2 उत्तरे
2
answers
साठम घराण्याबद्दल माहिती मिळेल का?
0
Answer link
*🉑इतिहासाच्या पानात हरवलेले मराठा वीर – स्वराज्याशी एकनिष्ठ राहिलेले साठम घराणे.

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
औरंगजेब दक्षिणेत चालून आला पण काही महिन्यातच त्याला उमगले की महाराजांच्या मृत्युनंतर सुद्धा सह्याद्री तितकाच किंबुहाना थोडा अधिकच अभेद्य आणि आक्रमक होता. https://bit.ly/4cANKA3 औरंगजेबाने आदिलशाही आणि कुतुबशाही अवघ्या काही महिन्यातच फस्त केल्या आणि मग पुन्हा नव्या जोमाने तो स्वराज्यावर चालून आला. या वेळेस त्याला नशिबाची आणि काही गद्दारांची साथ लाभली. १६८९ हे वर्ष त्याला लाभदायक ठरले, या वर्षात त्याने मराठ्यांच्या राजाचा खुन केला, मराठ्यांची राजधानी जिंकली, आणि राज परिवार कैद केला. पण मराठ्यांचा एक राजा निसटला होता, त्याने पलायन करून थेट जिंजी गाठली. जिंजीतून तो राज्य कारभार करू लागला. या महाराष्ट्रातील अनेक सरदार घराणी औरंगजेबाच्या पायावर लोटांगण घालीत होते पण अशी सुद्धा काही घराणी होती जे महाराजांच्या स्वराज्यावर निष्ठा ठेवून होते.

संकटाच्या समयी त्यांची निष्ठा किंचित सुद्धा ढळली नाही. असेच एक घराणे होते साठम घराणे. साठम घराण्याचा पराक्रम ताराराणी यांच्या एका पत्रातून वाचायला मिळतो. औरंगजेब पन्हाळ्याला वेढा घालून बसला असता एसोजी साठम आणि सूर्याजी साठम (पाच हजारी) या दोन शूरांनी मर्दुमकीची शर्थ केली. साठम घराण्यातील माणकोजी, हिरोजी, बापूजी, प्रतापजी या शूरांनी पावनगड आणि पन्हाळगडावर अतिशय मोलाची कामगिरी केली होती.
🈺संदर्भ: डॉ. सदाशिव शिवदेhttps://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24
0
Answer link
साठम (Satham) घराणे: माहिती
साठम हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध घराणे आहे. हे घराणे मूळतः मराठा कुणबी समाजातील आहे. "साठम" हे नाव "साठे" या शब्दावरून आले आहे, जे धान्याचे साठे साठवणार्या व्यक्तींसाठी वापरले जात असे.
साठम घराण्याची वंशावळ आणि इतिहास:
- साठम घराण्याचा इतिहास अनेक पिढ्यांपासून चालत आलेला आहे.
- या घराण्यातील काही व्यक्तींनी समाजात आणि राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
- हे घराणे शिक्षण, सामाजिक कार्य आणि उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहे.
साठम आडनावाचे लोक खालील ठिकाणी आढळतात:
- महाराष्ट्र
- गोवा
- कर्नाटक
महत्वाचे साठम व्यक्ती
- ॲडव्होकेट प्रकाश साठम (वकील आणि सामाजिक कार्यकर्ते)
- संजय साठम (राजकारणी)