अध्यात्म हिंदु धर्म पुराण धर्म

असुर आणि देवतांनी समुद्र मंथन केले, त्यातून हलाहळ (विष) निघाले व अमृत ही निघाले. ही गोष्ट खरी आहे की त्यामध्ये काही अध्यात्मिक संकेत आहेत?

2 उत्तरे
2 answers

असुर आणि देवतांनी समुद्र मंथन केले, त्यातून हलाहळ (विष) निघाले व अमृत ही निघाले. ही गोष्ट खरी आहे की त्यामध्ये काही अध्यात्मिक संकेत आहेत?

1
ग्रीक तत्वज्ञानात (आणि पाश्चात्य वांङमयात) चार संकल्पना सापडतात

लोगोस  काय लिहिलंय किंवा वाचलंय त्याचा विचार
पाथोस  - काय अनुभवलं आहे त्याचा विचार
एथोस  - विवेक आणि सद्बुद्धी ला काय समजलंय आहे त्याचा विचार
मायथोस - निसर्ग आणि बाह्य शक्तीशी ह्या साहित्यातून कुठला योग आणि दुवा लागतोय त्याचा विचार
पौराणिक कथा ह्या वांङमयिन मायथोज मानल्या जातात म्हणूनच त्यांना मायथोलॉजी म्हणतात. लॅटिन मध्ये मिथ म्हणजे असत्य नाही. मिथ म्हणजे माझं सत्य. ह्याला संस्कृत च्या मिथ्याशी (असत्याशी) जोडू नका.

आता जिथे देव ही संकल्पनाच मिथ मानली जाते तिथे अमृत आणि हलाहल हे खरं होतं की खोटं विचारणं म्हणजे आधी वेद की आधी मनुष्य हे विचारण्यासारखं होऊन जाईल. आपलं आपलं उत्तर सर्वांना ठाऊक आहे. परंतु सर्वांचं उत्तर समान नाही.

मात्र मायथोज म्हणून त्याची निसर्गाशी जुळलेली नाळ समान आहे. गायी, दूध, नारळ, हत्ती, अन्न, लोणी, वृक्ष, सूर्य, चंद्र, मृत्यु, विवाह, जन्म, योगसाधना… देवाशी निगडित ह्या साऱ्या कल्पनांना निसर्ग सर्वत्र जुळतो आणि तयार होतं मायथोज आणि मायथोलॉजी.

आता समुद्र मंथनाविषयी बोलूया.



सर्वात आधी आहे क्षीरसागर. दुधाचा समुद्र.

दूध का? पाणी का नाही?

कारण दूध म्हणजे विचार. म्हणूनच विवेकाला नीरक्षीर भाव म्हणतात... पाणी आणि दूध वेगळं करणारा. विचार अस्पष्ट असतात, अपार दर्शी दुधासारखे. म्हणून विवेक (असुर आणि देव ह्या रुपात) त्यात सहभागी होतो. मग सुरू होतं विचारचक्र (समुद्र मंथन). मनाची दैवी आणि आसुरी ह्या दोन्ही बाजू अपारदर्शी विचारांचं दूध घुसळू लागतात.

मध्ये उभा असतो मेरू पर्वत. पर्वतच का?

पर्वत म्हणजे अचल भाव... स्थितप्रज्ञता. ही खूप महत्त्वाची असते कारण मंथन होत असलेल्या मनातल्या उद्वेगाला आणि उन्मादाला वेसण फक्त स्थिरभाव च घालू शकतो.

पर्वत कोण पकडून आहे. शेषनाग. तोच का?

कारण सर्प हा काळाचां/समयाचा प्रतीक आहे. कातडी टाकून तो पुनरुज्जीवित होतो असा समज होता पुराणकाळी. सर्प कालातीत असतो. इथे मंथनातून दाखवलंय की शेषनाग हा कालसर्प आहे… भूत, वर्तमान, भविष्य यामुळे बनलेला अनुभव. हीच शेषनागाची खरी प्रतिमा.

तुमच्या मेरू सारख्या स्थितप्रज्ञ मनाला धरून ठेवतो तुमचा शेष नागासारखा कालातीत अनुभव.

आता मंथन सुरू आहे… रस्सीखेच नाही. रस्सीखेच म्हणजे चढाओढ, स्पर्धा. मंथन म्हणजे सहयोग. दैवी आसुरी भाव एकत्र काम करतात. सहयोगाने मंथन करतात. एक बाजू शेषनाग धरते तेव्हा दुसरी सोडते. इथे दिसतं की मंथनातून आपण ठरवत असतो की कुठला दैवी किंवा कुठला आसुरी अनुभव वापरावा आणि सोडावा.

असं होत होत विचारांच्या दुधापासून योजनेचं लोणी निर्माण होऊ लागतं. इथे आपल्यातला विष्णु येतो कृष्ण बनून. तेच लोणी चाखण्यासाठी. लोणी रुपात योजना फळास येऊ लागते. अचानक लक्ष्मी (संपत्ती), सरस्वती (विद्या), पारिजात (कल्प वृक्ष), कामधेनू, चिंतामणी साध्य होऊ लागतात… म्हणजेच मनुष्य त्याच्या योजनेला सर्व प्रकारे साध्य करू लागतो.

…सर्व मनासारखं होऊ लागतं… लोण्याचे तूप होऊ लागते (म्हणूनच पुजेतलं पंचामृत दही, दूध आणि तुपाशिवाय अपूर्ण) … निर्माण होतं योजनेचं अमृत (तूपासारखे शुद्ध लाभ)

हे तूप गाळून घेतल्यावर राहतो गाळ.. हालाहल (गाळा प्रमाणे दुष्परिणाम).

इथे उदाहरण द्यायची सुद्धा गरज नाही. जगात जे काही चाललंय त्याचे बरेवाईट परिणाम दोन्ही दिसतात. औद्योगिकीकरण म्हणा, इंटरनेट म्हणा, वैज्ञानिक शोध म्हणा की राजनैतिक योजना. सर्वाशेवटी अमृत सापडतं आणि विषही.

त्यामुळे मनातल्या मनात चांगल्या वाईट बाबींना समजून, निसर्गाचा वापर करून विचार योजना सिद्ध करवल्या नंतर… कृष्ण बनून लोणी खाऊन … मोहिनी होऊन त्या योजनेचं अमृत सर्वामध्ये वाटल्यानंतर …

शिव बनून त्या योजनेचं विष पचवायची सुद्धा तयारी ठेवावी माणसाने.

हेच पुरणातलं समुद्र मंथन सांगतंय.
उत्तर लिहिले · 15/4/2022
कर्म · 121765
0

असुर आणि देवतांनी केलेले समुद्र मंथन ही एक प्रसिद्ध कथा आहे, जी अनेक हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळते. या कथेमध्ये, देव आणि दानव यांनी अमृत मिळवण्यासाठी एकत्र येऊन क्षीरसागराचे मंथन केले. मंथनाच्या वेळी, समुद्रातून अनेक रत्ने, प्राणी आणि शक्तीशाली वस्तू बाहेर आल्या, त्यापैकी हलाहल (विष) हे सर्वात धोकादायक होते.

कथेनुसार, हलाहल जगाला नष्ट करू शकणारे विष होते आणि त्यामुळे सर्व देव आणि दानव भयभीत झाले. भगवान शंकराने जगाला वाचवण्यासाठी ते विष प्राशन केले आणि ते आपल्या कंठात ठेवले, त्यामुळे त्यांचे नाव नीलकंठ पडले.

या कथेला केवळ शाब्दिक अर्थाने न पाहता, अनेक आध्यात्मिक अर्थ आणि संकेत आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

  • चांगल्या-वाईटाचा संघर्ष: समुद्र मंथन हे देव आणि दानव यांच्यातील शाश्वत संघर्षाचे प्रतीक आहे. हे आपल्यातील चांगले आणि वाईट विचार, भावना आणि प्रवृत्ती यांच्यातील लढाई दर्शवते.
  • मोह आणि आसक्ती: अमृत हे मानवी जीवनातील मोहांना आणि आसक्तीला दर्शवते. हे मिळवण्यासाठी देव आणि दानव यांच्यात स्पर्धा होती, जी मानवी स्वभावातील लालसा आणि स्वार्थाचे प्रतीक आहे.
  • नकारात्मकता: हलाहल विष हे नकारात्मकता, दुःख आणि अडचणी दर्शवते. हे विष जीवनातील संकटे आणि नकारात्मक भावनांचे प्रतीक आहे, ज्याचा सामना करणे आवश्यक आहे.
  • बलिदान आणि त्याग: भगवान शंकरांनी हलाहल प्राशन करून जगाला वाचवले, हे निस्वार्थ सेवा आणि बलिदानाचे प्रतीक आहे. हे दर्शवते की, मोठ्या कल्याणासाठी व्यक्ती sacrifices करायला तयार असली पाहिजे.
  • परिवर्तन: समुद्र मंथनाची प्रक्रिया जीवनातील बदलांचे प्रतीक आहे. जीवनात अनेक स्थित्यंतरे येतात, त्यातून चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टी बाहेर पडतात, परंतु त्यांचा सामना करून आपण पुढे जायला हवे.

त्यामुळे, समुद्र मंथनाची कथा केवळ एक काल्पनिक कथा नाही, तर ती जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण अध्यात्मिक सत्यांचे आणि मूल्यांचे दर्शन घडवते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंक पाहू शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

गोसावी लागणे म्हणजे काय?
आपले शरीर पंचतत्त्वांनी बनले असेल, तर आपली ओळख काय? आपण कोण आहोत?
ब्रह्मचर्य पालन केल्यावर नेमके काय फायदे होतात?
ब्रह्मचर्य पालन म्हणजे नेमके काय करावे?
जो व्यक्ती मनोभावे पूजा करतो, दानधर्म करतो, सरळमार्गी राहतो, भविष्याबद्दल विचार न करता दुसर्‍यांसाठी खिसा रिकामा करतो, तर त्याच्याच वाटेला दुःख आणि अडचणी का येतात?
देवाचे गुरू बृहस्पति यांचे मंदिर कोठे आहे?
स्वर्गात जागा बुक करणार्‍या व्यवसायाबद्दल माहिती द्या?