पर्यावरण प्राणी जीवन

वृक्षतोडीचे पक्ष्यांवर काय परिणाम होतात?

3 उत्तरे
3 answers

वृक्षतोडीचे पक्ष्यांवर काय परिणाम होतात?

2


वृक्षतोडीचा पक्ष्यांवर परिणाम 

निसर्गाचा समतोल राखण्यात महत्वाचा घटक असलेली वनसंपदा नष्ट केली जात आहे. वृक्षतोडीने मानवी जिवनावर जसा परिणाम होत आहे. तसाचा परिणाम पशुपक्ष्यावरील झाला आहे.

वृक्षतोडीचा परिणाम पक्ष्यांच्या प्रजातीवर
 : निसर्गाचा समतोल राखण्यात महत्वाचा घटक असलेली वनसंपदा नष्ट केली जात आहे. वृक्षतोडीने मानवी जिवनावर जसा परिणाम होत आहे. तसाचा परिणाम पशुपक्ष्यावरील झाला आहे. याच मुख्य कारणामुळे निसर्गात स्वतंत्र वावरण्याऱ्या पक्ष्याच्या प्रजाती लूप्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि बऱ्याच प्रजाती लूप्त झाल्या आहेत.मानवास अन्न निवारा वस्त्र सोबत प्राणीमात्रांना जगण्यासाठी शुध्द वातावरणाची गरज आहे. शुध्द वातावरण निर्मिती वृक्षामुळेच होते शुध्द वातावरण करून देण्याऱ्या मुळ स्त्रोतावरच मानवाने घाला घातल्याने त्याचा परिणाम मानवासह पक्ष्यावरही आला आहे. मानव आपल्या स्वार्थासाठी जंगले वृक्ष नष्ट केली जात असताना शासनाकडून कोणतीच ठोस उपाय योजना केली जता नाही. म्हणून यावेळी अल्पशा क्षेत्रात जंगल उरले आहे. त्यालाही वाचवण्याचे प्रयत्न शासनाकडून होत नाहीत नवीन झाडे लावण्याचा अभाव ज्या भागता झाडे लावलीत ती जगवण्याचा अभाव या कारणामुळे निसर्गाचा समतोल बिघडला यातुनच ग्लोबल वॉर्मिगची समस्या निर्माण झाली आहे. तिचा फटका अरण्या जंगलाला जाणवत असून विविध समस्या आज पुढे आल्या आहेत. शुध्द हवा मिळत नसल्याने निसर्गाच्या सौंदर्यात भर पडणाऱ्या पक्ष्याची संख्या सुध्द दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. यावर वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही तर येत्या समोरील काळात पक्ष्याच्या जातीचे अस्तीत्व नाहीसे आल्या शिवाय राहणार नाही.मानवी जिवनामध्ये वृक्षाचे अनन्य साधारण महत्व आहे. वृक्षामुळे मनुष्य जातीला औषध इंधन फळ फूले इमारती याकडे तसेच पर्यावरणाचे संवर्धन सुध्दा होत असते हे सर्व करण्याची जबाबदारी शासनाच्या वन विभागाकडे असते परंतु वन विभागाचा जाणीवपूर्वक दुर्लक्षधोरणामुळे वृक्षाची मोठ्या प्रमानात कत्तल होत आहे. त्यामुळे वृक्ष हाच आधार असलेले पक्षी सहजच लुप्त होत आहेत. मानव आपल्या गरजापूर्ण करण्यासाठी सर्रास वृक्षाची कत्तल करीत आहेत. पूर्वी लोक संख्या कमी होती त्यांचा गरजाही अल्पच होती. गावोगावात मोठमोठी झाडे होती. त्या झाडाची पूर्वीचे लोक वृक्ष पूजन करीत होते. घराच्या समोर, बाजूस, शेतावर प्रत्येक वर्षी झाडांची लागवड करायचे आता त्यांची कत्तल केली जाते. वृक्षांपेक्षा जागोजागी सिमेंट काँक्रेटचे जंगल उभे होऊ लागले आहे. वृक्षांची होणारी कत्तलीमुळे जंगले ओसाड पडत आहेत. परिणामी पक्षयांवर याचा विपरीत परिणाम पडत आहे. 






उत्तर लिहिले · 16/3/2022
कर्म · 121765
0
वृक्ष हे पक्ष्यांना घर, सुरक्षा, फळ देते. वृक्ष तोडले तर पक्षी राहणार कुठे?
उत्तर लिहिले · 16/3/2022
कर्म · 105
0
वृक्षतोडीचे पक्ष्यांवर अनेक गंभीर परिणाम होतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
  • अधिवास नष्ट होणे (Habitat Loss): वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात. घरटी बांधायला, आश्रय घ्यायला आणि विश्रांतीसाठी झाडे मिळत नसल्याने पक्ष्यांची संख्या घटते.
  • अन्नाची कमतरता (Food Scarcity): अनेक पक्षी झाडांवर अवलंबून असतात. वृक्षतोडीमुळे त्यांना फळे, बिया, कीटक आणि इतर खाद्यपदार्थ मिळत नाहीत, त्यामुळे ते उपासमारीने मरतात.
  • घरटी बांधायला जागा न मिळणे: पक्षी झाडांवर घरटी बांधतात. वृक्षतोडीमुळे घरटी बांधायला सुरक्षित जागा मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या प्रजननावर परिणाम होतो.
  • हवामानातील बदल (Climate Change): वृक्षतोडीमुळे स्थानिक हवामानावर परिणाम होतो. तापमान वाढते आणि आर्द्रता कमी होते, ज्यामुळे पक्ष्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो.
  • शिकारी प्राण्यांपासून धोका: झाडे नसल्यामुळे पक्ष्यांना शिकारी प्राण्यांपासून लपायला जागा मिळत नाही, त्यामुळे ते सहजपणे शिकार बनू शकतात.
  • स्थलांतर (Migration): अधिवास नष्ट झाल्यामुळे पक्षी स्थलांतर करण्यास भाग पडतात. त्यांना नवीन ठिकाणी सुरक्षित वातावरण आणि पुरेसे अन्न मिळेलच याची खात्री नसते.

या परिणामांमुळे अनेक पक्ष्यांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत आणि काही तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे, वृक्षतोड थांबवणे आणि जास्तीत जास्त झाडे लावणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

द्वीपकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी कोणते?
असा कोणता प्राणी आहे जो दूध पण देतो आणि अंडे पण देतो?
धामण हा एक सापाचा प्रकार आहे, तो शेताच्या आसपास का राहत असेल?
Shamugh हा पक्षी सुमारे किती जगतो?
जलवरणातील प्राणी कोणते?
पृथ्वीवर कोणकोणते सजीव प्राणी, पक्षी, जलचर, कीटक हे एकाच जोडीदाराबरोबर आयुष्यभर एकत्र का राहतात?
कोळ्यांची लक्ष कशाला वर गेली?