Topic icon

ऍलर्जी

1
तुम्हाला जर वारंवार धुळीचा त्रास होत असेल तर तुम्ही मधाचे सेवन करत रहावे. कारण एलर्जी दूर करण्यासाठी मध मदत करते. याकरिता तुम्ही दररोज दोन चमचे मधाचे सेवन करा. मधाच सेवन तुम्ही एक कप कोमट पाण्यात मिक्स करून देखील करू शकता.
 
तुम्हाला जर धुळीचा त्रास होत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय!
धुळीच्या कणांमध्ये सूक्ष्मजीव असतात. जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. यामुळे आपल्याला धुळीची एलर्जी होत असते. या एलर्जी पासून संरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकतात.




धुळीची एलर्जी झाल्यास तुम्ही हळद आणि काळी मिरीचा वापर करू शकतात.

धुळीची एलर्जी ही अनेकांना होत असते. ज्यामुळे त्यांना शिंका येणे, श्वास घेण्यात अडचण, वाहणारे नाक, भरलेले नाक, डोळे सुजणे, डोळे-नाक आणि घशात खाज येणे, खोकला, डोकेदुखी, थकवा आणि अशक्तपणा यासह इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. धुळीच्या कणांमध्ये सूक्ष्मजीव असतात. जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. यासह हवेमध्ये परागकणांचे कण, प्राण्यांचे केस आणि कोवळे, बुरशी आणि अनेक प्रकारचे जीवाणू हे देखील एलर्जी निर्माण करतात. चला तर मग जाणून घेऊयात घरगुती उपाय अवलंबून धुळीची एलर्जी दूर करण्यास कशी मदत होते.
सफरचंद व्हिनेगर
धुळीच्या एलर्जी पासून संरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही सफरचंदाच्या व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही एका ग्लासात कोमट पाणी घेऊन त्यात दोन चमचे सफरचंद व्हिनेगर टाकून घ्या. तसेच या पाण्यात तुम्ही चवीसाठी दोन चमचे मध टाकून घेऊन शकतात. सफरचंद सायडर व्हिनेगरमध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. जे एलर्जी कमी करण्यास मदत करतात.


नीलगिरी तेल
एलर्जीपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही निलगिरी तेल वापरू शकता. यासाठी निलगिरी तेलाचे ४ ते ५ थेंब गरम पाण्यात टाका आणि वाफ घ्या.किंवा तुम्ही वाफेच्या मशिनीद्वारे वाफ घेऊ शकता. दरम्यान या तेलांमध्ये दाहक-विरोधी आणि वेदनशामक गुणधर्म आहेत. जे दाह आणि वेदना दूर करण्यास मदत करतात.

मध
तुम्हाला जर वारंवार धुळीचा त्रास होत असेल तर तुम्ही मधाचे सेवन करत रहावे. कारण एलर्जी दूर करण्यासाठी मध मदत करते. याकरिता तुम्ही दररोज दोन चमचे मधाचे सेवन करा. मधाच सेवन तुम्ही एक कप कोमट पाण्यात मिक्स करून देखील करू शकता. तसेच मधामध्ये दाहक-विरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म देखील असतात. जे एलर्जीपासून मुक्त होण्यास उपयुक्त ठरते.

हळद
धुळीची एलर्जी झाल्यास तुम्ही हळद आणि काळी मिरीचा वापर करू शकतात. तुम्हाला एलर्जीपासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही एक कप दुधात एक चमचा हळद मिक्स करा. हे दूध एका भांड्यात उकळवा व यानंतर हे दूध थंड करा. थंड झाल्यावर वर या दुधात एक चिमूटभर काळी मिरी मिक्स करा. त्यासोबत थोडे मध देखील मिक्स करा. यानंतर या दुधाचे सेवन करून घ्या. हळदी मध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत जे एलर्जी कमी करण्यास मदत करतात.


कोरफडीचे ज्यूस
धुळीच्या एलर्जीला दूर करण्यासाठी तुम्ही कोरफडीच्या ज्यूसचा देखील सेवन करू शकता. तुम्ही एक कोरफडीची फोड घेऊन आतील गर काढा. त्यानंतर काढलेल्या गरमध्ये तुम्ही एक कप पाणी टाकून मिक्सर मध्ये फिरवून त्याचा ज्यूस तयार करा. यानंतर कोरफडीच्या ज्यूसचे सेवन करा. कोरफडमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, तसेच जीवाणू आणि फंगस नष्ट करणारे गुणधर्म आहेत. जे एलर्जीमुळे होणाऱ्या सर्व समस्या कमी करण्यास मदत करतात.

(टीप:- वरील टिप्सचा वापर करताना आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


उत्तर लिहिले · 13/5/2022
कर्म · 53750
3
अनेकजणांना सकाळी उठल्यानंतर सतत शिंका येतात. पण हा त्रास होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पण हा त्रास नेमका का होतोय ? हे जाणून घेतलं तर त्यावर उपाय करणं सोप्प होतं.


नाक आणि तोंडातून फुफ्फुसातील हवा स्फोटकापणे बाहेर फेकली जाण्याच्या क्रियेला आपण शिंक म्हणतो. शिंक ही मानवी शरीराची प्रतिक्षिप्त क्रिया आहे. थंड पाणी किंवा थंड हवा, तपकिरीची, मिरचीची किंवा अन्य पदार्थाची भुकटी, खूप धूळ, तीव्र वास आणि वेळप्रसंगी काही जंतू अशा गोष्टींच्या संपर्कात आल्यावर आपल्याला शिंका येतात. या गोष्टींमधील सूक्ष्म कण नाकात जाऊन त्यांचा नाकाच्या आतील अस्तरासारख्या आवरणाशी (म्यूकस मेंब्रेन) संपर्क होतो. त्यातून ते आवरण उद्दीपित होतं.

या गोष्टीचा संदेश मेंदूकडे जातो. मेंदूच्या मुळाशी (ब्रेन स्टेम) असलेल्या शिंका नियंत्रित करणाऱ्या केंद्राकडे हा संदेश जातो. तिथून छातीच्या स्नायूंना प्रसारण पावून मोठा श्वास घेण्याची आणि घशाच्या स्नायूंना शिथिल होण्याची आज्ञा दिली जाते आणि शिंक येते.

हे कण जास्त असल्यास नाकातल्या आवरणातून पातळ द्रव पदार्थ सर्दीच्या रूपानं स्रवतो. शिंकेवाटे बाहेर फेकल्या न गेलेल्या कणांना, या द्रवामध्ये सामावून घेतलं जातं आणि श्वासमार्गातून पुढे जाण्यास अटकाव होतो. हे कण किंवा जंतू नाकातून श्वासमार्गावाटे फुफ्फुसात गेल्यास न्यूमोनिया, श्वासनलिकेचा दाह असे घातक आजार होऊ शकतात.

शिंकेच्या क्रियेमुळे हे शरीराला धोकादायक कण आणि जंतू बाहेर फेकले जातात. त्यामुळे शिंक ही आजाराचे लक्षण नाही, तर शरीराचं संरक्षण करणारी एक क्रिया आहे, हे ध्यानात घ्यायला हवं.

सतत येणार्‍या शिंका तुम्हांला भविष्यात सर्दीचा त्रास होतोय याचे संकेत देतात. त्यामुळे अचानक शिंकांचा त्रास होत असेल आणि वातावरणात थंडावा, अचानक बदल झाला नसेल तर सर्दी होणार असल्याचा इशारा वेळीच ओळखा.

अचानक थंड वातावरणातून उष्ण वातावरणात गेल्यास शिंकांचा त्रास होऊ शकतो. अनेकदा एसी रूममधून बाहेर पडल्यास हा त्रास होऊ शकतो. वातावरणात चटकन झालेल्या बदलामुळे शिंकांचा त्रास होतो.

तुमच्या अवतीभवती धुम्रपान करणारी व्यक्ती असेल तर तर सिगारेटच्या धुरामुळेही तुम्हांला त्रास होऊ शकतो. सिगारेटचा धूर नाकाला त्रासदायक ठरतो. त्यामउळे सतत सिगारेट पिण्याची इच्छा होणारी व्यक्ती तुमच्या आसपास असेल तर तुम्हांला सतत शिंका येऊ शकतात.

सिझनल अ‍ॅलर्जीमुळेदेखील खोकला, शिंका, डोळे लाल होणं असा त्रास होतो. अशावेळेस तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


उत्तर लिहिले · 19/4/2022
कर्म · 121765
4
तुम्ही धुळीच्या संपर्क मध्ये येत असाल तरी नाकाला मास्क वापरा. घरी पण फरशी स्वच्छ राहूदे द्या. त्यावर धूळ, कचरा नको. एकदम साफ राहील असे घर ठेवा. शक्यतो फरशीवर किंवा जमिनीवर खाली बसू नका, खुर्चीवर बसा. नाहीतर स्वच्छ कापड अंथरून खाली बसले तरी चालेल. शिवाय शिंका येणे म्हणजे ऍलर्जी असू शकते, त्यासाठी तुम्ही प्राणायाम करा ज्यामुळे तुमची एलर्जी कमी होईल. उन्हात जास्त फिरू नका, नाहीतर नाकाला, डोक्याला रुमाल बांधावा.
उत्तर लिहिले · 5/3/2019
कर्म · 1720
14
शिंका येणे

सकाळ उगवते तीच मुळी शिंकांनी. सटासट. उसंतही घेऊ न देता शिंका येतात. दहा-बारा शिंका येऊन पुरते बेजार व्हायला होते. ही वेळ कधीही येऊ शकते. एखादी महत्त्वाची बैठक सुरू आहे, तेवढ्यात शिंका सुरू. या शिंका येतात, ऍलर्जीमुळे.

ऍलर्जीमुळे “सायनस‘चा त्रास कसा सुरू होतो?
सायनस म्हणजे नाकाभोवतीच्या हाडांमध्ये असणारी पोकळ जागा. या पोकळीचे तोंड नाकात उघडते. नाकामधील आंतरत्वचेला ओलावा आणण्यास “सायनसेस‘ एक ते दीड लिटर स्राव तयार करतात; परंतु सायनसची वाट किंवा तोंड (नाकात सूज आल्यामुळे) बंद झाल्यास सायनसमधील स्राव बाहेर पडू शकत नाही. स्राव साठल्यामुळे जंतुसंसर्ग होऊन सायनसचे “इन्फेक्शसन‘ होते. ही सूज मूलतः ऍलर्जीमुळे येते, त्यामुळे डोके दुखणे, चेहेरा व डोके जड होणे, थकवा येणे, दिवसभर निरुत्साही वाटणे, कामावरील तसेच अभ्यासातील एकाग्रता कमी होणे व शारीरिक चलनवलन कमी होणे ही लक्षणे आढळतात.

अनेक वर्षांचा त्रास असल्यास त्याचे परिवर्तन परत परत होणाऱ्या अथवा ऱ्हिनोसायन सिटीस मध्ये होऊ शकते. काही लोकांमध्ये सर्दी दाटून पोलिप तयार होतात व सर्व प्रकारचे वास येणे बंद होते, औषधांमुळे सायनस इन्फेक्श न दूर न झाल्यास दुर्बिणीद्वारा अगदी अलगदपणे ही सायनसची तोंडे उघडता येतात; पण काही कालावधीनंतर ऍलर्जीचा कायम स्वरूपी उपचार न केल्याने ती पुन्हा बंद होऊ शकतात. सर्दीच्या योग्य उपायांमुळे सायनस मोकळे राहते व परत परत सायनसच्या इन्फेक्शतनची शक्यचता कमी होते.
http://aaosairam.blogspot.com​
√ऍलर्जी म्हणजे काय?
प्रतिकारशक्तीचे मुख्य काम म्हणजे विविध जंतूविरुद्ध शरीराचे संरक्षण करणे. याकरिता आपल्या प्रतिकारशक्तीने शरीराला धोका निर्माण करणाऱ्या व धोका न निर्माण करणाऱ्या गोष्टी ओळखल्या पाहिजेत. ऍलर्जी म्हणजे निसर्गामधील घटकांना शरीराने दिलेला अनैसर्गिक प्रतिसाद होय. हा असा प्रतिसाद शरीराला घातक ठरू शकतो. कारण या घटकांना प्रतिपिंड (antibody) तयार होऊन हिस्टामाईन नावाचे द्रव्य तयार होते.

