांचे योगदान खालीलप्रमाणे:
  • डॉ. एम. एस. स्वामीनाथन:
  • भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना ओळखले जाते. त्यांनी उच्च उत्पादन देणाऱ्या (high-yielding varieties - HYV) गव्हाच्या आणि तांदळाच्या वाणांचा विकास आणि प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
    योगदान:

    1. उच्च उत्पादन देणाऱ्या वाणांचा विकास.
    2. शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण.
    3. कृषी धोरणांच्या निर्मितीमध्ये सहभाग.

  • नॉर्मन बोरलॉग:
  • नॉर्मन बोरलॉग हे एक कृषीशास्त्रज्ञ होते आणि त्यांना 'हरित क्रांतीचे जनक' मानले जाते. त्यांनी गव्हाच्या उच्च उत्पादन देणाऱ्या वाणांचा विकास केला, ज्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये अन्न उत्पादन वाढण्यास मदत झाली.
    योगदान:

    1. गव्हाच्या उच्च उत्पादन देणाऱ्या वाणांचा विकास.
    2. भारताला गव्हाच्या उत्पादनात आत्मनिर्भर बनण्यास मदत.

  • सी. सुब्रमण्यम:
  • सी. सुब्रमण्यम हे भारताचे तत्कालीन कृषी मंत्री होते. त्यांनी हरित क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण धोरणे तयार केली आणि त्यांची अंमलबजावणी केली.
    योगदान:

    1. कृषी धोरणांचे निर्माण आणि अंमलबजावणी.
    2. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजनांची सुरुवात.

  • इतर शास्त्रज्ञ आणि कृषी संस्था:
  • अनेक कृषी शास्त्रज्ञांनी आणि संस्थांनी हरित क्रांतीमध्ये मोलाची भर घातली. त्यांनी विविध पिकांचे उच्च उत्पादन देणारे वाण विकसित केले आणि शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकवले.
    उदाहरणे:

    1. भारतीय कृषी संशोधन संस्था (Indian Agricultural Research Institute - IARI).
    2. विविध राज्यांतील कृषी विद्यापीठे.

या व्यक्ती आणि संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भारतात हरित क्रांती यशस्वी झाली आणि अन्नसुरक्षा प्राप्त करणे शक्य झाले.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980
0
हरितक्रांतीच्या यशामध्ये अनेक व्यक्ती आणि संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यापैकी काही प्रमुख व्यक्ती आणि त्यांच्या योगदानाचा येथे उल्लेख आहे:
  • डॉ. नॉर्मन बोरलॉग (Dr. Norman Borlaug):
  • डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना 'हरितक्रांतीचे जनक' मानले जाते. त्यांनी गव्हाच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती विकसित केल्या. त्यांचे कार्य मेक्सिकोमध्ये सुरू झाले आणि नंतर ते भारत आणि पाकिस्तानमध्ये पसरले. Britannica - Norman Borlaug

  • डॉ. एम. एस. स्वामीनाथन (Dr. M. S. Swaminathan):
  • भारतामध्ये हरितक्रांती यशस्वी करण्यात डॉ. स्वामीनाथन यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी गव्हाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करण्यासाठी डॉ. बोरलॉग यांच्यासोबत काम केले. Britannica - M. S. Swaminathan

  • सी. सुब्रमण्यम (C. Subramaniam):
  • तत्कालीन कृषी मंत्री सी. सुब्रमण्यम यांनी हरितक्रांतीला भारतात प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण धोरणे तयार केली आणि त्यांची अंमलबजावणी केली.

  • इतर शास्त्रज्ञ आणि कृषी संस्था:
  • अनेक कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञांनी देखील हरितक्रांतीत महत्वाचे योगदान दिले. त्यांनी नवीन तंत्रज्ञान विकसित केले आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले.

या व्यक्ती आणि संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हरितक्रांती यशस्वी झाली आणि भारताला अन्न उत्पादनात स्वयंपूर्णता प्राप्त झाली.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980