2 उत्तरे
2
answers
गृहितके म्हणजे काय ते सांगून त्याचे महत्त्व किंवा उपयोगिता कोणती आहे?
1
Answer link
विज्ञानाच्या क्षेत्रात, मुख्यतः वैज्ञानिक संशोधनात, विविध व विस्कळित अशा वास्तव घटनांचे निरीक्षण केले जाते पण त्या सर्वांना एकत्र गुंफून त्या सर्वांवरून एखादे सामान्यीकरण करण्यासाठी सुरुवातीपासूनच जी एक मार्गदर्शक आणि निरीक्षणाला व विचाराला वळण, तसेच आकार देणारी अटकळ बांधावी लागते, तिला गृहीतक म्हणतात.
विज्ञानाच्या क्षेत्रात, मुख्यतः वैज्ञानिक संशोधनात, विविध व विस्कळित अशा वास्तव घटनांचे निरीक्षण केले जाते पण त्या सर्वांना एकत्र गुंफून त्या सर्वांवरून एखादे सामान्यीकरण करण्यासाठी सुरुवातीपासूनच जी एक मार्गदर्शक आणि निरीक्षणाला व विचाराला वळण, तसेच आकार देणारी अटकळ बांधावी लागते, तिला गृहीतक म्हणतात.• संशोधन ज्ञानासाठी ज्ञान असले तरी विशिष्ट समस्येचे संशोधनाद्वारे पद्धतशीर विवेचन करून योग्य निष्कर्ष मांडले जातात. त्यात विविध टप्पे आहेत. संशोधनसमस्या, गृहीतक मांडणी माहिती संकलन, माहितीचे विश्लेषण आणि त्या आधारे निष्कर्ष या पद्धतीशर शास्त्रशुद्ध पद्धतीने संबंधित समस्येवर उपाय सुचविला जातो. त्यातून सैद्धांतिक निर्मिती होते.
१.२.३ अर्थशास्त्र संशोधनाची उद्दिष्टे
सामाजिक संशोधन आणि अर्थशास्त्रीय संशोधन शास्त्रशुद्ध पायावर आधारित असते. त्यातून समाजविषयक अधिक माहिती मिळते व सामाजिक समस्यांचे आकलन होते. त्याची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे सांगता येतील
१) ज्ञानविस्तार शास्त्र म्हणजे पद्धतशीरपणे संकलित केलेले ज्ञान, कोणताही संशोधक या ज्ञानात भर घालतो. संशोधनप्रक्रियेमध्ये या उद्दिष्टाचे महत्वाचे स्थान आहे.
२) सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास सामाजिक संशोधनात तसेच अर्थशास्त्रीय संशोधनात सामाजिक घडामोडीविषयी ज्ञान मिळते. सामाजिक संशोधन हे मानवी व्यक्तिभोवती केंद्रित असते. या अभ्यासात प्रथम नियम ठरविले जातात. त्याचे शास्त्रशुद्धरीत्या विश्लेषण करून सिद्धान्तात रूपांतर केले जाते.
३) मानवी कल्याण : सामाजिकशास्त्रांचा मानवी कल्याणाच्या हेतूने उपयोग केला जातो. कोणतेही संशोधन
अभ्यासपुरते मर्यादित नाही.
४) घटनांचे वर्गीकरण प्रा. पी. व्ही. यंग यांच्या मते, सामाजिक संशोधन, विशेषत: आर्थिक घटनांचे स्पष्टीकरणासाठी केले जाते. शास्त्रशुद्ध संशोधनपद्धतीत घटनांच्या वर्गीकरणाला विशेष महत्व आहे.
५) सामाजिक नियंत्रण आणि भाकीत कोणत्याही संशोधनात मानवी वर्तणुकीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जातो. त्याआधारे व्यक्तिगत मानवी जीवनातील आर्थिक अगर सामाजिक घटनांचा क्रम मांडून विश्लेषणात्मक अभ्यास केला जातो. त्यावरून येणारा निष्कर्ष भविष्यकाळासाठी उपयोगी पडतो...
१.२.४ सामाजिक / अर्थशास्त्र संशोधनाचे प्रकार
संशोधकाचा दृष्टीकोन, उद्देश आणि संशोधनाचे स्वरूप या आधारे सामाजिक / अर्थशास्त्र संशोधनाचे मुख्यत: पुढील प्रकार पडतात.
१) मुलभूत, शुद्ध किंवा सैद्धांतिक संशोधन (Fundamental, Pure or Theoretical Research)
२) व्यावहारिक किंवा क्रियाभिमुख संशोधन (Practical or Applied Research)
१) मौलिक, शुद्ध किंवा सैद्धांतिक संशोधन हे संशोधन मूलभूत स्वरूपाचे असते. यात सामाजिक जीवन आणि घटना यांच्या आधारे मौलिक सिद्धांत किंवा नियम शोधून काढले जातात. सामाजिक समस्येबाबत • नवीन ज्ञान प्राप्त करणे, प्रचलित ज्ञानात वाढ करणे किंवा उपलब्ध असणाऱ्या पूर्वज्ञानाचे पुर्नपरीक्षण आणि शुद्धीकरण करणे हा या संशोधनाचा मुख्य उद्देश असतो. प्रास्थापिक सिद्धांत आजच्या परिस्थितीत कितपत लागू होतात याचा शोध घेतला जातो. ते सिद्धांत वर्तमान समस्या सोडविण्यासाठी सक्षम बनविले जातात. कारण बदलती परिस्थिती आणि त्यामुळे निर्माण होणाचा नवीन समस्या यासाठी नवीन नियम आणि नवीन सिद्धांत शोधून काढणे आवश्यक असते. ही पद्धती सैद्धांतिक स्वरूपाची आहे. मुलभूत संशोधनात एखाद्या समस्येचे मूलभूतकारण शोधण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु ती समस्या सोडविण्यासाठी मात्र उपाययोजना सुचविली जात नाही. अशा संशोधनासाठी संशोधकाला अतिशय कष्ट घ्यावे लागतात आणि सातत्याने प्रयत्न करावे लागतात. अशाप्रकारे केवळ ज्ञानसाधना हाच संशोधकाचा एकमेव उद्देश असतो. फ्रंकलीनने लावलेला बीजेचा शोध आणि आईनस्टाईनने मांडलेला सापेक्षतावादाचा सिद्धांत ही मूलभूत संशोधनाची उदाहरणे आहेत. अर्थशास्त्रातील जॉन रॉबिन्सनचा अपूर्ण स्पर्धेचा सिद्धांत, बलींनचा एकाधिकार स्पर्धेचा सिद्धांत आणि व्यवस्थापनशास्त्रातील अभिप्रेरणेचा सिद्धांत ही सुद्धा मुलभूत संशोधने आहेत.
मौलिक सिद्धांताचे स्वरूप मुलभूत असते म्हणून त्याला 'सैद्धांतिक संशोधन' असे म्हणतात. कारण नवीन तत्वे शोधून काढणे एवढाच त्यांचा उद्देश असतो. ती तत्वे कितपत लागू होतात याचा विचार केला जात नाही, कोणतेही सिद्धांत सामान्यपणे कोणत्या ना कोणत्या गृहितांवर आधारलेले असतात. त्यामुळे त्यात बदल करण्यासाठी बराच वाव असतो. कधीकधी प्रस्थापित सिद्धांताचे पुनर्निवचन केले जाते. उदा. माल्थसने लोकसंख्येचा सिद्धांत मांडल्यानंतर 'युक्त लोकसंख्येचा सिद्धांत मांडण्यात आला. भांडवलशाही देशामध्ये देशांमध्ये प्रस्थापित झालेल्या सिद्धांतांना साम्यवादी देशातील अर्थशास्त्रज्ञांनी आव्हान दिले होते आणि त्यांनी नवीन सिद्धांताची मांडणी केली. थोडक्यात, नवीन ज्ञान प्राप्त करून किंवा जुन्या ज्ञानात भर घालून एखाद्या प्रमेयाची किंवा सिद्धांताची मांडणी करणे हे या पद्धतीचे उद्दिष्ट आहे. मौलिक संशोधन पुढील दोन प्रकारे केले जाते.
(अ) नवीन सिद्धांतांचा शोध जे ज्ञान आतापर्यंत अस्तित्वातच नव्हते ते शोधून काढणे हा मौलिक : संशोधनाचा एक प्रकार आहे. यासाठी संशोधकाला अत्युच्च दर्जाची बुद्धिमत्ता आणि कल्पना आवश्यक असते. अशा संशोधनातून मांडलेल्या सिद्धांताचा वर्तमान सिद्धांताशी अजिबात संबंध नसतो. गॉललीओ, न्युटल सिद्धांत या स्वरूपाचे आहेत. सामाजिक शास्त्रातील डार्विनचा सिद्धांत, ग्रेशमचा सिद्धांत, फ्रेडरिक टेलरचा सिद्धांत हे या स्वरूपाचे सिद्धांत आहेत. यांचे
ब) प्रस्थापित सिद्धांताचा विकास प्रस्थापित सिद्धांताची बदलल्या परिस्थितीत पुनर्माडणी करण्यासाठी केलेल्या संशोधनांचा यात समावेश होतो. त्यासाठी गृहितकृत्यांमध्ये बदल केला जातो. सामाजिक सिद्धांत गृहितकृत्यांवरच आधारलेले असल्यामुळे त्यात बदल करण्यासाठी भरपूर वाव असतो. सामाजिक विषयातील घटकात होणारे बदल, त्यांच्या प्राधान्य क्रमात होणारे बदल, उद्दिष्टात होणारे बदल, मान्यतेत होणारे बदल इत्यादी बाबी लक्षात घेऊन प्रस्थापित सिद्धांताचा विकास केला जातो. व्यवस्थापन शास्त्रातील अभिप्रेरणेचे सिद्धांत, अर्थशास्त्रातील लोकसंख्येचे सिद्धांत, राज्यशास्त्रातील प्रशासनाचे सिद्धांत यांचा अशा प्रकारच्या सिद्धांतात समावेश होतो.
२) व्यावहारिक किंवा क्रियाभिमुख संशोधन : सामाजिक जीवनाला प्रस्थापित सिद्धांत लागू करण्याच्या दृष्टीने असे संशोधन केले जाते. अनुभवजन्य तथ्ये किंवा मूलभूत गृहिते किंवा सिद्धांताची वैधता तपासणे हा या संशोधनाचा उद्देश असतो. उदा. श्रमाचे आधिक्य असणाऱ्या अर्थव्यवस्थेत जोपर्यंत श्रमाचे आधिक्य पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत वास्तविक मजुरीचे दर स्थिर असतात. हे ऑर्डर लेविस यांचे संशोधन इतर देशातील श्रमाचे आधिक्य असणाऱ्या अर्थव्यवस्थेत लागू होते किंवा नाही हे तपासणे हा त्यानंतरच्या संशोधकांचा उद्देश असू शकतो,
संपादित ज्ञानाचा सामाजिक कल्याणासाठी उपयोग करणे हा या संशोधन पद्धतीचा उद्देश आहे. समस्या निर्मितीला प्रतिबिंब घालणे आणि त्या निर्माण झाल्यावर त्यासाठी उपाययोजना सुचविणे यावर व यापद्धतीत भर दिला जातो. सामाजिक नियोजन अधिनियम, स्वास्थ्य, शिक्षण, न्याय, धर्म, मनोरंजन इत्यादी विविधक्षेत्रात क्रियाभिमुख संशोधन पद्धतीचा उपयोग होतो. ज्ञान हे व्यवहारोपयोगी असले पाहिजे असा या पद्धतीचा आग्रह आहे. सामाजाच्या विकासासाठी आखल्या जाणाऱ्या योजनांसाठी आधुनिक काळात मार्गदर्शक तत्वे सुचविण्याचे कार्य या पद्धतीमुळेच होते. व्यावहारिक संशोधनामुळे संशोधनाच्या तंत्रात आणि पद्धतीत उत्तरोत्तर सुधारणा होते. त्यामुळे ते अधिकाधिक व्यवहारोपयोगी व सामजोपयोगी ठरते. रॉबर्ट लिंड यांनी या पद्धतीचा पुरस्कार केला आहे.
श्री. पी. व्ही. यंग यांनी या पद्धतीचे महत्व विशद करताना असे म्हटले आहे की, 'मानवी वर्तन, मानवाचे समाजजीवन मानवावर प्रभाव टाकणारे घटक आणि त्यांचा परिणाम यांचा अभ्यास करणे हा सामाजिक संशोधनाचा हेतू आहे. मानवी जीवन सुखी आणि समृद्ध करण्यात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याचे उपाय आणि प्रयत्न व्यावहारिक संशोधनात केले जातात. कोणतेही सामाजिक शास्त्र हे समाजाभिमुख व व्यवहारोपयोगी असले पाहिजे.'
क्रियाभिमुख संशोधनाचा संबंध प्रत्यक्ष जीवनाशी असतो. प्रत्यक्ष जीवनातील काय ? कसे? आणि का? या प्रश्नांची उत्तरे या प्रकारच्या संशोधन पद्धतीद्वारे मिळविली जातात. या संशोधनामुळे अनेक पूर्वग्रह आणि चुकीच्या संकल्पना दूर केल्या जातात. त्यामुळे सामाजिक समस्येचे वास्तविक स्वरूप समजून त्या सोडविणे सुलभ होते. वरील विश्लेषणावरून मौलिक संशोधन आणि क्रियाभिमुख संशोधन यात पुढील फरक दिसून येतो.
सामाजिक संशोधन
शुद्ध किंवा मौलिक संशोधन
१) शुद्ध संशोधनाचा उद्देश सिद्धांताचे प्रतिपादन करणे आणि एखाद्या विषय प्रवाहाचे तंत्र शोधून काढणे हा आहे. २) या संशोधनात कोणत्याही समस्येचे अध्ययन केले जाते.
३) या पद्धतीत एका विशिष्ट विषयप्रवाहातील समस्येचे
अध्ययन केले जाते. ४) याचा संबंध संशोधना पुरताच असतो.
५) या संशोधनासाठी मुख्यतः निर्णयाची आवश्यकता असते.
६) यामध्ये सामान्यीकरणाला महत्व असते.
व्यावहारिक किंवा क्रियाभिमुख संशोधन
१) एखादी समस्या सोडविणे हा व्यावहारिक संशोधनाचा उद्देश आहे.
२) महत्वाच्या सामाजिक प्रभाव असणाऱ्या समस्यांचे यात अध्ययन केले जाते.
३) या पद्धतीत अनेक विषयप्रवाहाची संबंध असणाऱ्या व्यापक समस्येचे अध्ययन केले जाते.
४) याचा संबंध केवळ संशोधना पुरता नसून त्याचा उपयोग व्यावहारिक आणि प्रशासकीय समस्या सोडविण्यासाठी केला जातो.
५) या संशोधनात घेतलेल्या निर्णयांचे आणि सिद्धांताचे व्यक्ती समुहावर काय परिणाम होतील याचा अभ्यास यात केला जातो.
६) यामध्ये सामान्यीकरणाला महत्व नसून त्यात वैयक्तिक नमुन्यांचा अभ्यास केला जातो.गृहितकृत्यांचा आधार घेऊन इतर घटक | स्थिर असल्याचे गृहित धरले जाते..
८) यामध्ये मुलभूत प्रक्रियांचा शोध घेतला जातो.
लहान तफावती लक्षात घेतल्या जातात. (१०) यामध्ये घटना का घडतात? याचे विश्लेषण | केले जाते.
११) विषयासंबंधी सर्व तथ्ये गोळा करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो.
१२) संशोधनाचा अंतिम अहवाल तयार करणे हा याचा उद्देश आहे.
१३) विषय प्रवाहाच्या तांत्रिक भाषेत या संशोधनाचा अहवाल सादर केला जातो.
१४) अहवाल सादर केला जातो.
७) यामध्ये इतर घटक सातत्याने बदलत असतात, याला मान्यता दिली जाते.
८) यामध्ये अपेक्षित फरक दर्शविण्याच्या दृष्टीने
घटकांचा शोध घेतला जातो.
९) सांख्यिकीयदृष्ट्या महत्वपूर्ण असणाऱ्या परंतु ९) यामध्ये महत्वपूर्ण तफाक्ती लक्षात घेतल्या
जातात. १०) यामध्ये घटनांमध्ये कशाप्रकारे बदल करता
येईल याचे विश्लेषण केले जाते.
११) तथ्यांमध्ये अचूकता आणण्यासाठी आवश्यक असणान्या तथ्यांचे संकलन करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो.
१२) संशोधनाच्या कार्यकाळात लक्षात येणाऱ्या विविध बाबींचे वेळोवेळी सादरीकरण केले जाते. तसेच त्यावर तज्ञांच्या चर्चा घडवून आणले जातात.
१३) सर्वसामान्य भाषेत या संशोधनाचा अहवाल सादर केला जातो.
१४) अहवाल सादर केला जातो.
१.२.५ सामाजिक संशोधनाचे आणि अर्थशास्त्रीय संशोधनाचे महत्त्व
१८ व्या शतकात अर्थशास्त्र, समाजशास्त्र एकत्रितरीत्या सामाजिकशास्त्र संज्ञेखाली अभ्यासली जात होती.. २० व्या शतकात प्रत्येक शास्त्राने स्वतंत्र शाखा निर्माण करून आपापल्या विद्याशाखेचे महत्व संशोधना आधारे प्रस्थापित केले आहे.
• मानवी समाजात व्यक्तीच्या वर्तणुकीचा विशेषत: आर्थिक वर्तणुकीचा विशेष करून सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता निर्माण झाली. अर्थशास्त्रीय संशोधनात बाजारपेठ विषयक वर्गीकरण, आर्थिक घडामोडींचे विश्लेषण, जागतिक अर्थव्यवस्थेतील आपल्या देशाचे स्थान इ. बहुविध समस्यांबाबत अर्थशास्त्रीय संशोधन केले जाते.
आज सामाजिकशास्त्रे शास्त्रीय पद्धतीने अभ्यासली जातात. त्यात संशोधन महत्वाचे आहे. प्रत्येक सामाजिक संशोधनात विशिष्ट सामाजिक प्रश्नांवर सोडवणुकीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला जातो. म्हणून या सामाजिक आणि विशेषत: आर्थिक संशोधनास आज महत्व प्राप्त झाले आहे. अशा संशोधनातून नवीन ज्ञान मिळते. ते पूर्वसंचित अनुभवावर व ज्ञानावर अवलंबून असते. प्राचीन काळातील अनुभव समृद्ध असतील, तर आजच्या काळातील
0
Answer link
गृहितके (Assumptions):
गृहितके म्हणजे काहीतरी सत्य आहे असे मानणे, ज्यावर आधारित आपण निष्कर्ष काढतो किंवा एखादे कार्य करतो. हे गृहितक सिद्ध झालेले नसेल तरी ते सत्य मानले जाते.
महत्व किंवा उपयोगिता:- निर्णय घेणे सोपे: गृहितकांमुळे गुंतागुंतीच्या परिस्थितीत निर्णय घेणे सोपे होते. जेव्हा आपल्याकडे पूर्ण माहिती नसते, तेव्हा गृहितके वापरून आपण पुढे जाऊ शकतो.
- समस्यांचे निराकरण: गृहितके समस्या ओळखायला आणि त्यांचे निराकरण करायला मदत करतात.
- मॉडेल तयार करणे: वैज्ञानिक आणि गणितीय मॉडेल बनवण्यासाठी गृहितके आवश्यक असतात.
- वेळेची बचत: गृहितके आपल्याला अनावश्यक तपशीलांमध्ये अडकण्यापासून वाचवतात आणि वेळेची बचत करतात.
- संशोधन आणि विश्लेषण: गृहितके संशोधनाला दिशा देतात आणि विश्लेषणासाठी एक आधार तयार करतात.
उदाहरण: अर्थशास्त्रामध्ये, 'माणूस नेहमी तर्कशुद्ध निर्णय घेतो' हे गृहितक वापरले जाते.
Related Questions
सरासरी सर्व नोबेल पदक विजेते मांसाहारी होते, मग शाकाहारी लोकांना नोबेल पदक मिळत नाही असे का?
1 उत्तर