अन्न फरक दुग्धजन्य पदार्थ

ताक आणि मठ्ठा यात काय फरक असतो?

2 उत्तरे
2 answers

ताक आणि मठ्ठा यात काय फरक असतो?

0
ताकआणि मठ्ठा हे दोन्ही दह्यापासून बनवतात. दूध गरम करुन सायीसकट विरजायचे. त्याचे दही तयार झाले की त्यात योग्य प्रमाणात पाणी घालूनते घुसळायचे. घुसळल्यानंतर दह्यातील स्निग्ध पदार्थ लोण्याच्या रुपात वर येतात. लोणी बाजूला काढायचे, जो द्रव शिल्लक राहतो ते म्हणजे ताक.


ताकाला संस्कृतमध्ये तक्र म्हणतात. आयुर्वेदात ताकाला बहुगुणी मानले आहे. जेवणानंतर थोडेसेसैंधव आणि हिंग घातलेले ताकप्यायल्यास पचनाची प्रक्रिया सुधारते. उन्हाळ्यात ताक थंडावा देते.

ताक विविध प्रकाराने वापरतात. कढी, मठ्ठा, लस्सी इत्यादी.

मठ्ठा हा ताकाचाच वेगळा प्रकार आहे, ताकात आलं, मिरची, कोथिंबिर वाटून घालतात. चवीला मीठ घालून केलेले ताक म्हणजे मठ्ठा. आपल्याकडे जेवणात जिलबीबरोबर मठ्ठा असतो.


उत्तर लिहिले · 25/5/2022
कर्म · 53750
0
ताक आणि मठ्ठा यांच्यातील फरक खालीलप्रमाणे आहेत:

ताक:

  • ताक हे दही घुसळून लोणी काढल्यानंतर उरलेले पातळ मिश्रण असते.
  • यात पाणी आणि दह्याचे प्रमाण जास्त असते.
  • ताक पचनासाठी हलके असते.
  • ताकात लस्सीसारखी जास्त चव नसते.

मठ्ठा:

  • मठ्ठा बनवण्यासाठी दही फेटून त्यात साखर, मीठ, मसाले आणि कधीकधी फळांचा रस मिसळला जातो.
  • मठ्ठा ताकापेक्षा घट्ट असतो.
  • त्यामध्ये गोड आणि मसालेदार चव असते.
  • मठ्ठा प्यायला चविष्ट लागतो.

सारांश:

ताक हे नैसर्गिकरित्या तयार होते, तर मठ्ठा चवीनुसार बनवला जातो.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5160

Related Questions

जीएम दारू बटर खाल्ल्यानंतर किती दिवस सुरक्षित राहते?
मस्टर्ड ऑईल कच्ची घनी आणि एक्सपेलरमध्ये काय फरक असतो?
चक्का म्हणजे काय?
रेशन मध्ये नाव आपण मोबाईल द्वारे ऍड करू शकतो का?
रेशन कार्ड मध्ये ऑनलाइन नाव ॲड कसे करावे?
दुय्यम शिधापत्रिका मिळवण्याकरता व नाव समाविष्ट करण्याकरीता काय करावे लागेल?
खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते?