क्रीडा शिक्षण प्रकल्प खेळाडू सांघिक खेळ विज्ञान

देशी विदेशी एक सांघिक खेळाचा प्रकल्प?

कबड्डी हा मुळात दक्षिण आशियातला व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. हुतुतू, या नावानेही हा खेळ प्रसिद्ध आहे.[१] मूळचा भारतीय असलेला हा खेळ पाकिस्तान, भूतान, नेपाल, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया इत्यादी देशात खेळला जातो. जपान याही देशात तो प्रसारित झाला आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात.

महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत हुतुतू, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये चाडू-गुडू, केरळमध्ये वंदिकली, पंजाबमध्ये झबर गगने, तर बंगालमध्ये दो-दो या नावाने हा खेळ खेळला जातो इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासुन हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला. १९५० मध्ये अखिल भारतीय कबड्डी संघ स्थापन झाला.

==मैदाने== ग्राउंड

पुरुष, महिलांसाठी वेगवेगळ्या आकाराची मैदाने असतात. पुरुषांसाठी १२.५० मी. बाय १० मी., तर महिलांसाठी ११ मी. बाय ८ मी. असे आयताकृती क्रीडांगण बनवतात. ते बनवताना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकसारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे. हा खेळ मैदानावर माती मध्ये जास्त प्रमाणात खेळल्या जातो.

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

देशी विदेशी एक सांघिक खेळाचा प्रकल्प?

Related Questions

देशी विदेशी एका सांघिक खेळाचा प्रकल्प पुढील मुद्द्यांच्या आधारे कसा कराल? खेळाचे नाव, खेळ साहित्य, क्रीडांगण, आकृती, खेळाडूंची संख्या, खेळाचे सर्वसाधारण नियम, खेळातील महत्त्वाची कौशल्ये, खेळात मिळालेले प्रावीण्य, अनुभव आणि तुम्हांस खेळ आवडतो त्याचे कारण.
देशी विदेशी एका सांघिक खेळाचा प्रकल्प?
Deshi /विदेशी एका सांघिक खेळाचा प्रकल्प?