2 उत्तरे
2
answers
मागणीची लवचिकता कशी स्पष्ट कराल?
2
Answer link
वस्तूंच्या किमतीत होणाऱ्या बदलामुळे वस्तूच्या मागणीत बदल होत असतो . इतर परिस्थिती स्थिर असता . वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते . याउलट वस्तूची किंमत वाढल्यास वस्तूची मागणी कमी होते . हे मागणीचा नियमावरून स्पष्ट होत नाही .परंतु किमतीत किती टक्के बदल होतो . त्याचा परिणाम मागणीत किती टक्के होतो . हे मागणीचा नियम स्पष्ट करत नाही . म्हणून डॉ. मार्शल यांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना वापरली आहे .
• मागणीच्या लवचिकतेची संकल्पना :-
एका चलातील बदलाचा दुसऱ्या चलावर होणारा परिणाम लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करते . मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील बदलांचा मागणीतील बदलावर होणारा परिणाम दर्शविते .
• मागणीच्या लवचिकतेचे व्याख्या :-
" वस्तूच्या किंमतीत होणाऱ्या शेकडा बदलामुळे वस्तूच्या मागणीत होणाऱ्या शेकडा बदलाचे प्रमाण म्हणजेच मागणीची लवचिकता होय . "
वरील व्याख्येवरून वस्तूच्या मागणीवर विविध घटकांचा परिणाम होतो . त्यापैकी वस्तूची किंमत , उपभोक्त्याचे उत्पन्न आणि पर्यायी वस्तुच्या किमती हे तीन घटक महत्त्वाचे मानले असता . त्यावरून मागणीची लवचिकताचे तीन प्रकार करण्यात आलेले आहे ते पुढील प्रमाणे :
• मागणीच्या लवचिकतेचे प्रकार :-
1] मागणीची किंमत लवचिकता .
2] मागणीची उत्पन्न लवचिकता .
3] मागणीची छेदक लवचिकता .
1] मागणीची किंमत लवचिकता :-
वस्तूच्या मागणीवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये वस्तूची किंमत सर्वात महत्त्वाचा परिणाम करणारा घटक आहे . किंमतीत होणाऱ्या बदलामुळे वस्तूच्या मागणीत होणाऱ्या बदल शोधून काढण्यासाठी डॉ . मार्शल यांनी मागणीची किंमत लवचिकता या संकल्पनेचा वापर केला आहे .
" वस्तूंच्या किमतीत होणाऱ्या शेकडा बदलामुळे वस्तूच्या मागणीत होणाऱ्या शेकडा बदलाचे प्रमाण म्हणजेच मागणीची किंमत लवचिकता होय . या वरील व्याख्येवरून असे स्पष्ट होते की वस्तूच्या किंमतीत होणाऱ्या शेकडा बदलामुळे वस्तूच्या मागणीवर काय परिणाम होतो . त्यावरून मागणीतील शेकडा बदल विचारात घेऊन मागणीची किंमत लवचिकता शोधता येते .
किंमत लवचिकतेचे प्रकार
2] मागणीची उत्पन्न लवचिकता :-
वस्तूच्या मागणीवर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी उत्पन्न हा घटक महत्त्वाचा आहे . सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की उत्पन्नात वाढ झाली तर खरेदी शक्ती वाढते आणि वस्तूची मागणी वाढते . याउलट किंमत कमी झाली की खरेदी शक्ती कमी होते . म्हणजेच वस्तूची मागणी ही कमी होते . परंतु उत्पन्नात किती टक्के बदल झाल्या असता मागणीत किती टक्के बदल होतो . हे शोधण्यासाठी मागणीची उत्पन्ना लवचिकता या संकल्पनेचा वापर केला जातो .
" उत्पन्नात होणारे शेकडा बदलामुळे मागणी होणाऱ्या शेकडा बदलाचे प्रमाण म्हणजेच मागणीची उत्पन्न लवचिकता होय . "
3] मागणीची छेदक / पर्यायता लवचिकता :-
मागणीची किंमत आणि उत्पन्न लवचिकतेचे प्रमाणेच छेदक लवचिकता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे . कारण वस्तूची मागणी फक्त किमतीवर किंवा उत्पन्नावर अवलंबून असते असे नाही . तर ती पर्यायी वस्तू किंवा परस्पर पूरक वस्तूवरही अवलंबून असते . थोडक्यात परस्पर पूरक किंवा पर्यायी वस्तूंच्या बाबतीत एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर किती परिणाम होतो . तो परिणाम छेदक लवचिकतेच्या आधारे मोजला जातो .
" एका वस्तूची किमतीत बदल झाल्यास त्याच्या दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर किती परिणाम होतो. त्यालाच छेदक लवचिकता असे म्हणतात . "
'क्ष' वस्तूंच्या किमतीत बदल झाला असता . 'य' वस्तूच्या मागणी किती बदल होतो . त्यालाच मागणीची छेदक लवचिकता असे म्हणतात.
'क्ष' वस्तूच्या किमतीत बदल झाला असता. ( वाढ / घट ) 'य' वस्तूच्या मागणीत ज्या प्रमाणात बदल होतो. त्याला मागणीची छेदक लवचिकता असे म्हणतात.2021 batut-emotions.ru - आमचे अभिनंदन. अभिनंदन आणि शुभेच्छा पोर्टल
साइटचा नकाशाजाहिरातसंपर्क
0
Answer link
मागणीची लवचिकता म्हणजे किंमतीतील बदलांना मागणी किती प्रतिसाद देते हे मोजणे.
मागणीची लवचिकता खालीलप्रमाणे स्पष्ट करता येते:
- लवचिक मागणी: किमतीत थोडा जरी बदल झाला, तरी मागणीत मोठा बदल होतो.
उदाहरण: चैनीच्या वस्तू (Luxury items).
- अलवचिक मागणी: किमतीत कितीही बदल झाला, तरी मागणीत फारसा बदल होत नाही.
उदाहरण: जीवनावश्यक वस्तू (Essentials).
- एकक लवचिक मागणी: मागणीतील बदल आणि किंमतीतील बदल दोन्ही समान असतात.
मागणीच्या लवचिकतेचे प्रकार:
- किंमत लवचिकता: किंमतीतील बदलामुळे मागणीत होणारा बदल.
- उत्पन्न लवचिकता: उत्पन्नातील बदलामुळे मागणीत होणारा बदल.
- तिरकस लवचिकता: एका वस्तूच्या किंमतीतील बदलामुळे दुसऱ्या वस्तूच्या मागणीत होणारा बदल.
मागणीची लवचिकता मोजण्याची सूत्रे:
- किंमत लवचिकता = मागणीतील शेकडा बदल / किंमतीतील शेकडा बदल
- उत्पन्न लवचिकता = मागणीतील शेकडा बदल / उत्पन्नातील शेकडा बदल
मागणीची लवचिकता व्यवसाय आणि अर्थशास्त्रज्ञांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण ती त्यांना किंमत धोरणे ठरवण्यास आणि बाजाराचा अंदाज लावण्यास मदत करते.
अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता: