2 उत्तरे
2
answers
कोकम सिरप आणि कोकम आगळ ह्यात काय फरक आहे?
0
Answer link
कोकण सिरप म्हणजेच कोकमाचे तयार सरबत !
यात मीठ, साखर वगैरे काहीही घालायची गरज भासत नाही. ग्लासचा तळ भरेल इतके सिरप घ्यायचे, वरुन ग्लासभर पाणी घालायचे — कोकम सरबत प्यायला तयार !!
काहीजण साध्या पाण्याऐवजी सोडा वॉटर किंवा ताक वापरुनही सरबत करतात.
कंपनीप्रमाणे सिरपचा दाटपणा कमीजास्त असेल तर त्यानुसार कमीजास्त सिरप घ्यावे लागेल — मात्र पद्धत हीच.

● कोकम आगळ म्हणजे सरबत / सिरप नव्हे. आगळ म्हणजे कोकमाच्या फळाचा घट्टसर रस. त्यात मीठ-साखर वगैरे काहीही घातलेले नसते. पण बऱ्याच जणांचा हा गैरसमज असतो की कोकम आगळात आपण आपल्या आवडीनुसार मीठ साखर इ. घालून त्याचे सरबत करु शकतो. तसे नाही. आगळ तयार केलेले असते ते सरबताच्या उद्देशाने नाही. नाहीतर सिरप आणि आगळात फरकच राहणार नाही.

● सोलकढीला गुलाबी रंग येतो तो या आगळामुळे !! आंबटसर चवही या आगळामुळेच मिळते. नारळाच्या दुधाच्या प्रमाणानुसार आणि आगळाच्या आंबटपणाच्या मात्रेनुसार, नारळाच्या दुधात आगळ मिक्स केले जाते.
सोलकढीव्यतिरिक्त, भाजी किंवा आमटीत घालायला आमसूल उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी आगळ वापरता येते.

हे आगळ साधारणपणे डार्क गुलाबी रंगाचे असते. नारळाच्या शुभ्र पांढऱ्या दुधात ते मिक्स झाले की सुंदरसा गुलाबी रंग तयार होतो !!
0
Answer link
कोकम सिरप आणि कोकम आगळ ह्यांच्यातील फरक खालीलप्रमाणे आहेत:
कोकम सिरप:
- हे गोड पेय आहे.
- कोकम फळांचा रस, साखर आणि पाणी वापरून ते तयार केले जाते.
- हे पेय सरबत म्हणून घेतले जाते.
कोकम आगळ:
- हे आंबट असते.
- कोकम फळांचा रस आंबवून (ferment) तयार केले जाते.
- हे एक नैसर्गिकरित्या ऍसिडिक असते, त्यामुळे ते अन्नपदार्थ आणि पेयांमध्ये आंबट चव आणण्यासाठी वापरले जाते.
- आमटी, मासे आणि इतर पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतात.
थोडक्यात, कोकम सिरप हे गोड पेय आहे, तर कोकम आगळ हे आंबट द्रव आहे, जे चव वाढवण्यासाठी वापरले जाते.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: