आरोग्य व उपाय दुष्परिणाम आरोग्य

फ्रिजचे थंडगार पाणी पिण्याचे दुष्परिणाम कोणते आहेत?

2 उत्तरे
2 answers

फ्रिजचे थंडगार पाणी पिण्याचे दुष्परिणाम कोणते आहेत?

2



फ्रिजचं थंड गार पाणी पिताय? जाणून घ्या थंड पाणी पिण्याचे दुष्परिणाम
 : उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. घराच्या बाहेर पडलं की, प्रचंड उकाडा जाणवतोय. अशा दिवसांत शरीराला थंडावा मिळावा म्हणून आपण थंड गार पाणी पितो. थंड पाणी प्यायल्याने काही वेळासाठी तुम्हाला बरं वाटतं. मात्र अतिप्रमाणात थंड पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराला नुकसान होतंय. जाणून घेऊया अतिप्रमाणात थंड पाणी प्यायल्याने काय नुकसान होतं.

हार्ट रेट 
अनेक अहवालांमधून असं समोर आलं आहे की, जास्त प्रमाणात थंड पाण्याचं सेवन केल्याने हार्ट रेटवर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या सांगण्याप्रमाणे, अति प्रमाणात थंड पाणी प्यायल्याने हार्ट रेट कमी होऊ लागतो. 

बद्धकोष्ठता
सतत थंड पाण्याचं सेवन केलं तर एखाद्या व्यक्तीला बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता असते. असं म्हणतात की, जास्त प्रमाणात थंड पाणी प्यायल्याने खाल्लेलं अन्न शरीरात कडक होतं आणि यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते.

डोकेदुखी
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जास्त थंड पाणी प्यायल्याने डोक्यावर परिणाम होत असल्याचं अनेक अभ्यासामधून दिसून आलं आहे. असं म्हणतात, थंड पाणी ब्रेन फ्रीज समस्या निर्माण करू शकतो. थंड पाणी पाठीच्या हाडांवर परिणाम करत आणि यामुळे नर्वस सिस्टिमवरही परिणाम होतो.

पचनक्रिया
जास्त प्रमाणात थंड पाणी प्यायल्याने पोटात अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, थंड पाणी ज्यावेळी पोटात जातं त्यावेळी त्याचं तापमान समतोल राखू शकत नाही. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो.

वजन कमी न होणं
ज्या व्यक्ती वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांनी शक्यतो थंड पाणी पिऊ नये. थंड पाणी प्यायल्याने फॅट बर्न होण्यामध्ये अडचण निर्माण होते. शरीरात असलेलं फॅट मजबूत करण्यास मदत करतं. त्यामुळे ते बर्न होऊ शकत नाही.


उत्तर लिहिले · 7/4/2022
कर्म · 121765
0
फ्रिजमधील थंडगार पाणी पिण्याचे काही दुष्परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
  • पचनावर परिणाम: थंड पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि पचनक्रिया मंदावते. अन्न पचनासाठी शरीर जास्त ऊर्जा वापरते, त्यामुळे थकवा जाणवतो.
  • पोषक तत्वांचे शोषण कमी: थंड पाणी प्यायल्याने शरीराला पोषक तत्वे शोषून घेणे कठीण होते.
  • घसा खवखवणे: थंड पाण्यामुळे घसा खवखवण्याची शक्यता वाढते.
  • हृदयासाठी हानिकारक: थंड पाणी प्यायल्याने हृदयाचे ठोके कमी होऊ शकतात, जे हृदयासाठी हानिकारक असू शकते.
  • बद्धकोष्ठता: थंड पाण्यामुळे आतडे आकुंचन पावतात आणि बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.
  • वजन वाढणे: थंड पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी (fat) ब Burn करण्याची प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे वजन वाढू शकते.
टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

चहाचे दुष्परिणाम काय आहेत?
वाळवीच्या झाडाखाली आराम केल्यास काय होते?
मोबाईलमुळे होणारे परिणाम, मानवी जीवनावर व पर्यावरणावर होणारे परिणाम अभ्यासून त्यावर उपाययोजना सुचवा?
टीबीच्या औषधांचे साईड इफेक्ट?
अति वजनाने होणारे परिणाम?
माती खाल्ल्यामुळे काय होते?
कीटकनाशके वापरल्याने कोणते दुष्परिणाम होतात?