संस्कृती देव लोकदेवता

वेताळ देवाबद्दल माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

वेताळ देवाबद्दल माहिती मिळेल का?

0

देवताविश्वातील एक शिवगण. भूतनाथ हे त्याचे एक पर्यायी नाव. आग्यावेताळ, ज्वालावेताळ आणि प्रलयवेताळ ह्या नावांनीही तो ओळखला जातो. महाभारत, पुराणे इ. प्राचीन साहित्यातून वेताळाची जी वर्णने आढळतात, त्यांनुसार तो क्रूर डोळ्यांचा आणि महाकाय आहे. तो रक्तमांस खातो सदैव युद्धोद्यत आणि शस्त्रधारी असतो. वेताळाची आई ही स्कंदानुचारी मातृका असून स्वतः वेताळही स्कंदानुचर आहे, असे निर्देश आढळतात. भागवत, मत्स्यपुराण आणि ब्रह्मांडपुराण ह्यांनी मात्र त्याला स्कंदानुचर न म्हणता शिवगण म्हटले आहे. आग्यावेताळ, ज्वालावेताळ आणि प्रलयवेताळ ही त्याची पर्यायी नावे त्याचे उग्र गुणविशेष दर्शवितात. शिवपुराण शतरुद्रसंहितेत म्हटले आहे, की वेताळ हा मुळात शंकरपार्वतीचा द्वारपाल होता. एकदा दारापाशी आलेल्या पार्वतीला त्याने दाराबाहेर येण्यास अटकाव केला, म्हणून ‘तू पृथ्वीवर मनुष्यजन्म घेशील’ असा शाप तिने त्याला दिला. तेव्हा वेताळरुपाने तो पृथ्वीवर आला. कालिकापुराणात म्हटले आहे, की वेताळ हा पूर्वजन्मी भृंगी नावाचा एक शिवदूत होता. महाकाल नावाचा त्याचा एक भाऊ होता. पार्वतीने शापिल्यामुळे ह्या दोघांनी पृथ्वीवर अनुक्रमे वेताळ व भैरव म्हणून चंद्रशेखर राजाची राणी तारावती हिच्या पोटी जन्म घेतला. तथापि हे दोघे चंद्रशेखराचे औरस पुत्र नव्हते. ते तारावतीला शंकरापासून झाले होते. चंद्रशेखर हा त्यांचा पालक-पिता होता. चंद्रशेखराने आपली सर्व संपत्ती आपल्या औरस पुत्रांमध्येच वाटून टाकली. त्यामुळे वेताळ व भैरव हे तप करण्यासाठी अरण्यात गेले. पुढे वसिष्ठ ऋषींच्या कृपेने त्यांना शिवाचे दर्शन घडले आणि कामाख्या देवीच्या अनुग्रहाने त्यांना शिवगणात स्थान मिळाले.

अनेक गावांत एक ग्रामदेवता म्हणून वेताळाची पूजाअर्चा केली जाते. वेताळाच्या मूर्ती काष्ठाच्या वा पाषाणाच्या असतात. काही ठिकाणी तो तांदळ्याच्या स्वरुपातही आढळतो. हातात दंडा आणि खांद्यावर घोंगडी घेऊन वेताळ मध्यरात्री गावातून हिंडतो, असा खेडोपाडी समज आहे. ह्या भ्रमंतीमुळे त्याचा वहाणा झिजतात म्हणून वेताळाला दरमहा नव्या वहाणा अर्पण करण्याची प्रथाही काही ठिकाणी दिसते. वैशाख,मार्गशीष आणि माघ महिन्यांत वेताळाचे उत्सव व जत्रा होतात.


उत्तर लिहिले · 25/4/2022
कर्म · 53710
0
वेताळ (वेताळ) हे एक हिंदू दैवत आहे, जे विशेषतः महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांमध्ये पूजले जाते. वेताळाला भूत आणि पिशाच्चांचा अधिपती मानले जाते.

वेताळाचे स्वरूप:
  • वेताळाची मूर्ती साधारणपणे काळ्या रंगाची असते.
  • तो हातात तलवार, त्रिशूळ किंवा दंड धारण करतो.
  • त्याच्या डोक्यावर मुकुट असतो आणि अंगावर विविध आभूषणे असतात.
  • वेताळाचे डोळे मोठे आणि भेदक असतात.

वेताळाची उपासना:
  • वेताळाची उपासना विशेषतः रात्रीच्या वेळी केली जाते.
  • त्याला बळी अर्पण करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे.
  • वेताळाला शांत करण्यासाठी मंत्र आणि तंत्रांचा उपयोग केला जातो.
  • वेताळाची उपासना ग्रामदेवता म्हणूनही केली जाते.

वेताळाचे महत्त्व:
  • वेताळ हा गावाचे रक्षण करणारा देव मानला जातो.
  • तो भूत-पिशाच्चांपासून लोकांना वाचवतो, अशी समजूत आहे.
  • वेताळ हा शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे.

वेताळाची मंदिरे:
  • महाराष्ट्रामध्ये वेताळाची अनेक मंदिरे आहेत.
  • गोव्यातही वेताळाची प्रसिद्ध मंदिरे आहेत.
  • कर्नाटक आणि इतर राज्यांमध्येही वेताळाची उपासना केली जाते.

टीप: वेताळाबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. काही लोक वेताळाला नकारात्मक शक्ती मानतात, तर काही लोक त्याला रक्षक देव मानतात.

संदर्भ:
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1480

Related Questions

राम राम चा उच्चार काय होतो?
ग्रामीण देवळांचे महत्त्व थोडक्यात लिहा?
कोरकू जमातीच्या कुल संघटनावर थोडक्यात माहिती लिहा?
चार आश्रमा विषयी माहिती द्या?
धर्म आणि संस्कृती यांचे परस्पर संबंध सांगा?
वैदिक लोकांच्या देवदेवता स्पष्ट करा?
भारतीय संस्कृतीतील विविधतेतील स्वरूप स्पष्ट करा?