शरीर शरीरशास्त्र हृदय व रक्तवाहिन्या

मानवी शरीरातील हृदयाच्या विविध कप्प्यांचे काय कार्य आहे?

2 उत्तरे
2 answers

मानवी शरीरातील हृदयाच्या विविध कप्प्यांचे काय कार्य आहे?

0

मानवी हृदयाला चार कप्पे आहेत.

उजवे अलिंद / rihht atrium /उजवी कर्णिका

डावे अलिंद

उजवे निलय / उजवी जवनिका / Right ventricle

डावे निलय




आपल्या हृदयाचा आकार हा प्रौढ व्यक्तीच्या बंद

मुठी येव्हडा असतो.

दररोज अंदाजे 115000 हृदयाला ठोके पडतात.

आपल्याला आपल्या हृदयाची धडधड/ लब-दब आवाज का ऐकू येतो ? तर हृदयांच्या झडपा बंद होणे व उघडणे यातून हा आवाज निर्माण होतो.


शरीराच्या सर्व भागातील अल्प ऑक्सिजन युक्त रक्त हृदयात येणे, हृदयाकडून ते रक्त ऑक्सिजन युक्त करण्यासाठी फुप्फुसाकडे पाठवणे , ऑक्सीजन युक्त झालेले रक्त फुप्फुसाकडून पुन्हा हृदयात व हृदयातून शरीराकडे पाठवण्यासाठी याला रक्ताभिसरण असे म्हणतात.



आता चार कप्प्यांचे कार्य आपण पाहू.

अधो महाशीर inferior vena cava हृदयाच्या खालील सर्व भागातील रक्त हृदयाकडे आणते, ऊर्ध्व महाशीर superior vena cava हृदयाच्या वरील भागातील रक्त हृदयात आणते, इथे हृदयात म्हणजे उजवे अलिंद right atrium.

याच वेळेस चार फुप्फुस शिरा द्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त डाव्या अलिंदा मध्ये येते.( केवळ फुप्फुस शिरा द्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त वाहते बाकी सर्व शिरांमधून अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त वाहते म्हणजेच ज्यामध्ये कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण जास्त आहे असे )

दोन्ही अलिंदे जेव्हा रक्ताने पूर्णपणे भरतात तेव्हा त्रिदल (त्री- 3 , दल - पाकळ्या) व द्विदल (द्वी - 2 )झडप उघडते व अनुक्रमे उजव्या निलयामध्ये व डाव्या निलयात येते. त्रिदल झडप खालील प्रमाणे दिसते.


द्विदल झडप खालील प्रमाणे दिसते.




या झडपा मुळे रक्त उलट दिशेने वाहत नाही. केवळ एकाच दिशेने रक्तप्रवाह व्हावा यासाठी ही योजना आहे.

दोन्ही निलय रक्ताने पूर्ण भरल्यावर हृदय स्नायु आकुंचन पावतात . उजव्या निलयातील रक्त शुद्ध होण्यासाठी डाव्या व उजव्या धमनी ( हा अपवाद आहे) मधून फुप्फुसाकडे जाते. तर डाव्या निलयातील रक्त महाधमनी द्वारे शरीराच्या सर्व भागाला पोहोचते.

धमणी मधून ऑक्सिजनयुक्त रक्त वाहते तर शिरा मधून अल्प ऑक्सिजनयुक्त म्हणजेच कार्बन-डाय-ऑक्‍साईड युक्त रक्त वाहते.

धमन्या शरीरामध्ये खोलवर स्थित असतात तर शिरा त्वचेला लागत असतात.

धमन्याना झडपा नसतात तर शिरांना विशिष्ट ठिकाणी झडपा असतात. मनगटावरील झडप सर्वपरिचित आहे.




हृदयाचे कार्य हे स्वायत्त चेता संस्थे द्वारे चालते. autonomous nervous system त्यामुळे आपले नियंत्रण त्याच्यावर नसते.


उत्तर लिहिले · 8/6/2022
कर्म · 53715
0

मानवी हृदयामध्ये चार कप्पे असतात: दोन आलिंद (Atria) आणि दोन निलये (Ventricles).

1. उजवे आलिंद (Right Atrium):
  • हे शरीरभरून आलेले अशुद्ध रक्त (oxygen-poor blood) स्वीकारते.
  • महाशीर (vena cava) या मोठ्या रक्तवाहिनीद्वारे हे रक्त येते.
  • उजवे आलिंद हे रक्त उजव्या निलयात (Right Ventricle) ढकलते.
2. उजवे निलय (Right Ventricle):
  • उजव्या आलिंदातून आलेले अशुद्ध रक्त हेAccept करते.
  • हे रक्त फुफ्फुसांकडे (Lungs) शुद्ध होण्यासाठी पाठवते.
  • फुफ्फुसीय रोहिणी (Pulmonary artery) या रक्तवाहिनीद्वारे हे रक्त फुफ्फुसांकडे जाते.
3. डावे आलिंद (Left Atrium):
  • फुफ्फुसातून आलेले शुद्ध रक्त (oxygen-rich blood) स्वीकारते.
  • फुफ्फुसीय शिरांद्वारे (Pulmonary veins) हे रक्त येते.
  • डावे आलिंद हे रक्त डाव्या निलयात (Left Ventricle) ढकलते.
4. डावे निलय (Left Ventricle):
  • डाव्या आलिंदातून आलेले शुद्ध रक्त स्वीकारते.
  • हे रक्त महाधमनीद्वारे (Aorta) शरीरभर पोहोचवते.
  • डावे निलय हे हृदयातील सर्वात जाड भागांपैकी एक आहे, कारण त्याला शरीरभर रक्त पंप करण्यासाठी जास्त दाब निर्माण करावा लागतो.

हृदयाचे हे चारही कप्पे लयबद्ध पद्धतीने काम करतात, ज्यामुळे शरीराला आवश्यक असणाऱ्या रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होतो.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

माणसाच्या शरीरातील असा कोणता अवयव आहे जो जाळला तरी नष्ट होत नाही?
मानवी शरीर मानवाचे नाही म्हणतात ते कितपत खरे आहे?
आजच्या मानवाच्या मेंदूचे वजन किती?
माझ्या शरीरात एकूण किती हाडे असतात?
प्रौढ वाढ झालेल्या मानवी शरीरात किती हाडे असतात?
शरिरात योग्य नियंञण ठेवण्याचे काय कोण करते?
तुम्हाला कसे कळले की कुत्रे श्वसन करतात?