हिंदु धर्म समाज genealogies धर्म

कुळातील मूळ पुरुष म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

कुळातील मूळ पुरुष म्हणजे काय?

1
#मुळपुरुष_आद्यपुरुष 

आपण ज्या कुळात जन्म घेतलेला आहे.त्या कुळाचा मूलपुरुषाने ज्या विशिष्ट शक्तीस्थानी आराधना करून आपला वंशवेळ उत्कृष्टपणे नांदवला आणि स्वतःच्या तपश्चर्येच्या व सत्कर्माच्या बळावर पुढे वंशोवंशी टिकवून ठेवला त्या शक्तीस्थानाला कुल म्हणतात. ज्या देवी ची त्याने पूजा अर्चा केली ती देवी आपली कुलदेवता असते. 
  
           गोत्र म्हणजेच ऋषी, उत्पत्तीस्थान,त्याचा रक्ताचा संबंध कुलादेवातेशी असतो. कलीमध्ये देव वंशारूण झाले. पूजापाठ , मंत्रसामर्थ्याच्या आणि सत्कर्माच्या बळावर मूर्तींमध्ये दडलेले चैतन्य ,श्रद्धा , विश्वास आत्मबळाच्या सामर्थ्याने प्राप्त करायचे आहे.
          
          कुळाची मालकी ही कुलदेवते कडे असते पण आपल्या कुळाची रचना ही मूलपुरुषाने केलेली असते. कुळात काही बिघाड झाल्यास मूलपुरुष चा कोप होतो. मूलपुरुष हा शिवअंश जरी असला तरी उत्पत्ती स्वरूप विष्णू रूप असतो. जर कुलाचार त बिघाड झाला तर तोच दुरुस्त करू शकतो.पण त्या साठी गुरू दत्तात्रय शक्ती किंवा स्वरूप महात्मा च्या आधारे त्याचा पर्यंत पोहोचावे लागते.हे काही प्रमाणात उपसाकाचे कुल तारतात. कुळाची उपासना हि अत्यंत गुप्त असते. अन्धिकार्याच्या हाताला ती लागू नये असा नियम आहे. यामुळेच बहुतांशी लोक कुलदेवतेच्या उपसानेवाचून वंचित आहेत.
          
          कुलदैवत फक्त पितृगण,गुरु दत्तात्रेय,अवधूत,महात्मा यांचेच ऐकतात. कुळात कोणी त्रिकरण शुद्धीने युक्त म्हणजे शरीरशुद्धी-मनशुद्धी-बुद्धीशुद्धीने युक्त असेल, स्त्री वा पुरुष, ह्यांच्या जवळच कुलदैवत नांदते .

           पितृगण कुलदेवतेची आराधना करतात. उपासकाळ परिपूर्ण होण्यासाठी या दोन्ही आराधना कराव्या लागतात .तेवढ्या अतिउच्चकोटीचे आध्यात्मिक बळ त्याने प्राप्त करावयाचे असते. उपासक अडचणीत आहे याचा सरळ अर्थ त्याचे पितृ आणि कुलदैवत अडचणीत आहेत. उपासक दु:खी याचा सरळ अर्थ त्याचे पितृ दु:खी आणि त्याचे कुलदैवत दु:खी आहे.
  
           ज्या वेळी कुळातील कुळधर्म-कुलाचाराचे लोप होतो त्यावेळेस हळू हळू कुळाचा क्षय होतो परंतु शक्यतोवर कुलदेवता आणि पितृगण आपला वंश संपू देत नाहीत. आपल्या बिघडलेली कुळात एखादा सत्शील पुरुष अथवा सवाष्णी आणून पुन्हा उपासना मार्गाने वंश जसा होता तास करून ठेवतात.
          
           आपण बहुतांशी घरांमध्ये कुलदैवत नाही आणि पितृ अतृप्त अशी अवस्था असते. पुष्कळसा नास्तिक भाग ,कर्मे बिघडलेली ,स्वैराचार असल्यास विधिपूर्वक, अभ्यासपूर्वक, पूर्ण श्रेद्धेने, विश्वासाने आपले कुल


उत्तर लिहिले · 7/4/2022
कर्म · 121765
0

कुळातील मूळ पुरुष म्हणजे त्या विशिष्ट कुळाचाInitial founder जनक असतो. त्या व्यक्तीपासून त्या कुळाची ओळख आणि वंशावळ सुरू होते.

उदाहरणार्थ: एखाद्या कुटुंबाचा इतिहास शोधताना, त्या कुटुंबातील सर्वात जुने ज्ञात पुरुष सदस्य ज्यांच्या नावावरून कुळाचे नाव पडले, ते त्या कुळाचे मूळ पुरुष मानले जातात.

अधिक माहितीसाठी आपण खालील साइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440

Related Questions

जिवा महाले यांची वंशावळ?
एकाच घराण्यातील व्यक्ती कुळ होऊ शकते का?
मला माझ्या वंशावळीची पूर्ण माहिती कोठे मिळेल?
साठम घराण्याबद्दल माहिती मिळेल का?
मला माझी वंशावळ काढायची आहे, पण माझ्याकडे माझा व माझ्या वडिलांचा शाळेचा दाखला आहे, मात्र माझ्या आजोबांचे काहीच नाही आहे, तर मी काय करावे?
मला माझी वंशावळ जाणून घ्यायची आहे, ती ऑनलाइन जाणून घेता येईल का?