2 उत्तरे
2
answers
"गुरुचरित्र ग्रंथ स्त्रियांनी वाचू नये", असे का म्हटले जाते?
1
Answer link
कोणतेही धर्मग्रंथ त्या त्या काळच्या सामाजिक परिस्थितीशी निगडीत असतात. त्या वेळेच्या समाजस्थितीला अनुसरून धर्मविषयक विवेचन त्यामध्ये केलेले असते. आणि याचमुळे कोणतेही धर्मग्रंथ अंतिम सत्य नाहीत. कालानुरूप बदल किंवा संपुर्णतः नवीन धर्मग्रंथ ही काळाची गरज असते.
आणि याच कारणास्तव नवीन नवीन स्मृती तयार होत गेल्या आणि आधीच्या स्मृती बाद झाल्या. हिंदू धर्म परिवर्तनशील आणि म्हणूनच जिवंत धर्म आहे.
गुरूचरित्र लिहीले जाण्याचा काळ खुपच घडामोडीचा होता. इस्लामी आक्रमक येथे भरभक्कम झाले होते. अत्याचार खुपच वाढले होते. अशा वेळेस समाजाला एकत्र ठेवण्यासाठी काही कर्मठपणा अत्यावश्यक होता. आणि साहजिकच स्त्रियांवर बंधने अधिक आली.
सर्वसाधारणपणे पुरूषांनी बाहेरील सर्व व्यवधाने सांभाळावीत आणि स्त्रियांनी त्यांना संपुर्ण साथ द्यावी अशी विभागणी झाली. त्यामुळेच गुरूचरित्रामध्ये पुरूषांवर खुपच बंधने कर्मकांड सांगितले आहे. त्यामानाने स्त्रियांवर फक्त पतीसेवा हे एकमेव बंधन होते. पुरूषाने सर्व धार्मिक कर्मकांडे ( त्यात पारायणही आलेच) करावीत आणि स्त्रियांनी गृहस्थी सांभाळावी हे गुरूचरित्रामध्ये अभिप्रेत आहे.
या कारणास्तव स्त्रियांनी गुरूचरित्र वाचू नये असे म्हटले जाते. ( यामध्ये मी इतर कारणांचा विचार केलेला नाही कारण ती कारणे कालबाह्य झालेली आहेत.)
पण हेही विसरता कामा नये की पत्नीचा हट्ट पुर्ण करण्यासाठी दत्तमहाराजांनी धर्मनिष्ठ ब्राह्मणाला त्याचा धर्मनियम मोडण्याची आज्ञा दिली होती. गुरूचरित्रामध्ये स्पष्ट लिहीले आहे की पत्नीस समाधानी ठेवणे हे पतीचे कर्तव्य आहे.
आता कालसुसंगत नवीन धर्मनियमांची गरज आहे व आपला हिंदू धर्म तेवढा लवचिक नक्कीच आहे.
💐💐💐 अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
0
Answer link
"गुरुचरित्र ग्रंथ स्त्रियांनी वाचू नये", असे अनेक ठिकाणी म्हटले जाते, परंतु यामागे निश्चित कारण काय आहे, हे स्पष्टपणे सांगणे कठीण आहे. काही संभाव्य कारणे खालीलप्रमाणे दिली आहेत:
- पारंपारिक दृष्टिकोन: काही लोकांचा असा विश्वास आहे की गुरुचरित्र हा एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे आणि स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान अपवित्र असू शकतात. त्यामुळे, या काळात स्त्रियांनी हा ग्रंथ वाचू नये.
- कठोर नियम: गुरुचरित्राचे पारायण करताना काही नियम वsymbols पाळणे आवश्यक आहे, जे स्त्रियांसाठी कठीण होऊ शकतात.
- सामाजिक रूढी: पूर्वीच्या काळी स्त्रियांच्या शिक्षणावर आणि धार्मिक ग्रंथांच्या अभ्यासावर काही निर्बंध होते. त्यामुळे, गुरुचरित्र वाचण्यास त्यांना मनाई केली गेली असावी.
- गैरसमज: काहीवेळा चुकीच्या समजुती आणि अपूर्ण माहितीमुळे असे मत तयार झाले असावे.
आजकाल अनेक स्त्रिया गुरुचरित्र वाचतात आणि त्यांना चांगले अनुभव आले आहेत. त्यामुळे, हा ग्रंथ वाचणे किंवा न वाचणे हे ज्या त्या व्यक्तीच्या श्रद्धेवर आणि इच्छेवर अवलंबून असते.
या संदर्भात अधिक माहितीसाठी, तुम्ही धार्मिक पुस्तके आणि तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.