इतिहास

इतिहासातील वेगवेगळ्या बखरींची नावे कोणती आहेत?

2 उत्तरे
2 answers

इतिहासातील वेगवेगळ्या बखरींची नावे कोणती आहेत?

1
बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. तो दक्षिण आशियातील, विशेषकरून मराठी साहित्यातील, ऐतिहासिक साहित्यातील एक प्रकार आहे. ऐतिहासिक घडामोडी, शूरवीरांचे गुणगान, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन बखरीत वाचावयास मिळते. आता पर्यंत २०० बखरी लिहिल्या गेल्या असतील. जास्तीत जास्त बखरी इ.स. १७६० आणि १८५० या कालावधी दरम्यान लिहिल्या गेल्या आहेत.

सर्वसामान्यपणे कोणा तरी राजकीय पुरूषाच्या आज्ञेवरून बखरींचे लेखन झालेले दिसते. मुसलमानी तबारिखांचा हा परिणाम असावा. ‘‘साहेबी मेहरबानी करून सेवकास......आज्ञा केली’’ अशी सभासदाच्या बखरीची सुरूवात किंवा भाऊसाहेबांच्या बखरीतील ‘‘पत्री आज्ञा आली कीं हिंदुपद (श्री राजा) शाहू छत्रपती यांचा प्रधान मुख्य आदिकरून सवालक्ष फौजेनिशींही भाऊगर्दी होऊन प्यादेमात कैशी जाली हे सविस्तर वर्तमान लिहावयास आज्ञा केली’’. हा प्रारंभीचा मजकूर पोष्याने पोषकास उद्देशून लिहिलेला आहे. तसेच पाणिपतच्या बखरीचा कर्ता रघुनाथ यादव गोपिकाबाईंच्या आज्ञेवरून ती बखर लिहिल्याचे नमूद करतो. तात्पर्य, बहुतेक बखरींचे लेखन पोष्य पोषकभावाने झालेले आहे.

बखरीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सुरूवात आणि शेवट ही दोन्ही पौराणिक पध्दतीची असतात; शिवकालविषयक अनेक बखरीत व्यक्तीच्या वा घटनेच्या वृत्तांताची सुरूवात सृष्टीच्या उत्पत्तीपासून करून नंतर प्राचीन राजांच्या वंशावळी दिल्या जातात; तसेच त्यांचा शेवट इष्ट कामनापूर्तीच्या फलश्रुतीने होतो. उदा.,, जे लक्ष्मीवंत असतील ते विशेष भाग्यवंत होतील. यशस्वी असतील ते दिग्विजयी होतील. येणे-प्रमाणे सर्व मनोरथ पूर्ण होतील (सभासदाची बखर).



वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैली हा बखरींचा एक प्रमुख गुण म्हणता येईल. प्रौढ पण रसाळ भाषा सर्वच बखरीत कमी अधिक प्रमाणात आढळते. आलंकारिक भाषेचाही उपयोग केला जातो; आणि वर्णित शूर वीरला कर्णार्जुनाची उपमा दिली जाते, तर युध्दप्रसांगाला भारतीय युध्द म्हटले जाते. बखरलेखन वाङ्मयीन गुणांनी युक्त होते ते त्यामुळेही. भाऊसाहेबांची बखर किंवा चिटणिशी बखरी यांत याचा उत्तम प्रत्यय येतो. काही बखरींत शिथिल वाक्यरचनाही आढळते. हे सारे बखरनवीसाच्या लेखनप्रभुत्वावर अवलंबून असते.


चित्रस्रोत : विकि

महत्त्वाच्या बखरी

सभासद बखर

सभासद बखर : कृष्णाजी अनंत सभासद यांनी छत्रपती शिवाजी, संभाजी व राजारामच्या काळातही मराठेशाहीची सेवा केली. छत्रपतींच्या दरबारात विविध पदांवर त्यांनी काम केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहण्याचेही भाग्य त्यांना लाभले होते. छत्रपती राजारामसोबत जिंजीला असताना राजारामच्या आज्ञेनुसार इ.स. १६९७ च्या सुमारास सभासदांनी शिवाजींच्या चरित्रावर बखर लिहून काढली. या बखरीत शिवाजी महाराजांचे सुरूवातीपासून ते शेवटपर्यंतचे सर्व पराक्रम वर्णन केले आहेत. ही बखर संक्षिप्त स्वरूपात असली तरी ही शिवकालीन बखर असल्याने तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

भाऊसाहेबांची बखर

भाऊसाहेबांची बखर : ही मराठी भाषेतील एक प्रसिद्ध बखर आहे. मराठी वाङ्‌मयेतिहासातील अत्यंत लालित्यपूर्ण, श्रेष्ठ वाङ्मय गुणांनी युक्त असणारी नावाजलेली बखर म्हणजे भाऊसाहेबांची बखर. बखरीच्या कर्त्याबद्दल मतभिन्नता आढळते. कृष्णाजी शामराव व चिंतोकृष्ण वळे अशी नावे अभ्यासक मानतात; परंतु कृष्णाजी श्यामराव हेच याचे लेखक असावेत असे वाटते. बखरीचा रचनाकाळ इ.स. १७६२-६३ असावा.”भाऊसाहेबांची बखर’ असे याचे व्यक्तिवाचक नामाभिमान असले, तरी ही बखर व्यक्तिकेंद्रित नाही. इ.स. १७५३ साली रघुनाथरावांनी जाटाच्या कुंभेरीवर स्वारी केली. तेथपासून इ.स. १७६१ साली पनिपतच्या दारुण पराभवाने नानासाहेब पेशवे यांचे शोकावेगाने निधन झाले व माधराव पेशवेपदी आरूढ झाले, इथपर्यंतचा इतिहास व उत्तरी भारतातील मराठ्यांच्या राजकीय घडामोडींचे सूक्ष्म व साद्यंत वर्णन यात येते. त्यातील काही वाक्ये - जैसे भडभुंजे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात व्हावा तसा एक धडका जहाला. ”भाऊसाहेबांची बखर’ या विषयावर, याच नावाची मराठीत अनेक पुस्तके आहेत.

शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर

श्री शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर आणि भोसले घराण्याची चरितावली : दत्ताजी त्रिमल वाकेनवीस याने इ.स. १७०१ ते इ.स. १७०६ या काळात ही बखर लिहिली. फार्सी तवारिखा वाचून बखर लिहिली अशी प्रेरणा लेखकाने नोंदविली आहे. या बखरीला तो आख्यान म्हणतो. यात ९० प्रकरणे आहेत. 'पुण्यश्लोकराजाची कथा’ लेखकाने स्वप्रेरणेने लिहिली आहे. अफझलखान वध प्रसंग, आग्ऱ्याहून सुटका, इत्यादी प्रसंग त्रोटक आहेत. राज्यभिषेकाचेही वर्णन मोजक्याच शब्दात येते. जुनी सभासदपूर्व बखर म्हणून हिला निश्चितच मोल आहे. या बखरीची नवी आवृत्ती (सन २०१८) वि.स. वाकसकर यांनी संपादित केली आहे व व्हीनस प्रकाशनने प्रसिद्ध केली आहे.

सप्तप्रकरणात्मक बखर

सप्तप्रकरणात्मक बखर : ही शिवाजीच्या चरित्रावर आधारित मल्हार रामराव चिटणीसविरचित सप्तप्रकरणात्मक बखर उत्तरकालीन आहे. या बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांचे लोभस आदर्श राजा, महापुरुष म्हणून वर्णन केलेले आहे. शिवरायांचे संगीत-नाट्य, कलाकुशल व्यक्तिमत्त्वाचा; पराक्रमी, तेजस्वी राजा म्हणूनही परिचय होतो. बखरकाराने सुभाषितांचाही वापर केला आहे. मानवी स्वभावाचे विविध नमुने त्यांनी सादर केले आहेत. तत्कालीन लोकस्थितीचेही दर्शन या बखरीत आहे.

पनिपतीची बखर

पनिपतीची बखर : पनिपतच्या युद्धाचे वर्णन करणारी दुसरी बखर म्हणजे पानिपतीची बखर. लेखक रघुनाथ यादव. श्रीमंत महाराज मातु:श्री गोपिकाबाई यांच्या आज्ञेवरुन बखरीचे लेखन झाले. लेखनकाळ इ.स. १७७० च्या आसपास. या बखरीचा नायक कल्पांतीचा आदित्य-सदाशिवरावर भाऊ शिंदे-होळकरांच्या भांडणाला स्पष्ट उत्तर देणारा हा नायक, विश्वासरावाला गोळी लागताच गहिवरून येणारा भाऊ येथे दिसतो. भाऊसाहेबांची विविध रूपे लेखक चितारतो. युद्धवर्णनात त्यांचा हातखंडा आहे. वर्णनप्रसंगी तो रामायण महाभारताच्या उपमा वापरतो. निवेदनशैली, भाषा हुबेहूब वर्णन यात लेखक वाकबगार आहे. पनिपत ही मराठ्यांच्या इतिहासातील एक शोककथा आहे, आणि या शोककथेचा शोकात्म प्रत्यय बखरीत मिळतो हेच तिचे यश आहे. असे या बखरीबद्दल म्हटले जाते.

होळकरांची बखर (कैफियत)

होळकरांच्या घराण्याचा समग्र इतिहास साद्यंतपणे सांगणारी ही बखर. याचे नाव 'होळकरांची कैफियत' हे योग्य वाटते. होळकर घराण्याने एक महान इतिहास घडवला. मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर यांची नावे इतिहासात अजरामर आहेत. त्यांचा इतिहास बखरकार शब्दबद्ध करतो.

काही लेखकांनी या बखरींचे पुनः लेखन केले आहेत, जसे ;

(सोहनीकृत) पेशव्यांची बखर

संपादक - र.वि. हेरवाडकर

श्रीमंत भाऊसाहेबांची कैफियत

संपादक - र.वि. हेरवाडकर

भाऊसाहेबांची बखर

संपादक - र.वि. हेरवाडकर

मराठी बखर

संपादक - र.वि. हेरवाडकर

बखरींची वर्गवारी पुढीलप्रमाणे करता येते. (१) चरित्रात्मक (शिवाजी, संभाजी, ब्रम्होद्रस्वामी यांच्या बखरी) (२) वंशानु चरित्रात्मक (पेशव्यांची बखर ,नागपूरकर मोसल्यांची बखर), (३) प्रसंग-वर्णनात्मक (पाणिपतची बखर, खरड्याच्या स्वारीची बखर), (४) पंथीय (श्रीसमर्थाची बखर) ,(५) आत्मचरित्रपर (नाना फडनीस, गंगाधरशास्त्री पटवर्धन, बापू कान्हो यांची आत्मवृत्ते), (६) कैफियती (होळकरांची थैली, होळकरांची कैफियत), (७) इनाम कमिशनसाठी लिहिलेल्या बखरी (काही कराणे), (८) पौराणिक (कृष्णजन्मकथा बखर), (९) राजनीतिपर (आज्ञापत्र).

एकंदरीत अशा प्रकारे बखरींचे प्रकार आणि वर्गीकरण केलेले आहेत.

