शिक्षण कृषी कृषी शिक्षण

महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठे किती आहेत?

3 उत्तरे
3 answers

महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठे किती आहेत?

1




महाराष्ट्र राज्यात चार कृषी विद्यापीठे आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ ( महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना 29 मार्च 1968 रोजी झाली.

त्यानंतर अकोला या ठिकाणी असलेले पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 20 ऑक्टोबर 1969 रोजी स्थापन करण्यात आले.


रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली याठिकाणी 18 मे 1972 साली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचीस्थापना करण्यात आली.


डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ हे परभणीमधील महत्त्वाचे कृषी विद्यापीठ असून याची स्थापना 18 मे 1972 रोजी झाली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचीस्थापना एकच दिवशी झाली.


उत्तर लिहिले · 7/6/2022
कर्म · 53750
0
उत्तर लिहिले · 18/4/2024
कर्म · 0
0

महाराष्ट्रामध्ये एकूण चार कृषी विद्यापीठे आहेत:

  1. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
  2. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
  3. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
  4. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

या चारही कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत अनेक महाविद्यालये व संशोधन संस्था आहेत, ज्यात कृषी शिक्षण आणि संशोधनाचे कार्य चालते.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5400

Related Questions

कुछ घोषणा लेखनाच्या उद्देश व तंत्र विशद करा?
M81/YOGC506/EE/20260529 Q pepar?
माहिती प्रधान समाजामध्ये ग्रंथालयाची पारंपारिक भूमिका बदलून ती कशी व्यापक होत आहे ते स्पष्ट करा?
College la application deun 7 divas zale pn college TC det nahi?
शालेय व्यवस्थापन म्हणजे काय? शालेय व्यवस्थापनाचे कार्य स्पष्ट करा.
शालेय व्यवस्थापनात शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा?
शालेय व्यवहाराप्रती जबाबदारी?