2 उत्तरे
2
answers
माती खाल्ल्यामुळे काय होते?
1
Answer link

शरीरातील रक्त धातु कमी झाल्यावर माती खडु गेरू खाण्याची इच्छा होते आणि बरयाच स्रिंया व लहान मुले माती खडु खात असतात.
अशा प्रकारे माती खडु खाण्याची सवय असणारयांच्या शरीरावर काय परिणाम होतो ते पाहणे महत्वाचे आहे.
कुठल्याही प्रकारचे मातीसेवन शरीरातील रसादी सात धातुंना रूक्ष शुष्क बनवुन खाल्लेल्या पदार्थांसही रूक्ष बनविते. मातीचे पचन न झाल्याने ती शरीरातील स्रोतसांत शिरून त्यास बंद करून पांडुरोग उत्पन्न करते.
पांडु रोगाची सामान्य लक्षणे
शरीरातील रक्त व चरबी कमी होते, शक्ती कमी होते, इंद्रीये शिथिल होतात, अंग ठेचल्यासारखे होते, मन फार कोमल होते, डोळ्याचे कोनाडे सुजतात, राग अत्याधिक येतो, वारंवार थुंकणे, थोडे बोलणे, अन्न व थंड पदार्थ न अावडणे, केस गळणे, भुक मंदावणे, माड्यां गळुन जाणे, ताप, दम लागणे, चक्कर येणे, कानात गुजगुज होणे, श्रमाशिवाय थकवा येणे अश्या प्रकारचे त्रास होतात.
वैद्यकीय शास्त्रात ‘माती खावीशी वाटणे’ हे एक लक्षण मानले जाते. शरीरामध्ये महत्वाच्या घटकांच्या कमतरतेची हे लक्षण आहे. मग हे घटक हिमोग्लोबीन असू शकते किंवा जीवनसत्व ही असू शकते.
तुमच्या प्रश्नाकडे वळता, माती ही दूषित असू शकते. बऱ्याच वेळेला त्या मध्ये विषाणू असतात, काही वेळेला जंतांची अंडीही त्या मध्ये समाविष्ट असू शकतात. पोटात गेल्यास ह्या दोनीही गोष्टींमुळे संक्रमण होऊ शकते व पूर्वीची परिस्थिती आणखी चिघळू शकते.
0
Answer link
माती खाल्ल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
- पोटदुखी: मातीमध्ये अनेक हानिकारक कण आणि जंतू असू शकतात, ज्यामुळे पोटदुखी होऊ शकते.
- बद्धकोष्ठता: माती खाल्ल्याने आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.
- पोषक तत्वांची कमतरता: माती खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळत नाहीत, ज्यामुळे अशक्तपणा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
- विषबाधा: मातीमध्ये विषारी पदार्थ असू शकतात, ज्यामुळे विषबाधा होऊ शकते.
- रोगप्रतिकारशक्ती कमी होणे: माती खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होते, ज्यामुळे संक्रमण होण्याची शक्यता वाढते.
- कृमी संक्रमण: मातीमध्ये कृमी असू शकतात, ज्यामुळे कृमी संक्रमण होऊ शकते.
जर तुम्हाला माती खाण्याची सवय असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. ते तुम्हाला या सवयीचे कारण शोधण्यात आणि त्यावर उपचार करण्यात मदत करू शकतात.
माती खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, त्यामुळे शक्यतोवर ती खाणे टाळावे.