2 उत्तरे
2
answers
सांडपाण्याचा योग्य वापर कसा करावा?
1
Answer link
घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घटक असते. तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते आणि डासांना अंडी घालायला जागा मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारखे रोग होतात. अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरण्यासाठी परसबाग किंवा शोषखड्डा करता येतो.
परसबागेकडे पाणी वळवणेहातपंप विहिरीजवळील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यास एक उत्तम मार्ग म्हणजे परसबाग निर्माण करणे. ह्या परसबागेतल्या भाज्यांचा वापर घरात खाण्यासाठी केल्यामुळे कुटुंबाचे पिषण होण्यास मदत होते.
तयार करणे
घरातील सांडपाण्याची योग्य पद्धतीने केलेली विल्हेवाट म्हणजे शोषखड्डा होय. सांडपाणी मुद्दाम तयार केलेल्या शोषखड्डयात सोडावे, तेथून ते जमिनीत मुरते. आंघोळीच्या मोरीतील, धुण्याभांडीच्या पाण्याचीही विल्हेवाट शोषखड्ड्याद्वारे होऊ शकते. वाळु असलेल्या, मुरमाड जमिनीत ह्या पाण्याचा चांगला निचरा होतो. पण चिकणमाती असलेल्या जमिनीत मात्र याचा फारसा उपयोग होत नाही. अशावेळी चर खणून पाण्याला दूर न्यावे लागते. त्यामुळे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यास आळा बसेल व त्यापासून रोगराई टाळण्यास मदत होते. त्यामुळे शोषखड्डे तयार करणे उपयोगाचे ठरते.
सांडपाणी म्हणजे अशुध्द, वापरलेले पाणी. सांडपाणी घरांतून, उद्योगातून बाहेर पडते व हे पाणी पिण्यास अयोग्य असते.घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते आणि डासांना अंडी घालायला जागा मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारखे रोग होतात. अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरण्यासाठी परसबाग किंवा शोषखड्डा करता येतो. पाणी वापरताना त्या अनेक गोष्टी मिसळल्या जातात आणि ते पाणी अशुद्ध होते. हे पाणी जसेच्या तसे परत वापरता येत नाही. अशा अशुद्ध पाण्याला सांडपाणी म्हणतात. सांडपाणी हे शौचालय, न्हाणीघर, स्वयंपाकघर, धुणी-भांडी, कारखाने इ. ठिकाणी होणार्या पाण्याच्या वापरातून निर्माण होते. सांडपाण्याची नीट विल्हेवाट लावण्याची गरज असते; ते न केल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या पाण्याचा पर्यावरणावर देखील विपरित परिणाम होतो.पाणी आडवा पाणी जिरवा
सांडपाणी व्यवस्थापन महत्त्व
सांडपाणी व्यवस्थापन म्हणजे शौचालयातून, घरगुती वापरातून व कारखान्यातून निर्माण होणारे सांडपाणी सुरक्षितरित्या एकत्रित करून, त्याची साठवण केल्यावर त्यावर प्रक्रिया करून त्याची नीट विल्हेवाट लावणे. सांडपाण्याचे व्यवस्थापन केल्यावर त्याचा पुनर्वापर करता येतो आणि नागरिकांचे आरोग्यही सुधारते. त्याबरोबरच परिसरातल्या नद्या, नाले व तलाव यांचे संरक्षण होते, तिथला निसर्ग अबाधित राहतो. सांडपाण्यावर प्रक्रिया करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहरीकरणामुळे ही गरज कायमच अपुरी पडत असते. या अपुर्याल सोयींमुळे विकसनशील देशांत अंदाजे १८ लाख लोकांचा अतिसारामुळे दर वर्षी मृत्यू होतो १ , पैकी ९०% ५ वर्षाच्या आतली मुले असतात. सर्व प्रकारच्या सांडपाण्याचे एकत्रीकरण टाळणे
सांडपाणी निरिक्षण समिती व लोकशिक्षण अभियान
दुहेरी किंवा तिहेरी पाणी वितरण प्रणालीचा वापर करणे
नैसर्गिक पाणी साठ्यांचे पुनरुज्जीवन
सार्वजनिक खाजगी भागीदारी
==सांडपाणी नियोजन== सांस्कृतिक भागामध्ये महत्वाचे असते
शुद्धीकरण
मुख्य लेख: सांडपाणी शुद्धीकरण
देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे गेल्या काही वर्षांत कारखान्यात तयार होणार्या प्रदूषके आणि घनकचर्या बरोबर तयार होणार्या सांडपाण्याचे प्रमाण शुद्धीकरणाच्या क्षमतेबाहेर वाढलेले आहे. घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यातील दूषित घटकांना नैसर्गिक पाण्यात सोडण्यायोग्य करण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न चालू आहेत.
जैविक प्रक्रियेमध्ये जैवरासायनिक अभिक्रियांसाठी जीवाणूंची नैसर्गिक कार्यशीलता पद्धतशीररित्या वापरण्यात येते ज्यामुळे जैविक पदार्थांचा CO2, H2O, N2 आणि SO4 मध्ये प्राणवायूशी संयोग (ऑक्सिडेशन) होतो.
घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ज्या प्रक्रियांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो त्यामध्ये ऍक्टिवेटेड स्लज ऍण्ड ट्रिकलिंग फिल्टर पद्धत, ऑक्सिडेशन/वेस्ट स्टॅबिलाझेशन पॉण्ड्स, एरेटेड लॅगून्स आणि विविध अनऍरोबिक प्रक्रिया पद्धतींचा समावेश आहे.
सर्वात आधुनिक पद्धत आहे अपफ्लो अनऍरोबिक स्लज ब्लँकेट (यूएएसबी) पद्धत. अनेक देशांमध्ये शेती, बागकाम आणि जलसंवर्धन यांच्याद्वारे सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्याच्या पारंपारिक पद्धती लोकप्रिय आहेत. *कोलकाता येथील भेरींमधील सांडपाण्यावर केली जाणारी माशांची शेती जगप्रसिद्ध आहे. या पद्धतींमध्ये प्रामुख्याने सांडपाण्यातील पोषकतत्त्वे परत मिळवण्यावर भर दिला जातो.
या सर्व पद्धतींपासून प्रेरित होऊन आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या विविध शाखांद्वारा मिळालेल्या नवनव्या माहितीचा आधार घेऊन घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी “जलसंवर्धन” ही संकल्पना तयार आणि प्रमाणित करण्यात आली आहे.
0
Answer link
सांडपाण्याचा योग्य वापर अनेक प्रकारे करता येऊ शकतो, ज्यामुळे पर्यावरण आणि पाण्याची बचत होऊ शकते. काही प्रमुख उपाय खालीलप्रमाणे:
-
सिंचनासाठी वापर: प्रक्रिया केलेले सांडपाणी (Treated wastewater) शेतीसाठी, बागांसाठी आणि उद्यानांसाठी सिंचनाकरिता वापरले जाऊ शकते. यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होते आणि वनस्पतींना आवश्यक पाणी मिळते.
-
औद्योगिक वापरासाठी: अनेक उद्योगांमध्ये सांडपाणी प्रक्रिया करून वापरले जाऊ शकते, जसे की कूलिंग टॉवर्समध्ये किंवा बॉयलर फीड वॉटर म्हणून. यामुळे उद्योगांतील पाण्याची मागणी कमी होते.
ResearchGate article on use of treated wastewater in industries
-
शौचालयांमध्ये पुनर्वापर: सांडपाणी प्रक्रिया करून शौचालयांमध्ये फ्लशिंगसाठी वापरले जाऊ शकते. यामुळे घरातील पिण्याच्या पाण्याची मोठी बचत होते.
-
भूजल पुनर्भरण: प्रक्रिया केलेले सांडपाणी जमिनीमध्ये सोडून भूजल पातळी वाढवता येते. यामुळे पाण्याची उपलब्धता वाढते.
-
ऊर्जा निर्मिती: सांडपाणी प्रक्रिया करताना मिथेन वायू तयार होतो, ज्याचा वापर वीज निर्मितीसाठी करता येतो.
-
मत्स्यपालन: योग्य प्रकारे प्रक्रिया केलेले सांडपाणी मत्स्यपालनासाठी वापरले जाऊ शकते, ज्यामुळे पाण्याची बचत होते आणि मत्स्य उत्पादनात वाढ होते.
हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने सांडपाण्याचा योग्य वापर करता येऊ शकतो आणि पाण्याचे महत्व जपले जाऊ शकते.