√ते कसे शोधून काढायचे?
तपासणीसाठी त्वचा सर्वांत उपयोगी पडते. ऍलर्जीची औषधे चालू नसल्यास त्वचेची चाचणी रक्ताच्या तापसणीपेक्षा चांगले निष्कर्ष देते. ऍलर्जी वरील कायमस्वरूपी उपचाराला “इम्युनोथेरपी‘ असे म्हणतात.

√इम्युनोथेरपी म्हणजे काय?
या उपायांमध्ये ऍलर्जीच्या प्रतिपिंडांना प्रतिबंध केला जातो. हिस्टामाईन हे द्रव्य ऍलर्जीचे माध्यम समजले जाते. हिस्टामाईन विरुद्ध काम करणारी औषधे फक्त ऍलर्जीची लक्षणे थांबवतात. ऍलर्जी होण्याकरता झालेल्या परिणामांचा प्रादुर्भाव थांबवू शकत नाहीत.

इम्युनोथेरपीमध्ये ऍलर्जीचा प्रादुर्भाव होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाते. मग शरीराचा बाह्य ऍलर्जीनिक द्रव्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. एक ते पाच वर्षे ज्या रुग्णांनी हा उपचार केलेला आहे, त्या रुग्णांमध्ये याचे दीर्घकाळ फायदे आढळून येतात. प्रत्येक रुग्णामध्ये हा उपाय पूर्णतः लागू होईलच असे नाही; पण हा उपचार केल्यास ऍलर्जीमुळे होणारा त्रास कमी होतो किंवा औषधाची गरज कमी भासते. जे रुग्ण ठराविक द्रव्याची ऍलर्जी असूनसुद्धा त्यांना टाळू शकत नाहीत किंवा ज्यांना औषध घेऊनसुद्धा ऍलर्जीचा त्रास होत आहे. त्यांनी हा उपचार अवलंबावा यामुळे ते दैनंदिन जीवन सुखाने जगू शकतील. खाद्य पदार्थांच्या किंवा औषधांच्या ऍलर्जीसाठी मात्र हा उपाय अतिशय अवघड आहे. ऍलर्जीवर काम करणारा प्रतिबंधात्मक उपाय हा विशष उपचार केंद्रात (स्पेशल क्लिनिक)मध्ये केला जातो.
नाक, सायनस, श्वारसनलिकेच्या ऍलर्जीमध्ये हा नक्कीच उपयोगी ठरतो. जिभेच्या खाली याची लस देता येते. हळूहळू लसीचे प्रमाण वाढवले की ऍलर्जीचा त्रास कमी होतो. त्रास देणारी द्रव्ये शरीरात असूनसुद्धा प्रतिपिंड निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारा पदार्थ (antigen) व प्रतिपिंड यांचा त्रास होत नाही. हिस्टामिन हे द्रव्य तयार न झाल्याने ऍलर्जीचे परिणाम दिसत नाहीत.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
╔══╗       संकलन: नितीन जाधव  
║██║          स्रोत:- आरोग्य मित्र
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ *+९१८६५५४०७६१९*
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
              🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
आपण हि व या अधिक माहिती खालील संकेत स्थळाला भेट देऊन पाहु शकता
      *http://aaosairam.blogspot.com​*
*नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.*

    *!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​​*
उत्तर लिहिले · 3/9/2018
कर्म · 569245