2 उत्तरे
2
answers
अधिविकर्ष सवलत कोणत्या खात्यावर दिली जाते?
1
Answer link
ब) अधिकर्ष सवलत :- अधिकर्ष सवलतीचे कर्ज देण्यासाठी खातेदाराला त्यांच्या खात्यात असलेल्या रकमेपेक्षा त्याच्या गरजेनुसार अधिक रक्कम काढण्याची परवानगी देण्यात येते. खात्यात जमा असलेल्या रकमेपेक्षा जास्तीत जास्त किती रक्कम काढावयाची ते बँक ठरविते. प्रत्यक्ष खातेदाराने जेवढी रक्कम वापरली असेल तेवढ्याच रकमेवर बँक व्याज आकारते. अशा प्रकारची अधिकर्ष सवलत जास्तीत जास्त ९० दिवस अथवा त्यापेक्षा कमी मुदतीसाठी मंजूर करण्यात येते.
क) मुदतीची कर्ज :- व्यापारी बँका एकरकमी कर्जेसुद्धा मंजूर करतात. बहुधा ही कर्जे अल्पमुदतीसाठी असतात. अल्पमुदत ह्या शिवाय बँका १ ते ३ वर्षाकरिता मध्यम मुदतीचे कर्ज आणि ३ ते ५ वर्षासाठी दीर्घ मुदतीचे कर्जही देतात. व्यापारी बँका शक्यतो दीर्घ मुदतीची कर्जे देण्याचे टाळतात. कारण आपल्याजवळचा पैसा रोख स्वरूपात ठेवणे त्या अधिक पसंत करतात. दीर्घकालीन कर्जामुळे पैसा बराच काळपर्यंत गुंतून राहतो. तसेच ज्या उत्पादन कार्यासाठी हा पैसा वापरण्यात आला असता ते उत्पादन जर अपयशी झाले तर पैसे बुडण्याची शक्यता असते.
३) बिले वटविणे :- बिले वटविणे हे व्यापारी बँकांचे अतिशय महत्त्वाचे काम आहे..
उदा. समजा 'अ' व्यापारी पुण्याहून मुंबईला खरेदीसाठी गेला व त्याने काही वस्तू 'ब' कंपन्यांकडून खरेदी केल्या. खरेदी केलेला माल पुण्याच्या आपल्या पत्त्यावर किमतीच्या बिलासह पाठवून द्या असे व्यापाऱ्याला सांगितले. त्या बिलावर आपण ही रक्कम देण्याची जबाबदारी घेतली असे लिहून 'अ' व्यापारी सही
क) अधिकर्ष सवलत (Overdraft facilities) व्यापारी बँकाकडे चालू खाते असलेल्या योग्य व पात्र खातेदारांना अधिकर्ष सवलतीचा फायदा घेता येतो. शेअर्स, कर्ज रोखे, विमा पॉलीसी, विकास रोखे
किंवा वैयक्तिक पावतीवर ही सवलत मंजूर केली जाते. अधिकर्ष सवलतीची मुदत अल्पकाळासाठी असते. रक्कम व कालावधीनुसार व्याजाची आकारणी केली जाते.
0
Answer link
अधिविकर्ष सवलत (Overdraft facility) चालू खात्यावर (Current Account) दिली जाते.
या सुविधेमध्ये, बँक आपल्या खातेदारांना त्यांच्या खात्यात असलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे काढण्याची परवानगी देते. ही एक प्रकारची अल्प-मुदतीची कर्जाची सोय असते.
टीप: काही बँका विशिष्ट अटी व शर्तींच्या आधारावर बचत खात्यावर (Saving Account) देखील अधिविकर्ष सवलत देतात.