2 उत्तरे
2
answers
धुळीचा त्रास असेल तर काय करावे?
1
Answer link
तुम्हाला जर वारंवार धुळीचा त्रास होत असेल तर तुम्ही मधाचे सेवन करत रहावे. कारण एलर्जी दूर करण्यासाठी मध मदत करते. याकरिता तुम्ही दररोज दोन चमचे मधाचे सेवन करा. मधाच सेवन तुम्ही एक कप कोमट पाण्यात मिक्स करून देखील करू शकता.
तुम्हाला जर धुळीचा त्रास होत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय!
धुळीच्या कणांमध्ये सूक्ष्मजीव असतात. जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. यामुळे आपल्याला धुळीची एलर्जी होत असते. या एलर्जी पासून संरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकतात.
धुळीची एलर्जी झाल्यास तुम्ही हळद आणि काळी मिरीचा वापर करू शकतात.
धुळीची एलर्जी ही अनेकांना होत असते. ज्यामुळे त्यांना शिंका येणे, श्वास घेण्यात अडचण, वाहणारे नाक, भरलेले नाक, डोळे सुजणे, डोळे-नाक आणि घशात खाज येणे, खोकला, डोकेदुखी, थकवा आणि अशक्तपणा यासह इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. धुळीच्या कणांमध्ये सूक्ष्मजीव असतात. जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. यासह हवेमध्ये परागकणांचे कण, प्राण्यांचे केस आणि कोवळे, बुरशी आणि अनेक प्रकारचे जीवाणू हे देखील एलर्जी निर्माण करतात. चला तर मग जाणून घेऊयात घरगुती उपाय अवलंबून धुळीची एलर्जी दूर करण्यास कशी मदत होते.
सफरचंद व्हिनेगर
धुळीच्या एलर्जी पासून संरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही सफरचंदाच्या व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही एका ग्लासात कोमट पाणी घेऊन त्यात दोन चमचे सफरचंद व्हिनेगर टाकून घ्या. तसेच या पाण्यात तुम्ही चवीसाठी दोन चमचे मध टाकून घेऊन शकतात. सफरचंद सायडर व्हिनेगरमध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. जे एलर्जी कमी करण्यास मदत करतात.
नीलगिरी तेल
एलर्जीपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही निलगिरी तेल वापरू शकता. यासाठी निलगिरी तेलाचे ४ ते ५ थेंब गरम पाण्यात टाका आणि वाफ घ्या.किंवा तुम्ही वाफेच्या मशिनीद्वारे वाफ घेऊ शकता. दरम्यान या तेलांमध्ये दाहक-विरोधी आणि वेदनशामक गुणधर्म आहेत. जे दाह आणि वेदना दूर करण्यास मदत करतात.
मध
तुम्हाला जर वारंवार धुळीचा त्रास होत असेल तर तुम्ही मधाचे सेवन करत रहावे. कारण एलर्जी दूर करण्यासाठी मध मदत करते. याकरिता तुम्ही दररोज दोन चमचे मधाचे सेवन करा. मधाच सेवन तुम्ही एक कप कोमट पाण्यात मिक्स करून देखील करू शकता. तसेच मधामध्ये दाहक-विरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म देखील असतात. जे एलर्जीपासून मुक्त होण्यास उपयुक्त ठरते.
हळद
धुळीची एलर्जी झाल्यास तुम्ही हळद आणि काळी मिरीचा वापर करू शकतात. तुम्हाला एलर्जीपासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही एक कप दुधात एक चमचा हळद मिक्स करा. हे दूध एका भांड्यात उकळवा व यानंतर हे दूध थंड करा. थंड झाल्यावर वर या दुधात एक चिमूटभर काळी मिरी मिक्स करा. त्यासोबत थोडे मध देखील मिक्स करा. यानंतर या दुधाचे सेवन करून घ्या. हळदी मध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत जे एलर्जी कमी करण्यास मदत करतात.
कोरफडीचे ज्यूस
धुळीच्या एलर्जीला दूर करण्यासाठी तुम्ही कोरफडीच्या ज्यूसचा देखील सेवन करू शकता. तुम्ही एक कोरफडीची फोड घेऊन आतील गर काढा. त्यानंतर काढलेल्या गरमध्ये तुम्ही एक कप पाणी टाकून मिक्सर मध्ये फिरवून त्याचा ज्यूस तयार करा. यानंतर कोरफडीच्या ज्यूसचे सेवन करा. कोरफडमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, तसेच जीवाणू आणि फंगस नष्ट करणारे गुणधर्म आहेत. जे एलर्जीमुळे होणाऱ्या सर्व समस्या कमी करण्यास मदत करतात.
(टीप:- वरील टिप्सचा वापर करताना आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
0
Answer link
धूळ allergy (Dust Allergy) असल्यास खालील उपाय करावे:
घरगुती उपाय:
- हळदीचे दूध: हळदीमध्ये anti-inflammatory गुणधर्म असतात. त्यामुळे ॲलर्जीमुळे होणारा त्रास कमी होतो.
- आले: आल्यामध्ये anti-inflammatory आणि antioxidant गुणधर्म असतात. ते धुळीच्या ॲलर्जीमुळे होणाऱ्या त्रासांवर फायदेशीर ठरतात.
- मध: मधामध्ये anti-bacterial आणि anti-inflammatory गुणधर्म असतात. मध घशातील खवखव आणि खोकला कमी करण्यास मदत करते.
- तुळस: तुळशीमध्ये anti-inflammatory आणि antioxidant गुणधर्म असतात आणि ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
काय काळजी घ्यावी:
- घरातील धूळ नियमितपणे काढा.
- शय्या आणि चादरी नियमितपणे धुवा.
- हवा शुद्ध ठेवण्यासाठी एअर प्युरिफायरचा (air purifier) वापर करा.
- धूम्रपान टाळा.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा:
- श्वास घेण्यास त्रास झाल्यास.
- छातीत दुखत असल्यास.
- खोकला खूप वाढल्यास.
टीप: हा सल्ला केवळ सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.