स्रोत :-

बखर - विकिपीडिया
'बखर' या शब्दाचा कोशातला अर्थ हकीकत , बातमी , इतिहास , कथानक , चरित्र असा आहे.. हा शब्द ' खबर ' या फारशी शब्दापासून वर्णव्यत्यासाने आला असावा. बखरी ज्या काळात लिहिल्या गेल्या त्या काळात मराठी भाषेवर फारशी भाषेचे असलेले वर्चस्व लक्षात घेता वरील व्युत्पत्ती बरोबर असावी असे वाटते. वि.का. राजवाडे यांच्या मते 'बख=बकणे, बोलणें' या शब्दापासून बखर शब्द मराठीत आला असावा. राजवाड्यांना 'खबर' पासून 'बखर' ही व्युत्त्पत्ती मान्य नाही. राजवाडे म्हणतात 'बखर' हा शब्द भष् ,भख् ,बख् ,या धातूपासून निघाला आहे. तसा 'बखर' हा शब्द बख् या अपभ्रष्ट धातूपासून निघाला आहे. पूर्वी भाट लोक मोठमोठ्या वीरपुरुषांच्या 'बखरी' तोंडाने बोलत असत. त्यावरुन 'बखर' हा शब्द प्रथमतः तोंडी इतिहासाला लावू लागले आणि नंतर लेखी इतिहासालाही तो शब्द लावण्यात आला. (राजवाडे ले.सं.भा.३) या प्रमाणे 'बखर' या शब्दाची व्युत्पत्ती 'खबर' (फारशी) आणि भख् (संस्कृत) अशा दोनही शब्दापासून सांगता येते. या दोनही शब्दाचे मूळ एकच असण्याची शक्यता आहे. [३] महत्त्वाच्या बखरी सभासद बखर : कृष्णाजी अनंत सभासद याने छत्रपती शिवाजी , संभाजी व राजारामच्या काळातही मराठेशाहीची सेवा केली. छत्रपतींच्या दरबारात विविध पदांवर त्याने काम केले होते.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहण्याचेही भाग्य त्याला लाभले होते. छत्रपती राजारामसोबत जिंजीला असताना राजारामच्या आज्ञेनुसार इ.स. १६९७ च्या सुमारास सभासदाने शिवाजींच्या चरित्रावर बखर लिहून काढली. या बखरीत शिवाजी महाराजांचे सुरूवातीपासून ते शेवटपर्यंतचे सर्व पराक्रम वर्णन केले आहेत. ही बखर संक्षिप्त स्वरूपात असली तरी ही शिवकालीन बखर असल्याने तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाऊसाहेबांची बखर : ही मराठी भाषेतील एक प्रसिद्ध बखर आहे. मराठी वाङ्‌मयेतिहासातील अत्यंत लालित्यपूर्ण, श्रेष्ठ वाङ्मय गुणांनी युक्त असणारी नावाजलेली बखर म्हणजे भाऊसाहेबांची बखर. बखरीच्या कर्त्याबद्दल मतभिन्नता आढळते. कृष्णाजी शामराव व चिंतोकृष्ण वळे अशी नावे अभ्यासक मानतात; परंतु कृष्णाजी श्यामराव हेच याचे लेखक असावेत असे वाटते. बखरीचा रचनाकाळ इ.स. १७६२-६३ असावा.”भाऊसाहेबांची बखर’ असे याचे व्यक्तिवाचक नामाभिमान असले, तरी ही बखर व्यक्तिकेंद्रित नाही. इ.स. १७५३ साली रघुनाथरावांनी जाटाच्या कुंभेरीवर स्वारी केली. तेथपासून इ.स. १७६१ साली पनिपतच्या दारुण पराभवाने नानासाहेब पेशवे यांचे शोकावेगाने निधन झाले व माधराव पेशवेपदी आरूढ झाले, इथपर्यंतचा इतिहास व उत्तरी भारतातील मराठ्यांच्या राजकीय घडामोडींचे सूक्ष्म व साद्यंत वर्णन यात येते. त्यातील काही वाक्ये - जैसे भडभुंजे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात व्हावा तसा एक धडका जहाला. ”भाऊसाहेबांची बखर’ या विषयावर, याच नावाची मराठीत अनेक पुस्तके आहेत, त्यांतल्या काहींचे लेखक : शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर संपादन करा श्री शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर आणि भोसले घराण्याची चरितावली : दत्ताजी त्रिमल वाकेनवीस याने इ.स. १७०१ ते इ.स. १७०६ या काळात ही बखर लिहिली. फार्सी तवारिखा वाचून बखर लिहिली अशी प्रेरणा लेखकाने नोंदविली आहे. या बखरीला तो आख्यान म्हणतो. यात ९० प्रकरणे आहेत. 'पुण्यश्लोकराजाची कथा’ लेखकाने स्वप्रेरणेने लिहिली आहे. अफझलखान वध प्रसंग, आग्ऱ्याहून सुटका, इत्यादी प्रसंग त्रोटक आहेत. राज्यभिषेकाचेही वर्णन मोजक्याच शब्दात येते. जुनी सभासदपूर्व बखर म्हणून हिला निश्चितच मोल आहे. या बखरीची नवी आवृत्ती (सन २०१८) वि.स. वाकसकर यांनी संपादित केली आहे व व्हीनस प्रकाशनने प्रसिद्ध केली आहे. पुरंदर

