अन्न फरक रेस्टॉरंट

खानावळ आणि भोजनालय या दोन्हींमध्ये कोणता फरक आहे?

2 उत्तरे
2 answers

खानावळ आणि भोजनालय या दोन्हींमध्ये कोणता फरक आहे?

1
खाणावळ - Mess, इथे शब्दशः इंग्रजी अर्थ राडा, अस्ताव्यस्तपणा, असाच गैरसमज होतो,

मूलतः MESS हा शब्द फ्रेंच mes - portion ऑफ food. लॅटिन शब्द mittre म्हणजे to put. म्हणजेच टेबलवर ठेवलेलं अन्न जे स्वतः घ्या आणी खा. Help yourselves.

आर्मी च्या लोकांना, किंवा मोठमोठ्या शिप्स वर या पद्धतीचा अवलंब सर्वात आधी झाला असावा कामगारांना थाळी उचला अन्न घ्या आणी खा. हीच पद्धत मोठमोठ्या कंपन्यात, विद्यालय, जेल मध्ये ही पाहण्यात येते, यामागे कारणं एकच असावं कमी वेळेत , मर्यादित प्रमाणात , अन्न एकाचवेळी मोठ्या संख्येला (कामगार, कैदी, विद्यार्थी ) वाढलं जावं आणी खाल्लं जावं.

🙏 INN, हॉटेल्स, लॉज, या सर्व व्यवसाय मागील उगम म्हणजे,

ज्या लोकांना पूर्वी परगावी कामानिमित्त, शिक्षणासाठी घर सोडून राहाव लागतं असे, अशांसाठी सोय म्हणून

आणी जे कुटुंबासहित स्थलांतरित झाले त्यांना महिलांना जोडधंदा म्हणून तेवढाच कुटुंबाला हातभार या उद्देशाने सुरु झाले असणार.

या सर्वात उत्क्रांती होतं गेली असावी स्पर्धा, विविधता आणी खासियत जसं मालवणी खानावळ, शुद्ध शाकाहारी ब्राम्हणी खानावळ, अस्सल कोकणी खानावळ असे अनेक पर्याय उपलब्ध झाले, बैठक बदलली, नुसतं जेवण ना वाढता, सर्विस चे प्रकार हे एकंदरीत एक सुखद अनुभव ग्राहकांना देऊ केला.

भोजनालय पण यातलाच एक प्रकार माझ्या मते जास्त फरक नसावा. फरक असा असू शकतो कीं पूर्वी खानावळीत दुपारचं आणी सांध्याकाळच असं फक्त दोन वेळाच, वेळा ठराविक 12–3 आणी 7 - 10.

थाळी पद्धतीने जेवण मेनूआधीच ठरलेला, आणी मासिक पद्धतीने मोबदला.

भोजनालयात, थाळी पद्धत, थोडया विविध महाराष्ट्रायिन, पंजाबी, सहित इतरही पदार्थ, नाश्त्याचे, गोड, पेय वगैरे, पैसे तिथल्या तिथे बिल देऊन. आणी वेळ ठराविक परंतु सकाळी 7 ते रात्री 11.


उत्तर लिहिले · 12/4/2022
कर्म · 121765
0

खानावळ आणि भोजनालय (restaurant) या दोन्हींमध्ये काही महत्वाचे फरक आहेत, ते खालीलप्रमाणे:

  1. स्वरूप आणि वातावरण:
    • खानावळ: साधारणपणे, खानावळ ही एक लहान स्तरावर चालणारी जागा असते. जिथे घरगुती जेवण उपलब्ध असते. atmosferahmol घरगुती आणि आरामदायक असते.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440

Related Questions