संस्था सहकार अर्थशास्त्र

सहकारी संस्था म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

सहकारी संस्था म्हणजे काय?

1
व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक यांना व्यापारी बॅंका, सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका, नागरी सहकारी पतसंस्था कर्ज पुरवठा करतात.
शेतकऱ्यांच्या आर्थिक व जीवनावश्यक गरजा भागविणे आणि शेती उत्पादन वाढविणे यासाठी विविध सेवा पुरविणाऱ्या संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय.


सहकारी पतपुरवठा संस्था अर्थ:

           सहकारी तत्त्वावर शेती व्यवसायाच्या विकासासाठी योग्य व वाजवी व्याज दराने पुरेसा कर्जपुरवठा करणाऱ्या संस्था म्हणजेच सहकारी पतपुरवठा संस्था होय.

           ज्या गावात किंवा खेड्यामध्ये सहकारी पतसंस्था स्थापन केली जाते,ते गांव किंवा खेड्यापुरते त्या संस्थेचे कार्यक्षेत्र मर्यादित असते. त्या गावातील शेतकरी, कारागीर, लहान व्यावसायिक इत्यादी त्या संस्थेचे सभासद असतात. सभासदांना बचतीची सवय लावतात. शेतकरी सभासदांना कमीत कमी व्याजदराने वेळेवर कर्जपुरवठा करतात. कृषिक्षेत्राचा, शेतकऱ्यांचा आर्थिक विकास घडवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील असतात. सहकारी पतपुरवठा संस्था प्राथमिक पातळीवर सभासदांची गरज लक्षात घेऊन त्यानुसार कर्जपुरवठा करतात, संस्थांचा कर्जव्यवहार प्रत्यक्ष सभासदांशी होतो, म्हणून त्यांना प्राथमिक सहकारी पतसंस्था असे म्हणतात. सहकारी पतपुरवठा संस्था ग्रामीण व शहरी भागात कार्य करतात.

            व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक यांना व्यापारी बॅंका, सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका, नागरी सहकारी पतसंस्था कर्ज पुरवठा करतात. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कारागीर, लहान व्यावसायिक व इतर दुर्बल घटकांना कर्जपुरवठा करण्यासाठी सहकारी बॅंका कार्य करतात. सावकारांकडून केले जाणारे आर्थिक शोषण, फसवणूक यापासून मुक्तता करण्याच्या हेतूने सहकारी पतपुरवठा संस्थाची स्थापना केली जाते.



सेवा सहकारी संस्था :

              शेतकऱ्यांच्या आर्थिक व जीवनावश्यक गरजा भागविणे आणि शेती उत्पादन वाढविणे यासाठी विविध सेवा पुरविणाऱ्या संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय. सेवा सहकारी संस्थांना विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, शेतकरी सेवा सहकारी संस्था किंवा प्राथमिक सेवा सहकारी संस्था असेही म्हणतात. या संस्था सभासदांना फक्त कर्जपुरवठा न करता विविध सेवासुद्धा उपलब्ध करून देतात.

 ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक विविध प्रकारच्या गरजा असतात. उदा. शेतीला कर्जपुरवठा उपलब्ध होणे, सुधारीत बी बियाणे, खते, कीटकनाशके यांची सोय होणे त्याचबरोबर जीवनावश्यक अनेक वस्तूंचीही गरज असते. उदा. किराणा माल, कपडे, साखर, गहू, तांदूळ इ. शेतीविषयक आणि जीवनावश्यक गरजा भागविण्याच्या उद्देशाने ग्रामीण पातळीवर सहकारी तत्त्वावर या संस्था स्थापन झालेल्या आहेत त्यांना सेवा सहकारी संस्था असे म्हणतात.

 भारतात सेवा सहकारी संस्थांची वाटचाल सन १९५८ पासून सुरू झाली. सेवा सहकारी संस्थांचा विकास प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था ते बहुउद्देशीय संस्था, बहुउद्देशीय संस्था ते मोठ्या आकाराच्या संस्था, मोठ्या आकाराच्या संस्था ते सेवा सहकारी संस्था या टप्प्यातून झालेला दिसून येतो.


सहकारी पतपुरवठा संस्था अर्थ:

           सहकारी तत्त्वावर शेती व्यवसायाच्या विकासासाठी योग्य व वाजवी व्याज दराने पुरेसा कर्जपुरवठा करणाऱ्या संस्था म्हणजेच सहकारी पतपुरवठा संस्था होय.

सेवा सहकारी संस्था :

              शेतकऱ्यांच्या आर्थिक व जीवनावश्यक गरजा भागविणे आणि शेती उत्पादन वाढविणे यासाठी विविध सेवा पुरविणाऱ्या संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय.


उत्तर लिहिले · 11/4/2022
कर्म · 121765
0

सहकारी संस्था:

सहकारी संस्था म्हणजे अशा व्यक्तींची संघटना आहे, जी स्वेच्छेने एकत्र येतात आणि आपल्या आर्थिक आणि सामाजिक गरजा भागवण्यासाठी समान मालकीच्या आणि लोकशाही पद्धतीने नियंत्रित व्यवसायाचे संचालन करतात.

सहकारी संस्थेची काही वैशिष्ट्ये:

  • ऐच्छिक सदस्यता: कोणतीही व्यक्ती स्वेच्छेने संस्थेची सदस्य होऊ शकते.
  • लोकशाही नियंत्रण: संस्थेचे व्यवस्थापन लोकशाही पद्धतीने सदस्यांद्वारे निवडलेल्या समितीद्वारे केले जाते.
  • समानता: संस्थेतील सर्व सदस्यांना समान अधिकार असतात.
  • सेवाभाव: सहकारी संस्था नफा मिळवण्याऐवजी सदस्यांना सेवा पुरवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करते.

सहकारी संस्थांचे प्रकार:

  • ग्राहक सहकारी संस्था: सदस्यांना आवश्यक वस्तू व सेवा पुरवतात.
  • उत्पादक सहकारी संस्था: उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचे योग्य मूल्य मिळवून देतात.
  • पतपुरवठा सहकारी संस्था: सदस्यांना कर्जे उपलब्ध करून देतात.
  • गृहनिर्माण सहकारी संस्था: सदस्यांना घरे बांधण्यासाठी मदत करतात.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

कर्ज झाले आहे काय करू?
दसादशे पाच टक्के दराने 16000 रुपयांचे मुद्दलाचे दोन वर्ष आठ महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती?
दसादशे पाच टक्के दराने १६०० रुपये मुद्दलाचे दोन वर्षे आठ महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती?
चक्रवाढ व्याजाचे सूत्र काय आहे?
महेशच्या दरमहा खर्चाचे त्याच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर 3:5 आहे, तर त्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या किती टक्के आहे?
माझी पत्नी १३००० रुपये कमावते आणि माझा खर्च मी स्वतः कमावतो. मला कोणतेही व्यसन नाही. ५ लोकांचे कुटुंब आहे, त्यामुळे शिल्लक काहीच रहात नाही. मी आजारी आहे, पण माझा खर्च मी स्वतः कमावतो. पत्नी घरखर्च चालवते.
१९७० साली ४०० रुपये कर्ज घेतले, तर ते आज २०२५ मध्ये किती होईल?