मराठीतील एक प्राचीन गद्य वाङ्मयप्रकार. यात वाका, करीणा, हकीकत, कैफियत, आत्मवृत्त, प्रसिध्द ऐतिहासिक स्त्रीपुरूषांची चरित्रे, त्यांच्यासंबंधीच्या आख्यायिका इत्यादींचा समावेश केला जातो. बखरकार हा बहुधा कारकुनी पेशातला असल्याने फडातील कागदपत्रे जशी त्याला उपलब्ध असत, तव्दत तो कथापुराणांच्या वाचनश्रवणाने बहुश्रुतही झालेला असे. त्यामुळे काही बखरींच्या लेखनावर पुराणांचाही प्रभाव पडलेला दिसतो. आणि बखरीतील हकीकत फुलवून सजवून सांगितली गेल्याचे दिसते. ‘बखर’ ह्या शब्दाच्या अनेक व्युत्पत्त्या आढळतात. त्यांपैकी ‘बक’ म्हणजे ‘बोलणे’ ह्या धातूपासून ‘बखर’ हा शब्द तयार झाला. असे राजवाडे म्हणतात, खबर, ह्या अरबी शब्दाच्या वर्णविपर्यासामुळे ‘बखर’ हा शब्द निर्माण झाला, असेही मत आहे. खुशालीची हकीकत, ह्या अर्थी असणाऱ्या ‘बिल्-खैर’ ह्या शब्दाचीच बखर, बखैर अशीही रूपे आढळतात आणि बखैर याचा अर्थ शिवाजीने करविलेल्या राजव्यवहाराकोशात आख्यायिका, असा दिलेला आढळतो. आख्यानात्मकता हा गुण बऱ्याच बखरींत प्रत्ययाला येतो, ह्याचे कारण यात असावे. बखरीचे लेखन फार्सी तवारिखांच्या अनुकरणातून झाले, असाही एक तर्क राजवाडे यांनी केला आहे. बकऱ्याच्या चामड्यावर लिहिण्याच्या अरबस्तानमधील प्रथेवरून बकर > बखर अशीही एक व्युत्पत्ती पुढे करण्यात आली आहे. बखरलेखनाची पंरपरा संस्कृत पुराणकथांकडे आणि वंशानुचरिताकडे जाते, असेही मत अलीकडे मांडले गेले आहे. महिकावतीची ऊर्फ माहीमची बखर यातील काही पद्य प्रकरणे वगळल्यास सर्व बखरलेखन गद्यात झालेले आहे. मात्र हे गद्यलेखनही सजवून केलेले असते. शूरवीरांचे गुणगाण हे बऱ्याच बखरींचे प्रयोजन दिसते, तसेच माहितगाराकडून पुढीलांना मार्गदर्शन करणे, हाही एक हेतू असल्याचे काही बखरीत नमूद केले गेले आहे. इतिहासाचा काही अंश सापडण्याच्या दृष्टीने शालिवाहनाची बखर ही उपलब्ध बखरींत सर्वांत जुनी बखर असल्याचे राजवाडे मानतात. त्या बखरीच्या उपलब्ध प्रतीतील भाषा मात्र जुनी वाटत नाही. शालिवाहनाच्या बखरीनंतर महानुभावांनी लिहिलेल्या सिंधणादी यादवांच्या बखरी येतात. या बखरींतील भाषा जुनी आहे; हेमाडपंताची बखर यादवांच्या बखरीबरोबरीचीच समजावी लागते व याही बखरीची भाषा नकलकारांनी शालिवाहनाच्या बखरीतील भाषेप्रमाणे आधुनिक केलेली आहे असे राजवाडे म्हणतात. महिकावतीच्या ऊर्फ माहीमच्या बखरीतील एकूण सहा प्रकरणांपैकी भगवान् दत्ताने लिहिलेली पद्य प्रकरणे (पहिले व चौथे) इ.स.सु.१५७८ ते १५९४ मधील असावीत, तर केशवाचार्याने लिहिलेला गद्य भाग (प्रकरणे २ व ३) १४४८ मधील आहे. असे दिसते. ह्या बखरीचे पाचवे प्रकरण १५३८ मध्ये लिहिले गेले असावे (त्याच्या लेखकाचे नाव अज्ञात आहे), तर सहाव्याचे लेखन १४७८ मध्ये झालेले दिसते. आबाजी नायक आणि रघुनाथपंत कावळे हे त्याचे लेखक. स्वराज्याचा पाया घातला गेल्यानंतरच्या सु. अडीचशे वर्षाच्या काळात मराठ्यांच्या इतिहासातील निरनिराळ्या व्यक्तींवर व प्रसंगांवर दोनअडीचशे बखरी लिहिल्या गेल्या. त्यांत टिपणे, याद्या रोजनिश्या, संतचरित्रे आदींचाही समावेश होतो. बखरलेखनाची परंपरा ही मूलतः ऐतिहासिक स्वरूपाची असली, तरी उपलब्ध प्रत्यंतर–पुराव्यांच्या आधारे घटनांची नोंद करण्यापेक्षा समाजमनामध्ये बध्दमूल झालेल्या आख्यायिकांना प्राधान्य देण्याची प्रवृत्ती त्यांतून प्रत्ययास येते. ऐतिहासिक कारणमीमांसा करण्यापेक्षा इतिहास आणि पुराण ह्यांत नाते प्रस्थापित करण्याची धडपड बखरींतून अनेकदा दिसते. ऐतिहासिक व्यक्तीविषयी लिहिताना पुराणकालीन आदर्शाची मांडणी करण्याचाही प्रयत्न दिसतो. पुराणांच्या पंचलक्षणांपैकी वंशवर्णन

