भूगोल लोकसंख्या वितरण

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.

2 उत्तरे
2 answers

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.

0
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक हे मुख्यत: चार प्रकारचे असतात. 1)प्राकृतिक घटक 2) आर्थिक घटक 3)राजकीय घटक 4)सामाजिक घटक 1) प्राकृतिक घटक: प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक घटक. एखाद्या प्रदेशाचे स्थान, त्याची प्राकृतिक रचना, हवामान, मृदा, खनिज संपत्ती हे सर्व नैसर्गिक घटकात येते.


लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक

 
लोकसंख्येच्या वितरणावर प्रामुख्याने पुढील चार घटक परिणाम करतात. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक हे मुख्यत: चार प्रकारचे असतात. 1)प्राकृतिक घटक 2) आर्थिक घटक 3)राजकीय घटक 4)सामाजिक घटक 1) प्राकृतिक घटक: प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक घटक. एखाद्या प्रदेशाचे स्थान, त्याची प्राकृतिक रचना, हवामान, मृदा, खनिज संपत्ती हे सर्व नैसर्गिक घटकात येते. स्थान म्हणजे तो प्रदेश कोठे आहे – समुद्रकिनारी की खंडाच्या अंतर्गत? प्राकृतिक रचना म्हणजे तिथे डोंगरदऱ्या आहेत, की पठारी प्रदेश आहे की मैदानी भाग आहे. तिथले हवामान उष्ण, थंड, सम-विषम कसे आहे. तिथली मृदा सकस, सुपीक आहे की रेताड, कमी प्रतीची आहे. 2) आर्थिक घटक: आर्थिक उत्पन्नाची साधने कोणती उपलब्ध असतील त्यानुसार लोकसंख्या दाट असणार की विरळ यात फरक पडतो. शेती, कारखानदारी, ही उत्पन्नाची साधने आहेत. तर नागरीकरण, बाजारपेठ, वाहतूक व्यवस्था यामुळे आर्थिक स्थितीला चालना मिळते. 3) राजकीय घटक: एखाद्या प्रदेशात राजकीय अस्थिरता असेल, राजकीय धोरण स्थिर नसेल, सतत युद्धाची परिस्थिती असेल तर अशा ठिकाणची लोकसंख्या सुस्थिर परिस्थिती असलेल्या प्रदेशापेक्षा कधीही कमी दाट असते. 4) सामाजिक घटक: वंश, धर्म, भाषा, रूढी व परंपरा हे घटकही लोकसंख्या वितरणावर परिणाम करतात.

उत्तर लिहिले · 1/5/2022
कर्म · 53750
0

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक खालीलप्रमाणे आहेत:

1. भौगोलिक घटक:
  • भूरचना: मैदानी प्रदेशात लोकसंख्या जास्त असते, तर डोंगराळ भागात कमी असते.
  • हवामान: जास्त पर्जन्यमान आणि मध्यम तापमान असलेल्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असते.
  • पाणी: पिण्याच्या पाण्याची उपलब्धता लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करते. नद्यांच्या आणि सरोवरांच्या आसपास लोकवस्ती अधिक असते.
  • खनिज: खनिजांच्या उपलब्धतेमुळे खाणकाम आणि औद्योगिक विकास होतो, ज्यामुळे लोकसंख्या वाढते.
  • सुपीक जमीन: शेतीसाठी सुपीक जमीन असलेल्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असते.
2. सामाजिक-आर्थिक घटक:
  • शेती: जेथे शेती चांगली होते, तिथे लोकसंख्या जास्त असते.
  • उद्योग: औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी अधिक असल्याने लोकसंख्या वाढते.
  • वाहतूक: वाहतूक आणि दळणवळणाच्या सोयींमुळे लोकसंख्या केंद्रित होते.
  • शहरीकरण: शहरांमध्ये शिक्षण, आरोग्य, आणि रोजगाराच्या चांगल्या संधी असल्याने लोकसंख्या जास्त असते.
3. सांस्कृतिक घटक:
  • धार्मिक स्थळे: धार्मिक स्थळांच्या ठिकाणी लोकसंख्या केंद्रित होते.
  • सामाजिक रूढी: काही सामाजिक रूढींमुळे विशिष्ट ठिकाणी लोकसंख्या वाढते.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2520

Related Questions

भारतात लोकसंख्या वितरण असमान का आढळते?
ब्राझीलमधील कोणत्या भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात केंद्रित झालेली आढळते?
गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण जास्त दाट का आहे?
विरळ लोकसंख्या कुठे आढळते?
भूरचनेचा लोकसंख्येच्या वितरणावर काय प्रभाव असतो?