घर घरगुती उपाय वर्तन कीटक

काळ्या मुंग्या चावत नाहीत, मग लाल मुंग्या का चावतात?

2 उत्तरे
2 answers

काळ्या मुंग्या चावत नाहीत, मग लाल मुंग्या का चावतात?

1
कारण..

काळी मुंगी देवाची आणि लाल मुंगी राक्षसांची.


लाल मुंगी चावते म्हणून ती वाईट आणि काळी मुंगी गुदगुल्या करते म्हणून ती चांगली असं लहानपणी वाटायचं, आता कळतं कि असं काही नसतं.


मुंग्यांमध्ये उदराच्या शेवटी नांगी असते आणि त्यालगत फॉर्मिक ॲसिडच्या ग्रंथी असतात. मुंगी चावते म्हणजे ती जबडा आपल्या त्वचेत घुसवते आणि सोबतच नांगीतले फॉर्मिक ॲसिड त्वचेवर सोडते. दोन्ही क्रिया एकत्र करत असताना मुंगी चावताना वाकडी झाल्याचे आपण पाहिलेच असणार. फॉर्मिक ॲसिड दाहक असते म्हणूनच मुंगीने चावा घेतल्यास या ॲसिडमुळे त्वचेवर जळजळ होते.


काळ्या मुंग्या सुद्धा चावतात आणि त्यांच्या नांगीमध्ये सुद्धा फॉर्मिक ॲसिड असते पण त्या ॲसिडचे कॉन्सनट्रेशन लाल मुंगीच्या फॉर्मिक ॲसिड पेक्षा कमी असल्या कारणाने त्याची दाहकता कमी असते म्हणून काळी मुंगी चावली तरी त्वचेवर जळजळ होत नाही.

काळा मुंगळा मात्र चावतो, अगदी रक्त निघेपर्यंत. अशावेळी मुंगळ्याला ओढून काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचे धड डोक्यापासून वेगळे होते. तरीसुद्धा मुंगळ्याचे डोके त्वचेला चिटकून राहते कारण त्याचा जबडा त्वचेच्या आत घुसलेला असतो. खरं काय ते माहित नाही पण चरकाने जखमा शिवण्यासाठी मुंगळे वापरले असे म्हणतात. जखमेची दोन टोके एकत्र करून मुंगळ्यांना चावा घ्यायला लावायचा. मुंगळ्याचा जबडा त्वचेच्या आत चिटकला कि मुंगळ्याचे धड आणि डोके वेगळे करायचे.
उत्तर लिहिले · 12/4/2022
कर्म · 121765
0

काळ्या मुंग्या चावत नाहीत असे नाही, त्या देखील चावू शकतात, परंतु त्यांचे चावणे लाल मुंग्यांच्या तुलनेत कमी वेदनादायक असते. लाल मुंग्या चावतात कारण त्यांच्या जबड्यांमध्ये (mandibles) डंक मारण्याची क्षमता असते. या डंकांमध्ये विष (venom) असते, ज्यामुळे त्वचेतConstant वेदना आणि जळजळ होते.

लाल मुंग्या चावण्याची काही कारणे:

  • संरक्षण: लाल मुंग्या वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी चावतात. जेव्हा त्यांना धोका जाणवतो, तेव्हा त्या डंक मारून शत्रूंना दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात.
  • शिकार: काही लाल मुंग्या लहान कीटकांना पकडण्यासाठी आणि मारण्यासाठी देखील चावतात.
  • स्वतःचा बचाव: जर एखाद्या व्यक्तीने चुकून लाल मुंगीला स्पर्श केला किंवा तिला त्रास दिला, तर ती स्वतःचा बचाव करण्यासाठी चावू शकते.

काळ्या मुंग्या का कमी चावतात?

  • काळ्या मुंग्यांमध्ये लाल मुंग्यांपेक्षा कमी शक्तिशाली डंक असतो.
  • त्यांच्या विषामध्ये लाल मुंग्यांपेक्षा कमी तीव्रतेचे रसायन असते.
  • काळ्या मुंग्या सहसा आक्रमक नसतात आणि फक्त धोका जाणवल्यासच चावतात.

त्यामुळे, लाल मुंग्यांच्या चावण्यामागे संरक्षणात्मक आणि शिकारी हेतू असू शकतात, तर काळ्या मुंग्या सहसा कमी प्रमाणात आणि बचावात्मक भूमिकेत चावतात.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440

Related Questions

काही लोकांना डास चावतात तर काहीना नाही असे का?
घरातील माशी हे कीटक आहे का?
हाऊसफ्लाय एक कीटक आहे का?
भुंगळ बर्जल म्हणजे काय?
मी डोक्यावर केसांमध्ये राहते व रक्त शोषून अन्न प्राप्त करते?
गुलाबावरील खवले कीड झाडाच्या कोणत्या भागावर आढळते?
डास किती दिवस जगू शकतात?