झाडे कृषी फळे

बिबवा हे बी कुठल्या झाडाला येते आणि त्याचा काय उपयोग होतो?

2 उत्तरे
2 answers

बिबवा हे बी कुठल्या झाडाला येते आणि त्याचा काय उपयोग होतो?

0
कोकणात मी बिब्याचे झाड पाहिले आहे. त्याला बीब्याचे झाड असेच म्हणतात. हे काजू वर्गी झाड आहे. साधारण ३० ते ४० फूट उंचीचे झाड असते आणि पाने सुद्धा काजूच्या पानासारखी असतात. बिब्ब्याची फळे सुद्धा काजूच्या फळान सारखी येतात.

बिब्बा कोकणात औषधासाठी वापरण्यात येतो. बिब्ब्या एखाद्या टोकदार वस्तूत खोचण्यात येतो आणि त्याला पेटवण्यात येते. अंगभूत तेलाने तो पेटतो व त्यातील तेल निखाऱ्याच्या स्वरूपात खाली जमीनीवर पडते. त्याला ब बीब्याची फुले म्हणतात. कफाच्या अथवा दम्याच्या विकारावर ही फुले कोमट दुधाच्या गलासात पाडून ते दूध औषध म्हणून देतात. डोक्यातील चाईच्या विकारासाठी बिण्याच्या तेलाचा उपयोग होतो. कोकणात वैद्य अथवा डॉक्टर जवळपास उपलब्ध नसतात त्या मुळे खूप लोक त्याचा सर्रास उपयोग करतात. परंतु अनुभवी वैद्याच्या मार्गदर्शनाने बिब्याचे उपचार घ्यावेत. काही लोकांना त्याची अलर्जी होते. त्वचेवर जखमा होतात.
लहान बाळांच्या पोटावर बिब्याचा डाग लावला जात बिबवा पाण्यात भिजवून मग त्या बिबव्याच्य तेलाचा डाग पोटावर लहान बाळांच्या पोटावर लावला जातो त्या मागे कारण आहे बाळाला कधी पोटाचा त्रास होऊ नये म्हणून.

ह्या व्यतिरिक्त पूर्वी धोबी कपड्यांवर खुणा करण्यास बिब्याचा उपयोग करत असे. बिब्यात सुई खुपसून सुईवर लागलेल्या बिब्याच्या तेलाने कपड्यांवर विशिष्ठ खुणा करत असे व वर चुन्याची निवळी लावत असे. नंतर त्या खुणा कायमसाठी राहत असत. त्या खुणांवरून कपडे कोणाचे आहेत आणि धोबी कोण आहे ते ओळखू यायचे. 
उत्तर लिहिले · 30/4/2022
कर्म · 53715
0

बिबवा हे बी बिब्याच्या झाडाला येते. या झाडाचे शास्त्रीय नाव Semecarpus anacardium (सेमेकार्पस अनाकार्डियम) आहे.

उपयोग:

  • आयुर्वेदात बिबव्याचा उपयोग अनेक औषधांमध्ये केला जातो.
  • त्वचेच्या रोगांवर बिबव्याचे तेल गुणकारी असते.
  • सांधेदुखी आणि हाडांच्या दुखण्यांवर देखील ते उपयोगी आहे.
  • स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बिबवा उपयुक्त मानला जातो.

इतर माहिती:

बिबवा वापरताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, कारण तो विषारी असू शकतो. त्यामुळे वैद्याच्या सल्ल्यानेच त्याचा वापर करावा.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

  1. https://mr.vikaspedia.in/health/ayush/medicinal-plants/92c-93f-92c-935-935-93e
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

भारतातील महागडा लिंबू कोणता?
कलिंगड खरेदी करताना ते लाल आहे हे कसे ओळखावे?
आंबे नैसर्गिक पिकलेले कसे ओळखावे?
आंबा खरेदी करताना भेसळ कशी ओळखावी?
भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?
केळ्याचा मोठा बाजार कुठे आहे?
संत्रा सविस्तर लिहा?