हृदयविकार आरोग्य

हृदयविकाराच्या झटक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी काय केले पाहिजे?

2 उत्तरे
2 answers

हृदयविकाराच्या झटक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी काय केले पाहिजे?

4
वेगळे काही करण्याची जरूर नाही तरुण असाल तर भरपूर मेहनतची कामे करावी , नशीबाने श्रीमंत बनवलेले असेल तर आणखी त्यात भर घालण्यासाठी स्वतःला कामात गुंतवून ठेवावे कारण कष्ट केल्याने शरीर उत्तम रहाते भूक चांगली लागते व पोट भरले की झोप छान येते,

स्वतःच्या प्रगती कडें लक्ष दयावे दुसऱ्याच्या संपत्ती कडें ढुंकून ही पाहु नये , कुणी बोलले बोलावे नाही बोलले दुर्लक्ष करावे पण उगाच दुसऱ्याचे टेन्शन घेऊन स्वतः चा जीव जळू नये त्यामुळे रक्त कमी होते, भूक मंदावते, निद्रा नाश होतो व शारीरिक समस्या उदभवतात आणि त्यान्चे आपल्या मनावर परिणाम, काळजी उत्पन्न होते व थेट हृदय कमकुवत होते,

आणि एखादा मनोविकार जेव्हा माणसाच्या हृदयापर्यत जातो तेव्हा समस्या सुरु होतात व शेवटी असाह्य वेदना, ताण आल्याने हृदय विकार चा झटका येऊ शकतो त्यामुळे माणसाने असा कोणताही स्वभाव आत्मसात करू नये की त्यामुळे थेट त्याच्या वेदना हृदयाला भीडतील असे कोणतेही मानवी नाते हाडांना चिटकवून ठेऊ नये,

खाण्याची आवड ही सर्व प्रकारची असावी जरूर पण त्याचे प्रमाण व वेळ निश्चित करावे, समतोल आहार तरुण पणी हवाच आहे तो पचवण्याची ताकत असली की हृदय चांगले रहाणारं कारण पोट व्यवस्थित त्याचे कार्य पूर्ण करीत असते, थोडक्यात चांगले विचार चांगले आचरण ठेवले की माणसाला कोणताही आजार होतं नाही असे माझे स्व मत आहे निदान वयाच्या 55/60 पर्यत
उत्तर लिहिले · 26/5/2022
कर्म · 53750
0
हृदयविकाराच्या झटक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे:

जीवनशैलीतील बदल:

  • आहार:

    • संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. फळे, भाज्या, धान्य आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असावी.

    • जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा.

    • मीठाचे आणि साखरेचे सेवन कमी करा.

  • व्यायाम:

    • नियमितपणे व्यायाम करा. दररोज किमान 30 मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करा.

    • चालणे, धावणे, पोहणे किंवा सायकल चालवणे यासारख्या एरोबिक व्यायामांचा समावेश करा.

  • धूम्रपान आणि मद्यपान टाळा:

    • धूम्रपान पूर्णपणे बंद करा.

    • मद्यपान कमी प्रमाणात करा किंवा टाळा.

  • तणाव व्यवस्थापन:

    • तणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करा.

    • पुरेशी झोप घ्या.

वैद्यकीय उपाय:

  • नियमित तपासणी:

    • नियमितपणे डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

    • रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर तपासा.

  • औषधोपचार:

    • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करा. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉलसाठी औषधे नियमितपणे घ्या.

इतर उपाय:

  • वजन नियंत्रित ठेवा.

  • पुरेशी झोप घ्या (दररोज ७-८ तास).

हृदयविकाराच्या झटक्यापासून बचाव करण्यासाठी या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 3060

Related Questions

लघवी झाल्यानंतर योनीतून सफेद घट्ट स्त्राव येतो का?
योनीचे क्लिट खुप मोठे आहे म्हणून लाज वाटते?
आई वडील घरी नसताना पहिली पाळी आली तर भावाला कसे सांगावे?
योनीमध्ये पोटली ठेवायची माहिती द्यावी?
दातांसाठी सर्वात चांगली टूथपेस्ट कोणती?
वयात येताना योनीची काळजी कशी घ्यावी?
आम्ही दोघेच बहिण भाऊ राहतो व माझ्या लहान बहिणीला पहिली मासिक पाळी आली, तर काय करू आणि पॅडसुद्धा नाही आहे?