2 उत्तरे
2
answers
उपयोजित समीक्षेचे स्वरूप कसे स्पष्ट करा?
0
Answer link
उपयोजित समीक्षेचे स्वरूप
विशिष्ट वाङ्मयीन मूल्ये व विशिष्ट जीवनमूल्ये यांच्या कळत-नकळत स्वीकारलेल्या चौकटीतून साहित्यकृतीची तर्कसंगतपणे केलेली आकलने किंवा मूल्यामापन हा उपयोजित समीक्षेचा मुख्य प्रकार आहे. लेखक, त्याची साहित्यकृती आणि वाचक या तीन घटकांचा स्थल-काल-परस्थितीचा जो अवकाश बेहून असतो. त्यातील वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व, वर्गीय जाणिवा याची नोंद घेतली जाते. साहित्यकृतीचा विचार बाह्यतांत्रिक रचना, आशयाचा सामाजिक-नैतिक, तौलनिक व मूल्यमापनात्मक विवेकाचे दर्शन, सांस्कृतिक ध्येये, उद्दिष्टे यांचा संदर्भ येतो. तसेच आस्वादक, वाचक व त्याचा आस्वाद प्रत्यय यांच्या पकडीतून बाहेर पडून समग्र बाबक व त्याचा भावनिक, बौद्धिक प्रक्रियांनी व्यक्त होणारा वाचनप्रत्यय याकडे उपयोजित समीक्षा अधिक कल देते. त्यामुळे वाङ्मयीन, सांस्कृतिक परंपरा व परिस्थिती यासंबंधीचे समीक्षीय भान या उपयोजित समीक्षेतून दिसून येते.
उपयोजित समीक्षेमध्ये संशोधन, आकलन, आस्वाद व मूल्यमापन या गोष्टींना महत्त्व असते. या
व्यापक चौकटीतून विशिष्ट साहित्यिक, त्यांची साहित्यकृती किंवा विशिष्ट साहित्यप्रकारांचा अभ्यास होत असतो किंवा एकाच साहित्यकृतीसंबंधी अनेक समीक्षक आपापल्या परीने आपली मांडणी करत असतात. उदा. अवकाळी पावसाच्या निमित्ताने (संपा. सतीश कामत) या संपादनामध्ये आनंद विंगकर यांनी लिहिलेल्या 'अवकाळी पावसादरम्यानची गोष्ट' या कादंबरीची अनेकांगानी समीक्षा करण्यात आलेली दिसते. तसेच एकाच साहित्यकाच्या विविध लेखनाचीदेखील समीक्षा केली जाते. उदा. 'बाहुपेडी विंदा' (संपा. विजया राज्याध्यक्ष) या संपादनातून विंदा करंदीकर यांच्या समग्र साहित्याचे आणि त्यांनी लिहिलेल्या समीक्षेची समीक्षा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दोन वेगवेगळ्या साहित्यकांच्या साहित्याची तुलनादेखील या समीक्षेत केली जाते. याशिवाय पुस्तकपरीक्षण हा उपयोजित समीक्षेचा एक मोठा भाग आहे. वेगवेगळ्या मासिकातून, नियतकालिकातून विशेषांकातून पुस्तकपरीक्षणे लिहिली जातात. शिवाय काही वर्तमानपत्रातूनदेखील अशी परीक्षणे पहायला मिळतात.
0
Answer link
उपयोजित समीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल:
- व्यावहारिक उपयोग: उपयोजित समीक्षा सिद्धांतावर आधारित असली तरी ती साहित्यकृती, कलाकृती किंवा सामाजिक घटनेचा व्यावहारिक उपयोग काय आहे, हे तपासते.
- समस्या-आधारित: उपयोजित समीक्षा विशिष्ट समस्या किंवा प्रश्नांवर लक्ष केंद्रित करते आणि त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी साहित्यकृतीचा उपयोग करते.
- अंतर-अनुशासनात्मक दृष्टीकोन: उपयोजित समीक्षा अनेक विषयांचे ज्ञान वापरते, त्यामुळे विषयाकडे अधिक व्यापक दृष्टीने पाहता येते.
- उपाय शोधणे: उपयोजित समीक्षेचा उद्देश केवळ विश्लेषण करणे नाही, तर त्यातून काहीतरी उपाय शोधणे किंवा परिस्थितीत सुधारणा करणे हा असतो.
- सामाजिक बांधिलकी: उपयोजित समीक्षा सामाजिक समस्यांवर विचार करते आणि लोकांना त्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रोत्साहित करते.
उदाहरण:
दलित साहित्यावर केलेली उपयोजित समीक्षा दलित लोकांच्या समस्या आणि त्यांच्यावरील अन्याय जगासमोर आणते.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: