Topic icon

धार्मिक ग्रंथ

0

संतोषी माता ही एक नविन देवी आहे, जिची विशेषतः उत्तर भारतात पूजा केली जाते. त्या 'समाधानाच्या देवी' म्हणून ओळखल्या जातात. संतोषी माता ही देवी रिद्धी-सिद्धी आणि भगवान गणेश यांची कन्या मानली जाते.

संतोषी मातेची माहिती देणारे ग्रंथ:

  • श्री संतोषी चालीसा: संतोषी मातेची चालीसा हिंदी भाषेत असून, यात मातेच्या विविध नावांचा आणि गुणांचा उल्लेख आहे.
  • श्री संतोषी माता व्रत कथा: या पुस्तकात संतोषी मातेच्या व्रताची कथा दिलेली आहे, जी व्रत करणाऱ्यांसाठी महत्त्वाची आहे.
  • संतोषी माता महात्म्य: हे पुस्तक संतोषी मातेच्या उत्पत्ती आणि त्यांच्या चमत्कारांवर आधारित आहे.

याव्यतिरिक्त, अनेक स्थानिक कथा आणि मौखिक परंपरांमध्ये संतोषी मातेच्या विविध कथा प्रचलित आहेत.

उत्तर लिहिले · 17/5/2025
कर्म · 1040
2
गुरुचरित्राचे पारायण का करावे व त्याचे फायदे.
वैयक्तिक पारायण सात दिवसाचे करावे. श्री गुरुचरीत्राच्या निष्ठापूर्वक पारायण ने अनुभूती पूर्वक साक्षात्कार होतो. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुःखिताना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापिताना ,असाध्य आजार झालेल्यांना, पितृ दोष असणाऱ्यांना श्री गुरु चरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देते असे सांगण्यात येते.



गुरुचरित्र वाचण्याचे काय फायदे आहेत?



‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले.
 
या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे.
या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधीव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते.
याने मनुष्य दुःख मुक्त होतो.
घरामध्ये गुरूचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते.
पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात.
विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण,करिअर, आरोग्य, यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो.
आपल्या कुंडलीतील ग्रह-नक्षत्रे, पितृ दोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात.
वाचा संपूर्ण श्री गुरुचरित्र अध्याय १ ते ५३ 
श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायतील फलश्रुती
अध्याय १- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.

अध्याय २- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.
अध्याय ३- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते.
अध्याय ४- स्त्रीछलणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.
अध्याय ५- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.
अध्याय ६- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते.
अध्याय ७- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.
अध्याय ८- बुध्दिमांद्य नाहिशे होतात. विवाह कार्य सुलभ होते.
अध्याय ९- सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात.
अध्याय १०- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.
अध्याय ११- वाचंदोष तसेच,वेड नाहीसे होते.
अध्याय १२- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.
अध्याय १३- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.
अध्याय १४- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.
वाचा अडचणीपासून मुक्त होण्यासाठी गुरुचरित्र अध्याय 14

अध्याय १५- तिर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.
अध्याय १६- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.
अध्याय १७- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.
अध्याय १८- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.
अध्याय १९- भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातरपुण्य लाभते.
अध्याय २०- गुरूस्मरण करुनी मनी, पूजा करी वो गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासमंध परिहरेल!!
अध्याय २१- मृत्यूभयापासून मुक्तता .
अध्याय २२- वांझपण दूर होते. बाळणतिनिला चांगले दूध येते.
अध्याय २३- पिशाच्चबाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते.
अध्याय २४- भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते.
अध्याय २५- अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.
अध्याय २६- शत्रू निषभ्रम होऊन शरण होतात.
अध्याय २७ - गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्दानाचा छळ दोषांची निवृत्ती.
अध्याय २८- वाईट कर्माचे दोष दूत होतात , सप्तथ सापडतो.
अध्याय २९- स्त्रीछलदोष , वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.
अध्याय ३०- कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.
अध्याय ३१- पतीवर येणारे विघ्ने टळतात.
अध्याय ३२- वैधव्याचे दुःख टळते. अथवा सुसह्य होते.
अध्याय ३३- वचनभँग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते.
अध्याय ३४ - प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.
अध्याय ३५ - हरवलेले , नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तूटलेले संबंध जुळतात.
अध्याय ३६- चूकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.
अध्याय ३७- मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.
अध्याय ३८- निदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.
अध्याय ३९- सद्गुगुरु ची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो .
अध्याय ४०-कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.
अध्याय ४१- सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.
अध्याय ४२- विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारिला यश येते.
अध्याय ४३- गर्व व क्रोध नाहीसा होऊन एशवर्या ची प्राप्ती होते.
अध्याय ४४- मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.
अध्याय ४५- कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.
अध्याय ४६- चिंताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.
अध्याय ४७- पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.
अध्याय ४८- गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते.विघ्ने टळते.
अध्याय ४९- तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते.
अध्याय ५०- ग्रँथी रोग , त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.
अध्याय ५१- सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.
अध्याय ५२ - श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.
 ५२ श्लोकी गुरुचरित्र 

उत्तर लिहिले · 12/7/2023
कर्म · 53720
0
पुरणांची संख्या किती?
उत्तर लिहिले · 24/1/2023
कर्म · 5
2
साठ सुधारले आणि चांगली कंपनी मिळाली. पारस पारस कुळत सुहाई ॥ बिधी अवघे सुजन कुसंगत । फणी मनीं सम निज गुण अनुसरही ॥5॥

तात्पर्य :- चांगली संगती मिळाल्यावर

दुर्जनही सुधारतात, जसे पारसाच्या स्पर्शाने लोखंड सुंदर होते (सुंदर सोने होते)
दुर्जनही सुधारतात, जसे पारसाच्या स्पर्शाने लोखंड सुंदर होते (सुंदर सोने होते) पण योगायोगाने सज्जन माणूस वाईट संगतीत पडला तर तेथेही तो सापासारखा होतो. रत्न. ते त्यांच्या स्वतःच्या गुणांचे पालन करतात. (म्हणजे ज्याप्रमाणे रत्न सापाच्या सान्निध्यात येऊनही त्याचे विष घेत नाही व आपला जन्मजात प्रकाशाचा

गुण सोडत नाही, त्याचप्रमाणे साधुसंतांच्या संगतीत राहूनही इतरांना प्रकाश देतो. दुष्ट, दुष्टांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही ॥५॥



पारस परस कुधाता सुहाई... विधी बसा सुजाण कुसंगता परहीं. फणी मनी सम निज गुण अनुसरहीं..

तत्त्वज्ञानाच्या दगडाच्या स्पर्शाने ज्याप्रमाणे आधारभूत धातूचे रूपांतर होते त्याप्रमाणे सद्गुरूंच्या संपर्कातून दुर्जनही सुधारतात. याउलट, जर भल्याभल्यांनी दुष्ट संगतीत अडकले तर ते सर्पाच्या कुशीवरील रत्नाप्रमाणे आपले उदात्त चारित्र्य टिकवून ठेवतात .








उत्तर लिहिले · 10/12/2022
कर्म · 53720
0

''देवांचा ग्रंथ'' कोणी लिहिला आहे, ह्या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे देणे कठीण आहे, कारण ते कोणत्या 'देवांच्या ग्रंथा'बद्दल बोलत आहोत यावर अवलंबून आहे. विविध धर्मांमध्ये आणि संस्कृतींमध्ये अनेक ग्रंथ आहेत जे देवांचे किंवा दैवी कथांचे वर्णन करतात.

उदाहरणार्थ:

  • बायबल: ख्रिश्चन धर्मातील पवित्र ग्रंथ, विविध लेखकांनी वेगवेगळ्या काळात लिहिले.
  • कुराण: इस्लाम धर्मातील पवित्र ग्रंथ, असा मानले जाते की तो अल्लाहने पैगंबर मुहम्मद यांना सांगितला.
  • वेद: हिंदू धर्मातील प्राचीन ग्रंथ, ज्यांना 'अपौरुषेय' मानले जाते, म्हणजे ते मानवी लेखकांनी लिहिले नाहीत.

त्यामुळे, 'देवांचा ग्रंथ' म्हणजे नेमका कोणता ग्रंथ अभिप्रेत आहे हे स्पष्ट नसल्यामुळे, निश्चित उत्तर देणे शक्य नाही.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040
1
कोणतेही धर्मग्रंथ त्या त्या काळच्या सामाजिक परिस्थितीशी निगडीत असतात. त्या वेळेच्या समाजस्थितीला अनुसरून धर्मविषयक विवेचन त्यामध्ये केलेले असते. आणि याचमुळे कोणतेही धर्मग्रंथ अंतिम सत्य नाहीत. कालानुरूप बदल किंवा संपुर्णतः नवीन धर्मग्रंथ ही काळाची गरज असते.

आणि याच कारणास्तव नवीन नवीन स्मृती तयार होत गेल्या आणि आधीच्या स्मृती बाद झाल्या. हिंदू धर्म परिवर्तनशील आणि म्हणूनच जिवंत धर्म आहे.

गुरूचरित्र लिहीले जाण्याचा काळ खुपच घडामोडीचा होता. इस्लामी आक्रमक येथे भरभक्कम झाले होते. अत्याचार खुपच वाढले होते. अशा वेळेस समाजाला एकत्र ठेवण्यासाठी काही कर्मठपणा अत्यावश्यक होता. आणि साहजिकच स्त्रियांवर बंधने अधिक आली.

सर्वसाधारणपणे पुरूषांनी बाहेरील सर्व व्यवधाने सांभाळावीत आणि स्त्रियांनी त्यांना संपुर्ण साथ द्यावी अशी विभागणी झाली. त्यामुळेच गुरूचरित्रामध्ये पुरूषांवर खुपच बंधने कर्मकांड सांगितले आहे. त्यामानाने स्त्रियांवर फक्त पतीसेवा हे एकमेव बंधन होते. पुरूषाने सर्व धार्मिक कर्मकांडे ( त्यात पारायणही आलेच) करावीत आणि स्त्रियांनी गृहस्थी सांभाळावी हे गुरूचरित्रामध्ये अभिप्रेत आहे.

या कारणास्तव स्त्रियांनी गुरूचरित्र वाचू नये असे म्हटले जाते. ( यामध्ये मी इतर कारणांचा विचार केलेला नाही कारण ती कारणे कालबाह्य झालेली आहेत.)

पण हेही विसरता कामा नये की पत्नीचा हट्ट पुर्ण करण्यासाठी दत्तमहाराजांनी धर्मनिष्ठ ब्राह्मणाला त्याचा धर्मनियम मोडण्याची आज्ञा दिली होती. गुरूचरित्रामध्ये स्पष्ट लिहीले आहे की पत्नीस समाधानी ठेवणे हे पतीचे कर्तव्य आहे.

आता कालसुसंगत नवीन धर्मनियमांची गरज आहे व आपला हिंदू धर्म तेवढा लवचिक नक्कीच आहे.

💐💐💐 अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
उत्तर लिहिले · 17/4/2022
कर्म · 121765
0

तुमच्या प्रश्नानुसार, पवित्र धर्मग्रंथ संस्कृत भाषेत असल्याने ते सामान्य लोकांना समजत नव्हते. त्यामुळे त्या शिकवणी सामान्य माणसांसाठी खालील भाषांमध्ये उपलब्ध होत्या:

  • पाली भाषा: बौद्ध धर्माचे साहित्य पाली भाषेत अनुवादित केले गेले, जी सामान्य लोकांमध्ये प्रचलित होती. ब्रिटानिका - पाली भाषा
  • प्राकृत भाषा: जैन धर्माचे साहित्य प्राकृत भाषेत उपलब्ध होते.
  • अपभ्रंश भाषा: प्राकृत भाषेतील साहित्यानंतर अपभ्रंश भाषेत साहित्य निर्माण झाले, जेणेकरून सामान्य लोकांना धर्मग्रंथांचे ज्ञान सोपे जाईल.

या भाषांमुळे सामान्य लोकांना धार्मिक ज्ञान मिळण्यास मदत झाली.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040