उत्तर लिहिले · 2/1/2022
कर्म · 121765
0
sicher! येथे काही प्रसिद्ध बखरींची नावे दिली आहेत:

मराठीतील काही प्रसिद्ध बखरी:

  • सभासद बखर: ही बखर छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिली.

  • शिवाजी महाराजांची बखर: ही बखर 91 कलमी बखर म्हणूनही ओळखली जाते.

  • भाऊसाहेबांची बखर: या बखरीत पानिपतच्या युद्धाचे वर्णन आहे.

  • Holkaranchi Bakhar : Itihas Vibhag, Pune Vidyapeeth.

  • चित्णीस बखर: ही बखर मल्हार रामराव चित्णीस यांनी लिहिली.

  • Datte Bakhar : Itihas Vibhag, Pune Vidyapeeth.

या काही प्रमुख बखरी आहेत. यांव्यतिरिक्त आणखी अनेक बखरी इतिहासात उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 960

Related Questions

औद्योगिक क्रांती कुठे झाली?
पंडित जवाहरलाल नेहरू हे आशियानचे संस्थापक होते का?
पूर्व युरोपातील सोव्हिएट रशियाच्या दबावाखालील ५ देशांची नावे लिहा?
ॲनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीचे भारतात झालेले परिणाम लिहा?
1975 चा पेठ मधील दुष्काळ?
आधुनिक इतिहास म्हणजे काय?
इतिहासाचे प्रकार किती व कोणते?